TRENDING:

‘कॅन्सर’नं मुलगा गेला, वडिलांनी पुण्यात अनोखं हॉस्पिटल काढलं, इथं पैसा नव्हे माणूस महत्त्वाचा!

Last Updated:
Pune News: सध्याच्या काळात हॉस्पिटलचा खर्च म्हटलं की अंगावर काटा येतो. परंतु, शासनाची कोणतीही मदत न घेता पुण्यातलं हॉस्पिटल सेवाभावाने काम करत आहे.
advertisement
1/6
‘कॅन्सर’नं मुलगा गेला, वडिलांनी पुण्यात हॉस्पिटल काढलं, इथं पैसा नव्हे माणूस...
हॉस्पिटल म्हटलं की अनेकांच्या अंगावर काटा येतो. कारण दारात पाऊल टाकताच खर्चाचा किती मोठा डोंगर समोर उभा राहील, याचा काहीच नेम नसतो. याच भीतीने काहीजण तर हॉस्पिटलमध्ये सुद्धा जात नाहीत. अनेकांची आयुष्यभराची कमाई हॉस्पिटलच्या बिलात खर्च होते. मात्र, पुण्यात एक असं हॉस्पिटल आहे, जिथं तुमच्याकडे पैसे आहेत की नाही याची अजिबात विचारणा केली जात नाही. अगदी माफक दरात उपचार केले जातात. 
advertisement
2/6
हॉस्पिटलचे संस्थापक विजय फळणीकर लोकल18 सोबत बोलताना सांगतात की, त्यांचा मुलगा वैभव फळणीकर याचं कर्करोगानं (कॅन्सर) निधन झालं. या दुःखातून सावण्यासाठी त्यांनी 'आपलं घर' ही संस्था सुरू केली. या संस्थेच्या माध्यमातून अनाथ मुलांचा सांभाळ केला जातो.
advertisement
3/6
अनाथ मुलांना आजी-आजोबांचं प्रेम मिळावं म्हणून वृद्धाश्रमही सुरू करण्यात आलं, याच अंतर्गत ‘कौशल्या कराड’ धर्मादाय रुग्णालयासारख्या मल्टी स्पेशालिटी रुग्णालयातून आणि मोबाईल क्लिनिकच्या माध्यमातून गरजूंपर्यंत आरोग्य सेवा पुरवली जाते.
advertisement
4/6
पुण्यातील सिंहगडाच्या पायथ्याशी डोणजे येथे हे रुग्णालय आहे. या हॉस्पिटलमध्ये अनेक आजारांवर उपचाराची सुविधा आहे. एंडोस्कोपी, सोनोग्राफी, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे यांसह कॅन्सरसारख्या गंभीर आजारांवरील उपचारही येथे केले जातात.
advertisement
5/6
पेशंटच्या नातेवाईकांसाठी फक्त 10 रुपयांत जेवणाची सोयही आहे. विशेष म्हणजे, शासनाची कोणतीही मदत न घेता हे हॉस्पिटल पूर्णपणे सेवाभावाने सुरू आहे.
advertisement
6/6
खेडोपाड्यातील ज्यांना हॉस्पिटलपर्यंत येणे शक्य नाही, त्यांच्यासाठी दोन फिरते दवाखाने 16 गावांमध्ये फिरतात. तेथे मोफत तपासणी, मोफत औषधोपचार दिले जातात. पुढील उपचारांची गरज असल्यास त्या रुग्णाला हॉस्पिटलमध्ये आणले जाते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
‘कॅन्सर’नं मुलगा गेला, वडिलांनी पुण्यात अनोखं हॉस्पिटल काढलं, इथं पैसा नव्हे माणूस महत्त्वाचा!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल