बालपणीच गेले वडिल, PCO बूथ, ज्वेलरी शॉपमध्ये केलं काम; आज आहे फिल्म इंडस्ट्रीची दत्तक अभिनेत्री
- Published by:Minal Gurav
Last Updated:
ही अभिनेत्री इंडस्ट्रीची दत्तक अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. कधी PCO बुथ तर कधी ज्वेलरी शॉपमध्ये ती काम करतेय. आज ती गेली 12 वर्ष इंडस्ट्रीत काम करतेय.
advertisement
1/8

मनोरंजन विश्वातील झगमगत्या जगात येण्यासाठी कलाकारांना अनेक गोष्टींचा समाना करावा लागतो. प्रत्येक कलाकाराच्या मागे एक स्ट्रगल स्टोरी आहे. अशीच एक प्रसिद्ध अभिनेत्री जी अभिनय क्षेत्रात येण्याआधी PCO बुथवर काम करत होते. इतकंच नाही तर ज्वेलरी शॉपमध्येही तिनं काम केलं आहे. तिचा आजवरचा प्रवास हा खूपच प्रेरणादायी आहे.
advertisement
2/8
देहारादून वरून आलेली ही अभिनेत्री आज साऊथ इंडस्ट्रीची स्टार अभिनेत्री आहे. तिच्या काठिण काळात तिची आई तिच्यासाठी ढाल बनली. अनेक कठिण प्रसंगांना धीरानं तोंड देऊन अभिनेत्री अभिनय क्षेत्रात नाव कमावलं.
advertisement
3/8
आपण बोलतोय ती अभिनेत्री म्हणजेच नेहा सक्सेना. तिच्या डोक्यावरून वडिलांचं छत्र फार लवकर निघून गेलं. आईने एकटीनं तिचं सांभाळ केला. मुलीला इंडस्ट्रीत पाऊल ठेवू देणं हे तिच्या आईसाठी खूप कठिण होतं.
advertisement
4/8
अभिनेता नेहा गेली 12 वर्ष इंडस्ट्रीत काम करतेय. नेहाने तिच्या स्ट्रलग विषयी सांगताना म्हटलं होतं, "माझा बालपण खूप समस्यांनी भरलेलं होतं. आर्थिक परिस्थिती इतकी बिकट होती की शाळेची फी भरायलाही पैसे नव्हते. पण मी अभ्यासात चांगली होते म्हणून शाळेनं माफी फी माफ केली. हॉटेल मॅनेजमेन्टच्या शिक्षणासाठी मी लोन घेतलं होतं. खूप कमी वयात मी शिक्षणासोबत काम करायला सुरुवात केली."
advertisement
5/8
नेहा पुढे म्हणाली, "मी पीसीओ बूथ पासून ज्वेलरी शॉपमध्येही काम केलं. मी खूप जबाबदार आणि समजूतदार झाले. मी सर्वात आधी माझ्या आईला आर्थिकदृष्ट्या सुरक्षित केलं. मी सगळे लोन फेडले आणि त्यानंतरच माझी स्वप्न साकार करण्यासाठी साऊथ इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं. इथूनच माझा आणखी एक संघर्ष सुरू झाला. उत्तरेकडून आलेल्या मुलीला साऊथमध्ये आपली जागा मिळणवं खूप कठिण होतं."
advertisement
6/8
नेहानं सांगितलं, "मला साऊथ भाषा येत नव्हती त्यामुळे अनेक ऑडिशनमधून मी आऊट झाले. बऱ्याचदा संधी देण्याआधी काही डिमांडही केल्या जायच्या पण माझा स्वत:वर विश्वास होता. मला काही बनायचं आहे तर मी योग्य मार्गावर चालेन."
advertisement
7/8
नेहा एक फॅशन शो करत होती. याच दरम्यान एका दिग्दर्शकानं तिला पाहिलं आणि त्यांना तिचे लांबसडक केस खूप आवडले. त्यांनी तिला रिक्शा ड्राइव्हर या तेलुगु सिनेमासाठी कास्ट केलं.
advertisement
8/8
नेहानं सांगितलं, "साऊथ इंडस्ट्रीत मला खूप सन्मान मिळाला. त्यांनी मला स्वीकारलं आणि साऊथ एडॉप्टेट डॉटरचा किताबही दिला. हर हर महादेवा या पौराणिक मालिकेतून नेहाने टेलिव्हिजनवर काम केलं. मल्याळम, तमिळ, तेलुगु, अशा अनेक साऊथ भाषांतील सिनेमांत तिनं काम केलं आहे."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
बालपणीच गेले वडिल, PCO बूथ, ज्वेलरी शॉपमध्ये केलं काम; आज आहे फिल्म इंडस्ट्रीची दत्तक अभिनेत्री