
सध्या महानगरपालिका निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे.त्यामुळे राज्यात काही पक्षांच्या युती होताना पाहायला मिळत आहेत.त्यावरुन आता शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्यावर मोठं विधान केलं आहे.ते म्हणाले, "राजकारणात कोणतीही गोष्ट अशक्य नसते.राजकारणात शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले तर कुणालाही आश्चर्य वाटू नये."
Last Updated: Dec 26, 2025, 18:35 ISTमहानगरपालिका निवडणुकांचं बिगुल बाजताच अनेक पक्षांमध्ये अनेक कारणांनी मतभेद पाहायला मिळत आहेत. आता छ.संभाजीनगरमध्ये महायुती सरकारमध्ये वादाची ठिणगी पाहायला मिळत आहे. तेथील राष्ट्रवादी शहराध्यक्ष अभिजीत देशमुख हे नाराजी व्यक्त करत म्हणाले, "भाजप-सेनेला संभाजीनगरात घराणेशाही रुजवायची आहे. युतीसाठी एनसीपीला आमंत्रण नाही. एनसीपी आता शंभर जागांवर स्वबळावर लढणार"
Last Updated: Dec 26, 2025, 20:12 ISTराज्यात सर्व पक्षांमध्ये नेत्यांचं इन आऊट सुरुच आहे. आजच नेते प्रशांत जगताप यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तेव्हा त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले," राजकारण बंद करेन पण काँग्रेसमधून आता जाणार नाही. ज्या काँग्रेस पक्षाला शिव, फुले,शाहू, आंबेडकर विचारांचा वारसा आहे, पक्षाला नेहरु आणि गांधींची विचारधारा आहे, त्या पक्षात मी सहभागी होण्याचा निर्णय घेतला."
Last Updated: Dec 26, 2025, 19:56 ISTमहानगर पालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजंलं असतानाच आता सर्व पक्ष निवडणुकीच्या जोरदार तयारीला लागलेले पाहायला मिळत आहेत. एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. त्यातच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधूवर टीका केली आहे. ते म्हणाले, "आमची युती सत्तेसाठी, खूर्चीसाठी झाली नाही, स्वार्थासाठी झाली नाही. कहीजण अस्तित्व टिकवण्यासाठी युती करतायत."
Last Updated: Dec 26, 2025, 19:41 ISTमहापालिका निवडणूकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार का ? हा सर्वांना प्रश्न पडला आहे.त्यातच आता खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवारांसोबत भेट घेतली.ते म्हणाले,"प्राथमिक चर्चा झाली.आम्ही वरिष्ठांशी चर्चा करुनच निर्णय घेणार आहोत."
Last Updated: Dec 26, 2025, 19:15 ISTएका वर्तमानपत्रात सांस्कृतीक विभागाच्या जाहिरातीमध्ये गणपती बाप्पाला सांताक्लॉजची टोपी घालण्यात आली होती.त्यामुळे आता विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे.तर हिंदू महासभेकडून पुण्यात आंदोलनाचा इशारा दिला आहे.तसेच संबंधीत सांस्कृतीक मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधक करत आहेत.
Last Updated: Dec 26, 2025, 18:53 IST