काय आहे सलमान खानची पान मसाला जाहिरात केस?
'राजश्री पान मसाला'च्या एका जाहिरातीत सलमान खान असं म्हणतो की, यामध्ये केशर आहे आणि हे फक्त ५ रुपयांत उपलब्ध आहे. यावर कोटा येथील वकील ॲडव्होकेट इंद्रमोहन सिंह हनी यांनी आक्षेप घेतला. त्यांनी रोकठोकपणे एक मुद्दा मांडला, "केशरचा भाव बाजारात ४ लाख रुपये किलो आहे, मग ५ रुपयांच्या पाकिटात खरंच केसर असू शकतं का? ही निव्वळ तरुणांची फसवणूक असून त्यांच्या आरोग्याशी चालवलेला खेळ आहे." या जाहिरातीमुळे तरुण वर्ग कॅन्सरसारख्या आजारांना बळी पडू शकतो, असा दावा करत त्यांनी कोर्टात धाव घेतली.
advertisement
या आरोपांवर सलमान खानने आपल्या वकिलामार्फत कोर्टात उत्तर दाखल केलं. त्यात त्याने म्हटलं की, त्याने फक्त चांदीचा लेप असलेल्या वेलचीची जाहिरात केली आहे, गुटख्याची नाही. ९ डिसेंबरच्या सुनावणीत या प्रकरणाला नाट्यमय वळण आलं.
बॉलिवूड अभिनेत्रीचं रक्त खवळलं, बांगलादेशातील हत्याकांडावर शेअर केली जळजळीत पोस्ट
तक्रारदार इंद्रमोहन सिंह यांनी कोर्टात सांगितलं की, "जबाबवर केलेली सलमानची सही बनावट आहे." त्यांनी असा दावा केला की, ही स्वाक्षरी जोधपूर जेलमधील रेकॉर्ड किंवा इतर कोर्टातील कागदपत्रांशी अजिबात जुळत नाही. कोर्टाने ही बाब गांभीर्याने घेतली आणि आज २६ डिसेंबरला या स्वाक्षरीच्या फॉरेन्सिक तपासणीचे आदेश दिले आहेत.
२० जानेवारी २०२६ ला होणार सोक्षमोक्ष
आता या प्रकरणाचा निकाल लावण्यासाठी कोटा ग्राहक न्यायालयाने सलमान खानला २० जानेवारी २०२६ रोजी वैयक्तिकरित्या हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. सलमानला कोर्टात येऊन आपल्या स्वाक्षरीचे नमुने द्यावे लागणार आहेत, जेणेकरून त्याची पडताळणी केली जाईल. जर ही स्वाक्षरी बनावट निघाली, तर सलमान खानच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, सलमानच्या वकिलांनी असा मुद्दा मांडला आहे की, कोटा ग्राहक न्यायालयाला या प्रकरणात सुनावणी करण्याचा अधिकारच नाही. हे प्रकरण 'केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण' (CCPA) च्या अखत्यारीत येत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. मात्र, आता सर्वांचं लक्ष २० जानेवारीला काय होणार, याकडे लागलं आहे.
