Weather Alert: शनिवारी दातखिळी बसवणारी थंडी, पारा 10 अंशाच्या खाली, हवामान विभागाचा अलर्ट
- Reported by:Pragati Bahurupi
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रात डिसेंबर अखेर थंडीचा कडाका वाढला असून काही ठिकाणी पारा 10 अंशांच्या खाली गेला आहे. 27 डिसेंबरचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
1/7

राज्यात तापमानात चढ-उतार सुरू असले तरी थंडीला पोषक वातावरण कायम आहे. त्याने थंडीचा प्रभाव सर्वत्र जाणवत आहे. सकाळच्या वेळी हवेतील गारवा अधिक वाढला असून अनेक भागांत धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळत आहे. अहिल्यानगर, नाशिक आणि गोंदिया येथे किमान तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली नोंदवले गेले आहे. निफाड येथे 7 अंश सेल्सिअस इतकं राज्यातील नीचांकी तापमान नोंदवण्यात आलं आहे. 27 डिसेंबर रोजी राज्यातील प्रमुख शहरांमधील हवामानाची स्थिती कशी राहील? जाणून घेऊ.
advertisement
2/7
मुंबईत तापमानात किंचित घट जाणवत आहे. 27 डिसेंबर रोजी मुंबईतील कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअस इतकं राहण्याची शक्यता आहे. दिवसभर शहरात निरभ्र आकाश राहणार असून सकाळ आणि रात्रीच्या वेळी थंडावा जाणवेल. कोकणातील बहुतांश भागांतही अशीच हवामानस्थिती राहणार आहे.
advertisement
3/7
पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव कायम आहे. पुणे शहरात 27 डिसेंबर रोजी कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 10 अंश सेल्सिअस इतकं राहणार आहे. सकाळच्या वेळी पुणे आणि परिसरात धुक्याची शक्यता असून त्यामुळे वाहनचालकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील इतरही शहरांत गारवा कायम आहे.
advertisement
4/7
मराठवाड्यातही गारठा कायम आहे. छत्रपती संभाजीनगर येथे 27 डिसेंबर रोजी कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 11 अंश सेल्सिअस इतकं राहणार आहे. सकाळच्या वेळी थंड वातावरण राहील, तर दिवसभर निरभ्र आकाश असण्याचा अंदाज आहे. मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांत तापमानात फारसा बदल झालेला नाही.
advertisement
5/7
उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका अधिक तीव्र झाला आहे. नाशिकमध्ये 27 डिसेंबर रोजी कमाल तापमान 26 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 9 अंश सेल्सिअस इतकं राहणार असून हवामान विभागाकडून शीत लहरींचा इशारा देण्यात आला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात किमान तापमान 10 अंशांच्या खाली घसरले असून निफाड येथे 7 अंश सेल्सिअस इतकं राज्यातील नीचांकी तापमान नोंदवण्यात आलं आहे.
advertisement
6/7
विदर्भातही थंडी कायम आहे. नागपूर शहरात 27 डिसेंबर रोजी कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 11 अंश सेल्सिअस इतकं राहण्याची शक्यता आहे. येथे मुख्यतः निरभ्र आकाश राहणार आहे. गोंदिया जिल्ह्यात तापमान 10 अंशांच्या खाली नोंदवले गेल्याने सकाळच्या वेळी गारठा अधिक तीव्र जाणवत आहे.
advertisement
7/7
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील काही दिवस राज्यात थंडी कायम राहण्याची शक्यता आहे. राज्यात एकूणच तापमानाचा पारा खालच्या पातळीवर असल्याने नागरिकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. थंडीपासून बचावासाठी उबदार कपड्यांचा वापर करावा, सकाळी व रात्री अनावश्यक बाहेर जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: शनिवारी दातखिळी बसवणारी थंडी, पारा 10 अंशाच्या खाली, हवामान विभागाचा अलर्ट