TRENDING:

Kangana Ranaut: बॉलिवूडची 'पंगा गर्ल' शिवभक्तीत तल्लीन! 12 ज्योतिर्लिंगांच्या संकल्पपूर्तीसाठी कंगना घृष्णेश्वर चरणी

Last Updated:
‎पद्मश्री पुरस्कार विजेती, हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघाची भाजपची खासदार असलेल्याने कंगणाने देशातील 12 ज्योतिर्लिंगांच्या दर्शनाचा संकल्प केला असून, यानिमित्तानेच ती आज घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी आली होती.
advertisement
1/5
'पंगा गर्ल'शिवभक्तीत तल्लीन! ज्योतिर्लिंगांच्या संकल्पपूर्तीसाठी कंगना घृष्णेश्व
‎पद्मश्री पुरस्कार विजेती, हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघाची भाजपची खासदार असलेल्याने कंगणाने देशातील 12 ज्योतिर्लिंगांच्या दर्शनाचा संकल्प केला असून, यानिमित्तानेच ती आज घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी आली होती.
advertisement
2/5
‎प्रसिद्ध अभिनेत्री कंगणा राणावतने आज, 26 डिसेंबरला दुपारी वेरूळ येथील बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वराचे दर्शन घेतले.
advertisement
3/5
‎या ठिकाणी विधीवत अभिषेक आणि महापूजाही केली. गाभाऱ्यातील शांतता अन् भक्तिमय वातावरणात ती तल्लीत झाल्याचे पहायला मिळाले.
advertisement
4/5
‎‎या वेळी तिच्यासोबत सेल्फी, छायाचित्र घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. सध्या नाताळच्या सुट्यांमध्ये आधीच गर्दी, त्यात कंगणाची हजेरी यामुळे उत्साह शिगेला पोहोचला. दर्शनानंतर घृष्णेश्वर मंदिर देवस्थानतर्फे कंगणाचा सत्कार करण्यात आला.
advertisement
5/5
‎कंगणा घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी आल्याचे कळताच चाहते आणि भाविकांनी तिला मोबाइलमध्ये आणि डोळ्यांत साठविण्यासाठी अक्षरशः गर्दी केली. त्यामुळे पोलिसांची मोठी तारांबळ उडाली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Kangana Ranaut: बॉलिवूडची 'पंगा गर्ल' शिवभक्तीत तल्लीन! 12 ज्योतिर्लिंगांच्या संकल्पपूर्तीसाठी कंगना घृष्णेश्वर चरणी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल