Bangladesh: 'या' भारतीय स्टार्ससाठी वेडी आहे बांग्लादेशी जनता, एक तर बनला सुपरस्टार! कोण आहेत ते?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Bangladeshi Cinema: तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल, पण भारताच्या एका अभिनेत्याने तर बांगलादेशात अक्षरशः सुपरस्टार म्हणून राज्य केलंय! बांगलादेशी सिनेमांमध्ये आपली जादू चालवणारे ते भारतीय चेहरे कोण?
advertisement
1/8

मुंबई: सध्या बांगलादेशातील परिस्थिती आणि तिथे दिपू चंद्र दास या हिंदू तरुणाची झालेली अमानुष हत्या, यामुळे संपूर्ण भारतात संतापाची लाट आहे. बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार या घटनेचा निषेध करत आहेत.
advertisement
2/8
मात्र, याच बांगलादेशशी भारतीय चित्रपटसृष्टीचे एक वेगळे आणि रेशमी नातेही राहिले आहे. राजकारणात कितीही तणाव असला, तरी कलेने नेहमीच या सीमा ओलांडल्या आहेत. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल, पण भारताच्या एका अभिनेत्याने तर बांगलादेशात अक्षरशः सुपरस्टार म्हणून राज्य केलंय! बांगलादेशी सिनेमांमध्ये आपली जादू चालवणारे ते भारतीय चेहरे कोण?
advertisement
3/8
जेव्हा भारतात चंकी पांडेची कारकीर्द काहीशी संथ झाली होती, तेव्हा त्याने शेजारील देशाचा रस्ता धरला. चंकी पांडे हा बांगलादेशातील चित्रपटसृष्टीचा असा किंग बनला की, तिथले लोक त्याच्यासाठी अक्षरशः वेडे झाले होते. 'स्वामी केनो आसामी', 'बेश कोरेची प्रेम कोरेची' यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमुळे तो अनेक वर्ष बांगलादेशी सिनेसृष्टीचा नंबर १ चा सुपरस्टार राहिला. आजही तिथे चंकी पांडेची क्रेझ टिकून आहे.
advertisement
4/8
पश्चिम बंगालची खासदार आणि अभिनेत्री मिमी चक्रवर्ती हिनेही बांगलादेशी पडद्यावर आपली मोहोर उमटवली आहे. 'तूफान' या मोठ्या बजेटच्या चित्रपटात तिने मुख्य भूमिका साकारली आणि तिथल्या प्रेक्षकांना आपल्या अभिनयाने घायाळ केले.
advertisement
5/8
'जन्नत' फेम सोनल चौहानने आता बांगलादेशी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलंय. ती तिथला सुपरस्टार शाकिब खान याच्यासोबत 'दर्द' या पॅन-इंडिया चित्रपटात झळकली आहे. तिची ही नवी इनिंग सध्या चर्चेत आहे.
advertisement
6/8
बंगाली आणि हिंदी चित्रपटांतील तगडा अभिनेता जिशू सेनगुप्ता याने अलिकडेच बांगलादेशात धुमाकूळ घातला. तिथला सुपरस्टार शाकिब खान याच्या 'तूफान' चित्रपटात जिशूने एका जबरदस्त खलनायकाची भूमिका साकारली. हा चित्रपट केवळ बांगलादेशातच नाही, तर भारतातही गाजला.
advertisement
7/8
'कहानी' फेम परमब्रत केवळ भारतातच नाही, तर बांगलादेशातही तितकाच लोकप्रिय आहे. त्याने 'भुवन माझी' आणि 'शोनिबार बिकेल' यांसारख्या सामाजिक आणि ऐतिहासिक विषयांवरील बांगलादेशी चित्रपटांत काम करून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
advertisement
8/8
आपल्या बोल्ड आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाणारी स्वास्तिका २०२४ मध्ये एका मोठ्या बांगलादेशी चित्रपटात दिसणार आहे. 'अल्ता बानू कोखोनो जोत्स्ना देखेनी' या चित्रपटात ती शरीफुल राजसोबत मुख्य भूमिकेत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bangladesh: 'या' भारतीय स्टार्ससाठी वेडी आहे बांग्लादेशी जनता, एक तर बनला सुपरस्टार! कोण आहेत ते?