TRENDING:

17 वर्षांपूर्वीची हॉरर फिल्म, OTT वर येताच No. 1; काळजाचा थरकाप उडवणारा सस्पेन्स, क्लायमॅक्स उडवेल झोप

Last Updated:
Best Horror Film on OTT: १७ वर्षांपूर्वी म्हणजेच २००८ मध्ये विक्रम भट्ट नावाच्या एका दिग्दर्शकाने रुपेरी पडद्यावर एक अशी भयाण कथा मांडली होती, जिने लोकांच्या काळजाचा ठोका चुकवला होता.
advertisement
1/8
17 वर्षांपूर्वीची हॉरर फिल्म, OTT वर येताच No. 1; काळजाचा थरकाप उडवणारा सस्पेन्स
मुंबई: रात्रीची वेळ... शांतता... आणि अचानक जुन्या वाड्याच्या दरवाजाचा कडाडणारा आवाज! आठवतंय का? बरोबर १७ वर्षांपूर्वी म्हणजेच २००८ मध्ये विक्रम भट्ट नावाच्या एका दिग्दर्शकाने रुपेरी पडद्यावर एक अशी भयाण कथा मांडली होती, जिने लोकांच्या काळजाचा ठोका चुकवला होता.
advertisement
2/8
ती फिल्म म्हणजे '१९२०'. अनेक वर्षांनंतरही या चित्रपटाची दहशत कमी झालेली नाही, कारण डिसेंबर २०२५ मध्ये हा चित्रपट पुन्हा एकदा Amazon Prime Video वर 'नंबर १' वर ट्रेंड करत आहे.
advertisement
3/8
आज आपण जिला 'द केरला स्टोरी'मुळे ओळखतो, त्या अदा शर्माने याच चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. सुंदर 'लिसा'पासून ते एका भयानक पछाडलेल्या स्त्रीपर्यंतचा तिचा प्रवास पाहून तेव्हा थिएटर्समध्ये बसलेल्या प्रेक्षकांची चांगलीच भंबेरी उडाली होती.
advertisement
4/8
तिचे ते हवेत लटकणारे सीन आणि तो विद्रूप झालेला चेहरा आजही हॉरर चाहत्यांच्या आठवणीत ताजा आहे. नवख्या अदाने पहिल्याच सिनेमात अभिनयाची अशी काही उंची गाठली की, लोक अक्षरशः श्वास रोखून तो थरार बघत होते.
advertisement
5/8
चित्रपटाची कथा १९२० च्या कालखंडात घडते. अर्जुन आणि लिसा एका जुन्या, भव्य हवेलीत राहायला येतात. त्यांना या वाड्याचं रूपांतर एका लक्झरी हॉटेलमध्ये करायचं असतं. पण, त्या वाड्याच्या भिंतींआड एक काळं गुपित दडलेलं असतं. १८५७ च्या उठावात एका देशद्रोही सैनिकाचा छळ होऊन मृत्यू झालेला असतो आणि त्याचा आत्मा बदला घेण्यासाठी तिथे भटकत असतो.
advertisement
6/8
तो आत्मा जेव्हा लिसाच्या शरीराचा ताबा घेतो, तेव्हा सुरू होतो खऱ्या अर्थाने मृत्यूचा खेळ. या चित्रपटात फक्त हॉररच नाही, तर देशभक्ती आणि प्रेमाचा एक वेगळा मिलाफ पाहायला मिळाला. शेवटच्या मिनिटाला झालेलं एक्सॉर्सिझम आजही बॉलीवूडमधील सर्वात भयानक दृश्यांपैकी एक मानलं जातं.
advertisement
7/8
विक्रम भट्ट यांनी हा चित्रपट अवघ्या ६ ते ७ कोटींच्या बजेटमध्ये बनवला होता. पण कथेची ताकद आणि संगीताची जादू इतकी जबरदस्त होती की, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १४ कोटींहून अधिक कमाई करत हिटचा टॅग मिळवला. आज या चित्रपटाचे अनेक सीक्वेल्स आले असले, तरी जो थरार पहिल्या भागात होता, तो पुन्हा कधीच अनुभवायला मिळाला नाही.
advertisement
8/8
डिसेंबर २०२५ मध्ये नेटफ्लिक्स आणि प्राइम व्हिडिओवर हा चित्रपट पुन्हा एकदा धुमाकूळ घालत आहे. विशेषतः प्राइम व्हिडिओवर हा चित्रपट सध्या टॉप ट्रेंडमध्ये आहे. हॉरर सिनेमांच्या यादीत आजही याला IMDb वर ६.५ रेटिंग आहे, जे या जॉनरसाठी खूप चांगलं मानलं जातं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
17 वर्षांपूर्वीची हॉरर फिल्म, OTT वर येताच No. 1; काळजाचा थरकाप उडवणारा सस्पेन्स, क्लायमॅक्स उडवेल झोप
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल