TRENDING:

Salman Khan Birthday: 60 वर्षीही सिंगलच राहिला सलमान, 18 अभिनेत्रींना केलंय डेट, 7 व्या GF चं नाव तुम्ही ऐकलंही नसेल

Last Updated:
Salman Khan Birthday: पैसा, प्रसिद्धी, मान-मरातब सगळं काही पायाशी लोळण घेत असताना, प्रेमाच्या बाबतीत मात्र सलमानचं नशीब नेहमीच खराब राहिलं आहे.
advertisement
1/12
60 वर्षीही सिंगलच राहिला सलमान, 18 अभिनेत्रींना केलंय डेट
मुंबई: "भाईजान लग्न कधी करणार?" हा प्रश्न कदाचित बॉलिवूडच्या इतिहासातील सर्वात मोठा प्रश्न बनला असावा. सर्वांचा लाडका सलमान खान 27 डिसेंबरला 60 वा वाढदिवस साजरा करणार आहे.
advertisement
2/12
त्याच्या वाढदिवसाच्या आधीपासूनच चाहत्यांनी गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तोबा गर्दी केली आहे. पण या सगळ्या झगमगाटात एक गोष्ट मात्र कायम अधुरी राहिलीये, ती म्हणजे सलमानचं खाजगी आयुष्य.
advertisement
3/12
पैसा, प्रसिद्धी, मान-मरातब सगळं काही पायाशी लोळण घेत असताना, प्रेमाच्या बाबतीत मात्र सलमानचं नशीब नेहमीच खराब राहिलं आहे.
advertisement
4/12
आजवर तब्बल १८ हून अधिक सौंदर्यवतींसोबत त्याचं नाव जोडलं गेलं, काहींसोबत तर लग्नाच्या पत्रिकाही छापल्या गेल्या, पण नशिबाने अशी काही साथ सोडली की भाईजान आजही एकटाच आहे.
advertisement
5/12
सलमानच्या आयुष्यातील सर्वात जुनं आणि गंभीर नातं म्हणजे संगीता बिजलानी. ८० च्या दशकाच्या काळात ही जोडी बॉलिवूडची मोस्ट फेव्हरेट होती.
advertisement
6/12
असं म्हणतात की, दोघांच्या लग्नाच्या पत्रिकाही छापून तयार होत्या, पण शेवटच्या क्षणी काहीतरी भयानक घडलं की सलमान बोहल्यावर चढता-चढता राहिला. आजही संगीता खान कुटुंबाच्या प्रत्येक कार्यक्रमात दिसते, पण नातं मात्र फक्त मैत्रीचं उरलंय.
advertisement
7/12
त्यानंतर ९० च्या दशकात एन्ट्री झाली ती सोमी अलीची. सोमी चक्क सलमानशी लग्न करण्यासाठीच पाकिस्तानातून भारतात आली होती. ८ वर्ष हे नातं टिकलं, पण सलमानच्या रागीट स्वभावामुळे हे प्रकरणही फिसकटलं.
advertisement
8/12
बॉलिवूडच्या इतिहासात ऐश्वर्या राय आणि सलमान खानची लव्ह स्टोरी जेवढी गाजली, तेवढाच तिचा शेवटही वादग्रस्त ठरला. १९९९ ते २००२ दरम्यान हे दोघं एकमेकांच्या प्रेमात वेडे होते. पण सलमानचा पझेसिव्ह स्वभाव आणि काही वादामुळे ऐश्वर्याने हे नातं कायमचं तोडलं. या ब्रेकअपनंतर सलमान अक्षरशः कोलमडला होता.
advertisement
9/12
ऐश्वर्या गेल्यानंतर सलमानच्या आयुष्यात आली कतरिना कैफ. कतरिनाला बॉलिवूडमध्ये पाय रोवायला सलमाननेच मदत केली. हे नातं ५-६ वर्ष अतिशय स्थिर होतं.
advertisement
10/12
चाहत्यांना वाटलं होतं की आता तरी भाईजानचं लग्न होईल, पण तिथेही गाडी पुढे सरकली नाही. आज कतरिना विवाहित आणि एका मुलाची आई असली तरीही तिच्या सलमानसोबतच्या नात्याची आजही चर्चा होते.
advertisement
11/12
गेल्या अनेक वर्षांपासून रोमानियाची मॉडेल युलिया वंतूर सलमानच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. गॅलेक्सी अपार्टमेंट असो किंवा पनवेलचं फार्म हाऊस, युलिया सगळीकडे खान कुटुंबासोबत दिसते. पण आजही सलमानने या नात्यावर अधिकृत शिक्कामोर्तब केलेलं नाही.
advertisement
12/12
याशिवाय, शाहीन जाफरी (पहिले प्रेम), जफरिन खान, स्नेहा उल्लाल (ऐश्वर्याची कार्बन कॉपी), एली अवराम, डेझी शाह, एमी जॅक्सन, हेजल कीच, पर्सिस खंबाटा, झरीन खान, ब्रुना अब्दुल्ला, सामंथा लॉकवुड आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्यासोबतही सलमानच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या. 'बिग बॉस'मधील स्पर्धक मेहक चहल आणि क्लॉडिया सिस्ला यांच्याशीही त्याचं नाव जोडलं गेलं होतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Salman Khan Birthday: 60 वर्षीही सिंगलच राहिला सलमान, 18 अभिनेत्रींना केलंय डेट, 7 व्या GF चं नाव तुम्ही ऐकलंही नसेल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल