बॉलिवूड अभिनेत्रीचं रक्त खवळलं, बांगलादेशातील हत्याकांडावर शेअर केली जळजळीत पोस्ट
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Hindu Mob Lynching in Bangladesh: बांगलादेशातून सध्या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अनेक बातम्या समोर येत आहेत. या घटनेचे पडसाद आता बॉलिवूडमध्ये उमटले असून अनेक अभिनेत्रींनी या पाखंडी समाजाला आरसा दाखवला आहे.
advertisement
1/8

मुंबई: बांगलादेशातून सध्या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अनेक बातम्या समोर येत आहेत. ३० वर्षीय तरुण दिपू चंद्र दास याची केवळ ईश्वर निंदेच्या संशयावरून ज्या क्रूरपणे हत्या करण्यात आली, त्याने संपूर्ण जग हादरलंय.
advertisement
2/8
जमावाने आधी त्याला बेदम मारहाण केली आणि त्यानंतर जिवंत जाळून टाकलं. या घटनेचे पडसाद आता बॉलिवूडमध्ये उमटले असून अनेक अभिनेत्रींनी या पाखंडी समाजाला आरसा दाखवला आहे.
advertisement
3/8
विशेषतः गाझा हल्ल्यावर दुःख व्यक्त करणारे लोक आता आपल्याच हिंदू भावाच्या मृत्यूवर गप्प का? असा जळजळीत प्रश्न एका अभिनेत्रीने विचारला आहे. दाक्षिणात्य आणि हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री काजल अग्रवालने सर्वात आधी या विषयावर आवाज उठवला. तिने इन्स्टाग्रामवर 'ऑल आइज ऑन बांगलादेश हिंदूं' असा पोस्टर शेअर करत सर्वांना आरसा दाखवला आहे.
advertisement
4/8
"बांगलादेशात जे घडतंय, तो निव्वळ रानटीपणा आहे. ही काही एखादी वेगळी घटना नाही, तर हे नियोजनबद्ध हत्याकांड आहे. जर या अमानवीय कृत्याचे व्हिडिओ पाहून तुमच्या रक्तात उकळी फुटत नसेल, तर समजून जा की तुमचा ढोंगीपणा तुम्हाला आतून पोखरत चालला आहे. आपण जगाच्या पाठीवर कोठेतरी लांब घडणाऱ्या घटनांवर रडतो, पण आपल्याच घराशेजारी आपल्या भावाला जिवंत जाळलं जातंय, तेव्हा मात्र आपण मौन बाळगतो."
advertisement
5/8
अभिनेत्री जान्हवी कपूरनेही या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. तिने दिपू चंद्र दासच्या हत्येला कत्तल असं संबोधलं आहे. जान्हवीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, कट्टरवाद कोणत्याही स्वरूपात असला तरी त्याला विरोध केलाच पाहिजे. तिने सर्व सनातनी बांधवांना एकत्र येण्याचं आवाहन केलं असून, "जेव्हा आपल्याच भावाबहिणींवर अत्याचार होतात, तेव्हा गप्प बसणं हे माणुसकी गमावण्याचं लक्षण आहे," असं तिनं स्पष्टपणे बजावलं.
advertisement
6/8
ज्येष्ठ अभिनेत्री जया प्रदा यांनी एक व्हिडिओ शेअर करत समाजातील दुटप्पी भूमिकेवर ताशेरे ओढले. "गाझासाठी डोळे ओले करणाऱ्यांनो, आपल्याच धर्माच्या मुलाला जिवंत जाळलं गेलं, तेव्हा तुमची जीभ का शिवली गेली आहे?" असा सडेतोड प्रश्न त्यांनी विचारला.
advertisement
7/8
दुसरीकडे, प्रसिद्ध गायक टोनी कक्कड याने या परिस्थितीवर भाष्य करणारं एक गाणं प्रदर्शित केलं आहे. थेट उल्लेख टाळला असला तरी, समाजातील 'चार लोकांच्या' मानसिकतेवर त्याने संगीताच्या माध्यमातून टीका केली आहे, ज्याचा संबंध दिपूच्या हत्येशी जोडला जात आहे.
advertisement
8/8
दिपू चंद्र दास हा बांगलादेशातील मयमनसिंग येथील एका फॅक्टरीत काम करणारा तरुण होता. केवळ एका अफवेमुळे हिंसक जमावाने त्याला पकडलं, बेदम मारलं आणि अखेर झाडाला बांधून जिवंत जाळलं. या घटनेमुळे आता जगभरातील हिंदू समुदायात संतापाची लाट आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
बॉलिवूड अभिनेत्रीचं रक्त खवळलं, बांगलादेशातील हत्याकांडावर शेअर केली जळजळीत पोस्ट