TRENDING:

Ginger Garlic : लसूण-आलं जास्त दिवस कसं टिकवायचं? आजीबाईनी सांगितलेल्या ट्रिक्स नवीन सुनांच्याही कामाच्या

Last Updated:
बाजारातून ताजे आलं किंवा लसूण आणलं की काही दिवसातच आलं सुकायला लागतं किंवा लसणाला कोंब येतात आणि पाकळ्या आतून पोकळ होतात.
advertisement
1/8
लसूण-आलं जास्त दिवस कसं टिकवायचं? आजीबाईच्या ट्रिक्स सगळ्यांच्या कामाच्या
स्वयंपाक घरात आलं आणि लसूण, दोन्ही ही महत्वाचे मसाले आहेत. यामुळे जेवणाला चव येते. त्यात भाजी आणि डाळीला लसणीची फोडणी दिली तर त्याचा सुगंध आणि चव तर नेक्ट लेव्हल असते. पण गृहिणींची मोठी अडचण ही असते की, बाजारातून ताजे आलं किंवा लसूण आणलं की काही दिवसातच आलं सुकायला लागतं किंवा लसणाला कोंब येतात आणि पाकळ्या आतून पोकळ होतात.
advertisement
2/8
अनेकदा आपण घाईच्या वेळी जास्त प्रमाणात आलं-लसूण सोलून ठेवतो, पण ते नीट साठवलं नाही तर त्याला बुरशी लागते. महागाईच्या काळात अशा वस्तू फेकून देणं जीवावर येतं. म्हणूनच, आलं आणि लसूण महिनाभर ताजेतवाने कसे ठेवायचे, याच्या काही सोप्या आणि घरगुती ट्रिक्स आज आपण पाहणार आहोत.
advertisement
3/8
साठवण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे आलं-लसूण लवकर खराब होतात. खालील काही पद्धती वापरून तुम्ही त्यांची टिकण्याची क्षमता वाढवू शकता:
advertisement
4/8
1. आल्यासाठी 'कागदी पिशवी' किंवा 'झिपलॉक'चा वापरआल्याला ओलावा लागला की ते लगेच कुजायला लागतं.काय कराल? आलं बाजारातून आणल्यावर आधी ते पूर्णपणे कोरडं करा. त्यानंतर एका कागदी पिशवीत (Paper Bag) किंवा झिपलॉक बॅगमध्ये हवा काढून ठेवून द्या.जर आलं फ्रिजमध्ये ठेवायचं नसेल, तर ते एका बाऊलमध्ये 'वाळू' भरून त्यात दाबून ठेवा. यामुळे आलं अजिबात सुकत नाही आणि ताजे राहते.
advertisement
5/8
2. लसणाला हवी 'हवा'लसूण खराब होण्याचं मुख्य कारण म्हणजे त्याला हवा न मिळणे. अनेकदा आपण लसूण प्लास्टिकच्या डब्यात बंद करून ठेवतो, ज्यामुळे तो लवकर सडतो.काय कराल? लसूण नेहमी जाळीदार पिशवीत किंवा बांबूच्या टोपलीत ठेवा. लसूण साठवण्याची जागा कोरडी आणि अंधारी असावी. सूर्यप्रकाशामुळे लसणाला लवकर मोड येतात.
advertisement
6/8
3. आलं-लसूण पेस्ट साठवण्याची योग्य पद्धतरोजच्या धावपळीत आपण पेस्ट करून ठेवतो. पण ही पेस्ट 4-5 दिवसांतच हिरवी पडते किंवा त्याला वास येतो.काय कराल? पेस्ट वाटताना त्यात पाणी घालण्याऐवजी थोडे तेल आणि चिमूटभर मीठ टाका. तेल नॅचरल प्रिझर्व्हेटिव्ह म्हणून काम करतं. ही पेस्ट काचेच्या बाटलीत भरून फ्रिजमध्ये ठेवा, ती 15-20 दिवस आरामात टिकते.
advertisement
7/8
4. आल्याचे तुकडे करून साठवणेजर तुम्हाला वारंवार चहासाठी आलं लागत असेल, तर आल्याची साल काढून त्याचे छोटे तुकडे करा आणि एका हवाघट्ट डब्यात भरून ते 'फ्रीझर' मध्ये ठेवा. लागेल तेव्हा एक तुकडा काढून वापरता येतो, यामुळे चवही बदलत नाही.
advertisement
8/8
आपण अनेकदा आलं फ्रिजमध्ये उघडंच ठेवतो. फ्रिजमधील थंडाव्यामुळे आल्यातील रस सुकून जातो आणि ते लाकडासारखं कडक होतं. त्यामुळे आलं कधीही उघडं ठेवू नका, त्याला कागदात गुंडाळून ठेवल्यास त्याचा ओलावा टिकून राहतो. आलं आणि लसूण साठवणं ही काही मोठी गोष्ट नाही, फक्त त्यांना 'ओलावा' आणि 'हवा' या दोन गोष्टींपासून कसं वाचवायचं हे कळलं की काम सोपं होतं. या छोट्या सुधारणा केल्या तर तुमची किचनमधली धावपळ कमी होईल आणि पैशांचीही बचत होईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
Ginger Garlic : लसूण-आलं जास्त दिवस कसं टिकवायचं? आजीबाईनी सांगितलेल्या ट्रिक्स नवीन सुनांच्याही कामाच्या
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल