TRENDING:

Fluffy Idli : तुमचीही इडली कडक होतेय? Eno शिवाय मऊ आणि स्पॉंजी इडली बनवण्याची ही घ्या सोपी ट्रिक

Last Updated:
कधी इडली कडक होते, तर कधी ती फुगत नाही. मग ती फुलवण्यासाठी अनेकजण ईनो किंवा बेकिंग सोडा यांसारख्या केमिकल्सचा वापर करतात, जे आरोग्यासाठी तितकेसे चांगले नसतात.
advertisement
1/10
तुमचीही इडली कडक होतेय? Eno शिवाय मऊ आणि स्पॉंजी इडली बनवण्याची ही ट्रिक कामाची
सकाळचा नाष्टा असोत किंवा मुलांचा डबा, आपल्या डोळ्यासमोर येणारा सर्वात पहिला आणि आरोग्यदायी पदार्थ म्हणजे 'वाफाळलेली इडली'. पांढरीशुभ्र, मऊ आणि चटणी-सांभरसोबत मिळणारी इडली केवळ दक्षिण भारतातच नाही, तर आता महाराष्ट्रातील घराघरांत आवडीने खाल्ली जाते. पण, घरी इडली बनवताना अनेकांची एकच तक्रार असते ती म्हणजे घरी "हॉटेलसारखी इडली मऊ का होत नाही?"
advertisement
2/10
कधी इडली कडक होते, तर कधी ती फुगत नाही. मग ती फुलवण्यासाठी अनेकजण ईनो किंवा बेकिंग सोडा यांसारख्या केमिकल्सचा वापर करतात, जे आरोग्यासाठी तितकेसे चांगले नसतात. जर तुम्हालाही विना-केमिकल, कापसासारखी मऊ आणि लुसलुशीत इडली खायची असेल, तर आज आम्ही तुमच्यासाठी अशा काही खास टिप्स घेऊन आलो आहोत, ज्यामुळे तुमची इडली होईल अगदी परफेक्ट
advertisement
3/10
इडलीसाठी योग्य प्रमाण (साहित्य)इडली मऊ होण्याचं सर्वात मोठं रहस्य हे डाळ आणि तांदळाच्या प्रमाणात दडलेलं असतं.उडीद डाळ: 1 कपतांदूळ: 2 कप (शक्य असल्यास जाडा तांदूळ वापरावा)मीठ: चवीनुसार
advertisement
4/10
महत्त्वाची टीप: डाळीचे प्रमाण जास्त झाले तर इडलीला फक्त डाळीचीच चव येते आणि ती चवीला बिघडते, त्यामुळे 1:2 हे प्रमाण सर्वात उत्तम मानले जाते.
advertisement
5/10
हॉटेलसारखी इडली बनवण्याची योग्य पद्धत1. भिजवण्याची प्रक्रिया: सर्वात आधी उडीद डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर दोन्ही एकत्र करून पुरेसे पाणी घालून किमान 8 तास किंवा रात्रभर भिजत ठेवा. डाळ आणि तांदूळ जेवढे चांगले भिजतील, तेवढे पीठ छान तयार होईल.
advertisement
6/10
2. वाटताना घ्यायची काळजी: सकाळी भिजलेले डाळ-तांदूळ मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. वाटताना पीठ खूप पातळ किंवा खूप घट्ट होणार नाही याची काळजी घ्या. पीठ वाटून झाल्यानंतर ते एका मोठ्या भांड्यात काढून किमान 1 तास झाकून ठेवा, जेणेकरून त्यामध्ये नैसर्गिक 'फरमेंटेशन' (आंबण्याची प्रक्रिया) सुरू होईल.
advertisement
7/10
3. मीठ कधी टाकावे? एक तासानंतर पिठात चवीनुसार मीठ टाका. मीठ टाकल्यानंतर पीठ जास्त जोरात फेटू नका, अगदी हलक्या हाताने मिक्स करा. या नैसर्गिक प्रक्रियेमुळे पिठात हलका आंबटपणा येतो, जो इडलीला खरी चव देतो.
advertisement
8/10
4. वाफवण्याची कला: इडली पात्राला थोडे तेल लावून त्यात पीठ भरा. कुकरमध्ये थोडे पाणी घालून इडली स्टँड आत ठेवा. लक्षात ठेवा, कुकरची शिट्टी काढून टाका आणि मध्यम आचेवर 6 ते 7 मिनिटे वाफवून घ्या. 7 मिनिटांनंतर चाकू किंवा टूथपिक घालून चेक करा, जर ती स्वच्छ बाहेर आली तर समजा तुमची इडली तयार आहे.
advertisement
9/10
या इडलीचे खास फायदेया पद्धतीने बनवलेली इडली ईनो किंवा सोड्याशिवाय नैसर्गिकरित्या फुगते. त्यामुळे ती पचायला हलकी असते आणि बराच वेळ मऊ राहते. ही इडली तुम्ही नारळाची चटणी, शेंगदाणा चटणी किंवा वाफाळलेल्या सांभरसोबत सर्व्ह करू शकता. विशेष म्हणजे, याच पिठापासून तुम्ही कुरकुरीत डोसे देखील बनवू शकता.
advertisement
10/10
आता हॉटेलच्या इडलीची वाट पाहण्याची गरज नाही. वरील साध्या ट्रिक वापरून तुम्ही घरच्या घरी आरोग्यदायी आणि मऊ इडलीचा आनंद घेऊ शकता. पुढच्या वेळी जेव्हा पाहुणे येतील, तेव्हा या पद्धतीने इडली नक्की करून पहा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/रेसिपी/
Fluffy Idli : तुमचीही इडली कडक होतेय? Eno शिवाय मऊ आणि स्पॉंजी इडली बनवण्याची ही घ्या सोपी ट्रिक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल