TRENDING:

IPL 2026 : मॅच जिंकून दिली, तरी विराटला प्लेअर ऑफ द मॅच का मिळालं नाही?

Last Updated:

आरसीबीच्या या विजयाचा शिल्पकार हा विराट कोहली ठरला आहे. कारण त्याने 38 बॉलमध्ये 69 धावांची नाबाद खेळी करून आरसीबीला मॅच जिंकून दिली. आता कोहलीने इतक्या मेहनतीने मॅच जिंकून दिली, तरी त्याला प्लेअर ऑफ द मॅच का मिळालं नाही?

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
RCB vs SRH : आयपीएल 2026 च्या पहिल्याच सामन्यात आरसीबीने 201 धावांच भलं मोठं आव्हान अवघ्या 94 बॉलमध्ये पूर्ण करत हंगामाची धमाकेदार सूरूवात केली होती. आरसीबीच्या या विजयाचा शिल्पकार हा विराट कोहली ठरला आहे. कारण त्याने 38 बॉलमध्ये 69 धावांची नाबाद खेळी करून आरसीबीला मॅच जिंकून दिली. आता कोहलीने इतक्या मेहनतीने मॅच जिंकून दिली, तरी त्याला प्लेअर ऑफ द मॅच का मिळालं नाही? हे जाणून घेऊयात.
virat kohli
virat kohli
advertisement

सनरायझर्स हैदराबादने दिलेल्या 201 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीची सुरुवात खराब झाली होती.कारण फिल सॉल्ट 8 धावांवर बाद झाला होता.सॉल्ट बाद झाल्यानंतर विराट कोहली आणि देवदत्त पड्डीकलने आरसीबीचा डाव सावरला होता. यावेळी पड्डीकलने 26 बॉलमध्ये 61 धावांची वादळी खेळी केली होती.

त्यानंतर रजत पाटीदार आणि विराट कोहली मैदानात होते. पाटीदारने यावेळी 12 बॉलमध्ये 31 धावांची खेळी केली.त्यानंतर शेवटी टीम डेविड 16 आणि विराट 61 वर नाबाद राहिला. अशाप्रकारे आरसीबीने 94 बॉलमध्ये मॅच संपवत 6 विकेट राखून हा सामना जिंकला होता.आरसीबीच्या या विजयात विराटचा मोठा वाटा होता, तरी त्याला प्लेअर ऑफ द मॅच देण्यात आली नाही आहे.

advertisement

विराट कोहली ऐवजी आरसीबीकडून डेब्यू करणाऱ्या जेकब डफीला प्लेअर ऑफ द मॅच देण्यात आली आहे. कारण या सामन्यात जेकब डफीने त्याच्या दुसऱ्याच ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर अभिषेक शर्माला 7 धावांवर बाद केले होते.त्यानंतर त्याच ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर ट्रेविस हेडला 11 धावांवर बाद केले होते. अशाप्रकारे त्याने एकाच ओव्हरमध्ये सनरायझर्स हैदराबादच्या दोन्ही सलामीविरांना बाद केले होते.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
उन्हाळ्यात लिंबूचे दर तापले, कांद्याला सरासरी दर, APMC मार्केटमधून नवी अपडेट
सर्व पहा

यानंतर जेकॉब डफीने पुन्हा त्याच्या तिसऱ्या ओव्हरमध्ये नितीश रेड्डीला 1 धावांवर बाद केले होते.अशाप्रकारे त्याने 14 बॉलमध्ये त्याने 3 विकेट घेतल्या होत्या. तसेच जेकॉब डफीने त्याच्या 4 ओव्हरच्या स्पेलमध्ये 22 धावा देऊन 3 विकेट घेतल्या होत्या. डफीच्या याच कामगिरीच्या बळावर त्याला प्लेअर ऑफ द मॅच देण्यात आली आहे.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 : मॅच जिंकून दिली, तरी विराटला प्लेअर ऑफ द मॅच का मिळालं नाही?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल