24 किमी मायलेज, सेफ्टीमध्ये टँकसारख्या दणकट; फॅमिलीसाठी बेस्ट अशा भारतातील टॉप 3 डिझेल SUV
- Published by:Sachin S
Last Updated:
एसयूव्ही खरेदीकडे लोकांचा कल वाढला आहे. अशातच डिझेलवर धावणाऱ्या गाड्यांकडे जास्त कल आहे. कारण डिझेलची किंमती कमी असून मध्यमवर्गीयांची नेहमी फेव्हरेट राहिली आहे. भारतात अशा ३ एसयुव्ही आहे ज्यांची विक्री ही कायम सर्वाधिक राहिली आहे
advertisement
1/8

भारतात सध्या कार आणि एसयूव्हीच्याा किंमती कमी झाल्यापासून वाहन मार्केटमध्ये चांगलीच तेजी आली आहे. कारच्या किंमतीत आता एसयूव्ही सहज उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे एसयूव्ही खरेदीकडे लोकांचा कल वाढला आहे. अशातच डिझेलवर धावणाऱ्या गाड्यांकडे जास्त कल आहे. कारण डिझेलची किंमती कमी असून मध्यमवर्गीयांची नेहमी फेव्हरेट राहिली आहे. भारतात अशा ३ एसयुव्ही आहे ज्यांची विक्री ही कायम सर्वाधिक राहिली आहे. यामध्ये Kia Sonet, Tata Nexon आणि Mahindra XUV 3XO चा समावेश आहे.
advertisement
2/8
Tata Nexon : टाटा मोटर्सही सगळ्यात जास्त विक्री आणि लोकप्रिय असलेली Tata Nexon आहे. Tata Nexon ही एक सेफ्टी रेटिंगमध्ये ५ स्टार मिळवलेली एसयूव्ही आहे. Tata Nexon ची सुरुवाती किंमत १०.५४ लाखांपासून सुरू होते.
advertisement
3/8
तर टॉप एन्ड मॉडेल १४.१५ लाखांपर्यंत आहे. Tata Nexon मध्ये १.५-लीटर डिझेल इंजिन दिलं आहे, जे ११५ बीएचपी पॉवर आणि २६० एनएम टॉर्क जनरेट करतो. Tata Nexon मध्ये ६-स्पीड AMT ट्रान्समिशन दिलं आहे.
advertisement
4/8
मायलेजच्या बाबती बोलायचं झालं तर २४.०८ किमी इतकं मायलेज देते. Tata Nexon मध्ये दमदार फिचर्स दिले आहे. एवढंच नाहीतर सेफ्टीसाठी ६ एअरबॅग्स, ABS, EBD आणि ESP सह ADAS फिचर्स सुद्धा दिलं आहे.
advertisement
5/8
Kia Sonet : दक्षिण कोरियन कंपनी किआ मोटर्सने सेल्टॉसनंतर Kia Sonet लाँच केली होती. कमी कालावधीत Kia Sonet ने मार्केटवर आपली पकड मजबूत केली होती. Kia Sonet ही पेट्रोल आणि डिझेलमध्ये उपलब्ध आहे. Kia Sonet डिझेल ऑटोमॅटिकमध्येही येते. Kia Sonet डिझेल व्हेरियंटची किंमत ९.७७ लाखांपासून सुरू होते.
advertisement
6/8
टॉप एन्ड मॉडेल हे १४.०९ लाखांपर्यंत आहे. Kia Sonet मध्ये १.५-लिटर डिझेल इंजिन दिलं आहे जे ११६ बीएपी पॉवर आणि २५० एनएम टॉर्क जनरेट करतो. या एसयूव्हीमध्ये ६-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक (AT) ट्रान्समिशन दिलं आहे. मायलेजच्या बाबतीत बोलायचं झालं तर ही एसयूव्ही १८.६ किमी इतकं मायलेज देते.
advertisement
7/8
Mahindra XUV 3XO : महिंद्रा अँड महिंद्रा मोटर्सची Mahindra XUV 3XO ही एक एसयूव्ही सगळ्यात आलिशान एसयूव्हीपैकी एक आहे. Mahindra XUV 3XO ची किंमत १०.८५ लाखांपासून सुरू होते. तर टॉप एन्ड मॉडेल हे १३.३४ लाखांपर्यंत आहे.
advertisement
8/8
Mahindra XUV 3XO मध्ये १.५-लीटर डिझेल इंजिन दिलं आहे, जे ११७ बीएचपी पॉवर आणि ३०० एनएम टॉर्क जनरेट करतो. या एसयूव्हीमध्ये ६-स्पीड AMT ट्रान्समिशन दिलं आहे. विशेष म्हणजे, ही एसयूव्ही तब्बल २१.२ किमी इतकं मायलेज देते. Mahindra XUV 3XO मध्ये फिचर्स कमी नाही. यामध्ये रिफाईनमेंट, हायवे फोकस्ड पॉवर आणि ३६०-डिग्री कॅमेरा असे फिचर्स दिले असून सेफ्टीसाठी ६ एअरबॅग्स, ABS आणि स्टेबिलिटी कंट्रोल दिलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
24 किमी मायलेज, सेफ्टीमध्ये टँकसारख्या दणकट; फॅमिलीसाठी बेस्ट अशा भारतातील टॉप 3 डिझेल SUV