पेट्रोल-डिझेल कमी भेटलं तरी डोंट वरी! या 5 ट्रिक्सने वाढवा बाइकचं मायलेज, पैशांचीही होईल बचत
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
सध्या देशभरात पेट्रोल-डिझेलचा तुटवडा निर्माण होणार अशा चर्चा सुरू आहेत. यामुळे सर्वसामान्य टेन्शनमध्ये आहेत. पण टेंशन घ्यायचं काम नाही. तुम्ही काही ट्रिक्स फॉलो करुन तुमच्या बाइकचं मायलेज वाढवू शकता.
advertisement
1/7

मुंबई : जगात सुरू असलेल्या युद्धांमुळे सीएनजीच्या पुरवठ्यावर परिणाम झालाय. ज्यामुळे सर्वसामान्य लोक हे चिंतेत होते. मात्र आता पेट्रोल-डिझेल बाबतही तिच स्थिती निर्माण झालीये. लोकं पेट्रोल-पंपांवर रांगा लावताय. यासोबतच पेट्रोलच्या किंमतीही वाढताना दिसताय. तुम्ही याचं टेन्शन घेत असाल तर डोंट वरी. तुम्ही काही सोप्या ट्रिक्स फॉलो करुन कमी पेट्रोलमध्येही गाडी जास्त अंतर चालवू शकता.
advertisement
2/7
काही अशा स्मार्ट सवयी आहेत. ज्यामुळे तुमच्या बाइकचं मायलेज हे 10-20% पर्यंत वाढवता येऊ शकतं. यामुळे तुमच्या पैशांची बचत होईल. यासोबतच लाइफही वाढेल आणि पर्यावरणाला कमी नुकसान होईल. चला आपण अशाच ट्रिक्सविषयी जाणून घेऊया.
advertisement
3/7
स्मूथ रायडिंग फॉलो करा आणि स्पीड कंट्रोल करा : अचानक एक्सेलरेट करणे, जोरदार ब्रेक लावणे किंवा हाय स्पीड (60 km/h पेक्षा जास्त) वर चालवणे मायलेजसाठी हानिकारक आहे.40-60 km/h च्या स्टेबल स्पीडवर बाइक चालवा. जास्तीत जास्त बाइक्सला ऑप्टिमम मायलेज मिळतं. ट्रॅफिकमध्ये एंटिसिपेट करा, समोरची स्थिती पाहून हळुहळू ब्रेक लावा आणि गियर शिफ्टिंग स्मूथ ठेवा. हाय स्पीडवर एयर रेजिस्टेंस वाढतं. इंजिन जास्त फ्यूल तयार करते. तुम्ही रोज 50 किमी चालत असाल तर ही सवय फॉलो केल्यानेत महिन्यात 200-300 रुपयांची बचत होऊ शकते.
advertisement
4/7
नियमित सर्व्हिसिंग आणि मेंटेनेन्स करा : बाइकची सर्व्हिसिंग योग्य वेळी केल्याने इंजिन स्मूथ चालते. एयर फिल्टर स्वच्छ ठेवा. कारण खराब फिल्टर इंजिनमध्ये कमी हवा जाऊ देते. ज्यामुळे फ्यूलचं पूर्ण एमशिन होत नाही. इंजिन ऑइल वेळेवर बदला. योग्य ग्रेडचं फ्रेश ऑइल फ्रिक्शन कमी करते. स्पार्क प्लग, चेन लुब्रिकेशन आणि ब्रेक पॅड्सही चेक करा. प्रत्येक 3000-5000 किवर सर्व्हिस करा. चांगले मेंटेनेंस केल्यास बाइकचं मायलेज 10-15% टक्के वाढू शकतं.
advertisement
5/7
टायर प्रेशर योग्य ठेवा : टायरमध्ये योग्य प्रेशर ठेवल्याने मायलेज वाढवण्यात मदत होते. टायर अंडर-इन्फ्लेटेड असेल तर रोलिंग रेजिस्टेंस वाढतं. इंजिनला जास्त मेहनत करावी लागते आणि फ्यूल जास्त खर्च होते. मॅन्युअलमध्ये सांगितलेलं प्रेशर (सामान्यतः28-36 PSI) नुसार प्रत्येक आठवड्यात टायर चेक करा. योग्य प्रेशरने 5-10% पर्यंत मायलेज सुधारू शकता.
advertisement
6/7
ट्रॅफिक सिग्नलवर इंजिन बंद करा आणि अनावश्यक वजन कमी करा : जास्त काळपर्यंत रेड लाइटवर इंजन बंद करा. आयडलिंगमध्ये फ्यूल खर्च होते. बाइकवर अनावश्यक साहित्य म्हणजेच एक्स्ट्रा हेलमेट, टूल्स किंवा साहित्य ठेवणं टाळा. प्रत्येक एक्स्ट्रा किलो वजन इंजिनवर जास्त ओझं टाकते.
advertisement
7/7
चांगल्या क्वालिटीचं फ्यूल : तुम्ही इंधन भरताना विश्वसनीय पेट्रोल पंपावरुनच इंधन भरा. जिथे फ्यूलमध्ये कोणतीही भेसळ होत नसावी. नेहमी योग्य गियरवर गाडी चालवा. लो गियरमध्ये हाय स्पीड किंवा हाय गियरमध्ये लो स्पीड दोन्ही फ्यूल वेस्ट करतात. तुमच्या बाइकमध्ये इको मोड असल्यास त्याचा वापर करा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
पेट्रोल-डिझेल कमी भेटलं तरी डोंट वरी! या 5 ट्रिक्सने वाढवा बाइकचं मायलेज, पैशांचीही होईल बचत