उन्हाळ्यात खुपच जास्त वीज बिल येतं ना? टेन्शन कसलं घेताय? या ट्रिक ट्राय करा, होतो फायदा
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Reduce Electricity Bill In Summer: उन्हाळा सुरू झाला की, उष्णता वाढते. तसं वीज बिल वाढण्यासही सुरुवात होते. पण छोट्या-छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्यास तुमचं वीज बिल 25 ते 30 टक्क्यांनी कमी होऊ शकतं.
advertisement
1/7

मुंबई : भारतातील अनेक भागांमध्ये तीव्र उन्हाळा सुरू झालाय. लोक उष्णतेमुळे हैराण झालेय. हे असताना जास्त येणाऱ्या वीज बिलामुळेही लोकं टेन्शनमध्ये येतात. कारण या काळात एसी कूलर हे सतत चालत असतात. ज्यामुळे वीज बिल हे डबल स्पीडने पळू लागतं. पण तुम्ही काही सोप्या सवयी फॉलो केल्या तर तुमचं वीज बिल हे 25-30% नी कमी होऊ शकतं. चला जाणून घेऊया अशाच काही टिप्सविषयी ज्यामुळे तुमच्या खिशावरील भार हा कमी होईल.
advertisement
2/7
एसीचं 'मॅजिक नंबर' आहे 24°C : अनेकदा लोकं खोली लवकरच गार करण्याच्या नादात एसी 18°C वर सेट करतात. ज्यामुळे खोली लवकर थंड होत नाही, तर कंप्रेसरवरील लोड वाढतो. विशेषज्ञांनुसार, एसी 24°C ते 26°C च्या दरम्यान चालवणं बेस्ट आहे. हे तापमान आरामदायक आहे आणि यामुळे वीज वापरही खुप कमी होतो.
advertisement
3/7
एसी + पंखा एक भारी कॉम्बिनेशन : गे ऐकायला खुप विचित्र वाटू शकतं. पण एसीसोबत कमी स्पीडमध्ये फॅन लावणं फायदेशीर ठरतं. पंखा गार हवा पूर्ण खोलीमध्ये वेगाने सर्कुलेट करते. यामुले एसीला कमी मेहनत करावी लागते आणि खोली लवकर गार होते.
advertisement
4/7
दरवाजे-खिडक्या पॅक ठेवा : एसी चालवताना दरवाजे खिडक्या पॅक करा, जेणेकरुन बाहेरील हवा आत येणार नाही. खिडकी किंवा दरवाज्याच्या खाली गॅप असेल तर तो सील करा. गार हवा आत राहिली तर एसी कमी चालेल. या सोबतच एसीच्या फिल्टरमध्ये जमा झालेली धूल हवेचे मार्ग अडवते. यामुळे कूलिंग कमी होते आणि मशीनला जास्त वीज खर्च करावी लागते. प्रत्येक 15 दिवसात फिल्टर स्वच्छ करा. यामुळे एसीची लाइफही वाढेल आणि बिलही कमी होईल.
advertisement
5/7
स्टँडबाय मोड वापरू नका : टीव्ही किंवा चार्जर फक्त रिमोटने बंद करत असाल तर लक्षात ठेवा की, स्टँडबाय मोडही थोडी फार एनर्जी वापरते. म्हणूनच वापर झाल्यानंतर स्विच बोर्डवरुन प्लग बंद करावा.
advertisement
6/7
स्टार रेटिंगवर लक्ष द्या : तुम्ही नवं गजेट किंवा होम अप्लायंसेज खरेदी करण्याचा विचार करत असाल तर 5-स्टार रेटिंगच निवडा. सुरुवातीला हे थोडं महाग वाटू शकतं. पण दीर्घ काळात हे हजारो रुपयांची वीज बचत करू शकते.
advertisement
7/7
नैसर्गिक पद्धतीही खास : दुपारच्या वेळी हिरव्या रंगाचे पडदे लावा, जेणेकरुन उन थेट खोलीत येणार नाही. संध्याकाळी बाहेरचं तापमान खाली आल्यास, खिडक्या ओपन करा. यामुळे खोलीतील उष्णता पाहेर पडेल आणि तुम्हाला रात्री उशीरापर्यंत एसी चालवण्याची गरज पडणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
उन्हाळ्यात खुपच जास्त वीज बिल येतं ना? टेन्शन कसलं घेताय? या ट्रिक ट्राय करा, होतो फायदा