TRENDING:

Solapur: एक महिला दोन पुरुष, 14 दिवसांनी मृत आढळला बॉडी बिल्डर, अर्ध्या तासात येतो म्हणाला अन् परतलाच नाही!

Last Updated:

"अर्ध्या तासात घरी येतो, कैरीचं लोणचं आणि भाजी बनवून ठेव," असं पत्नीला सांगून घराबाहेर पडलेल्या एका तरुण जिम ट्रेनरचा दोन आठवड्यांनी अत्यंत धक्कादायक स्थितीत अंत झाला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सोलापूर : "अर्ध्या तासात घरी येतो, कैरीचं लोणचं आणि भाजी बनवून ठेव," असं पत्नीला सांगून घराबाहेर पडलेल्या एका तरुण जिम ट्रेनरचा दोन आठवड्यांनी अत्यंत धक्कादायक स्थितीत अंत झाला आहे. गेल्या १४ मार्चपासून बेपत्ता असलेल्या या तरुणाचा मृतदेह सोलापूर-विजापूर रस्त्यावरील सैफुल भागातील काटेरी झुडपात आढळून आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
solapur body builder death-2026-03-6bad6d3e4ba8bed134aa0f5f8bde3f8b
solapur body builder death-2026-03-6bad6d3e4ba8bed134aa0f5f8bde3f8b
advertisement

नेमकी घटना काय?

सचिन मच्छिंद्र माने (वय ३०, रा. विजापूर नाका) असं या मृत तरुणाचे नाव आहे. सचिन हा व्यवसायाने जिम ट्रेनर होता. तसेच त्याचं स्वतःचं मोबाईल शॉपीचं दुकानही होतं. शनिवार, १४ मार्च रोजी तो आपल्या पत्नीला लवकर घरी येतो, असं सांगून बाहेर पडला होता. मात्र त्यानंतर त्याचा मोबाईल बंद झाला. विजापूर नाका पोलीस ठाण्यात बेपत्ता होण्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र त्याचा कुठेच थांगपत्ता लागत नव्हता. त्याच्यासोबत काय घडलं? तो कुठे गेला? याबाबत कुणालाच काही माहीत नव्हतं.

advertisement

अखेर शुक्रवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास सोलापूर विजापूर रस्त्यावरील सैफुलजवळील एका निर्जन ठिकाणी, सागवानाच्या झाडाला रबरी पाईपने गळफास घेतलेल्या अवस्थेत सचिनचा मृतदेह आढळून आला. जवळच सापडलेला मोबाईल आणि इतर वस्तूंवरून त्याची ओळख पटवण्यात आली.

नातेवाईकांचा घातपाताचा आरोप

सचिन यांचा मृत्यू हा आत्महत्या नसून तो घातपात असल्याचा गंभीर आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. एका महिलेसह तिघांनी मिळून सचिन यांचा घातपात केला असावा, असा दावा नातेवाईकांनी केला. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. प्राथमिक वैद्यकीय अहवालात मृत्यूचे कारण 'गळफास' असल्याचे समोर आले असले, तरी पोलीस आता सर्व बाजूंनी तपास करत आहेत.

advertisement

दोन चिमुरड्यांचे छत्र हरपले

सचिनच्या निधनाने माने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी कल्याणी, तीन वर्षांची मुलगी ओजस्वी आणि अवघ्या दीड वर्षांचा मुलगा पार्थ असा परिवार आहे. एक उमदा बॉडी बिल्डर आणि जिम ट्रेनर म्हणून सचिनचा मित्रपरिवार मोठा होता. त्याच्या मृतदेहाची ओळख पटल्यानंतर शासकीय रुग्णालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला.

advertisement

पोलीस तपास सुरू

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबू इतके महाग का झाले, द्राक्षाची काय स्थिती? मार्केटमधून मोठी अपडेट
सर्व पहा

विजापूर नाका पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. "आम्ही या प्रकरणाचा तांत्रिक तपास करत आहोत. सीसीटीव्ही फुटेज आणि कॉल डिटेल्सच्या आधारे सचिन शेवटच्या वेळी कोणाच्या संपर्कात होते, याचा शोध घेतला जाईल," अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Solapur: एक महिला दोन पुरुष, 14 दिवसांनी मृत आढळला बॉडी बिल्डर, अर्ध्या तासात येतो म्हणाला अन् परतलाच नाही!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल