TRENDING:

161 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या इंडिगो विमानाचं फुल इमर्जन्सी लॅण्डिंग, हवेतच अचानक बंद पडलं इंजिन

Last Updated:

32 हजार फूट उंच हवेत असलेल्या विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाला होता. त्यामुळे 161 प्रवाशांचा जीव धोक्यात होता. अक्षरश: मृत्यूच्या दाढेत होते. सुखरुप लॅण्डिंगसाठी सगळे जण हात जोडून प्रार्थना करत होते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अनाउन्समेंट सुरू झाली तर काळजात धडधड वाढली, रनवेवर पळापळ सुरू झाली, आय रिपीट रनवे 28 रिकामा करा, आय रिपीट रन वे 28 रिकामा करा. आता या रनवेला तर लॅण्डिंग नव्हतं मग अचानक अनाउन्समेंट झाल्यामुळे गोंधळ उडाला. 32 हजार फूट उंच हवेत असलेल्या विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाला होता. त्यामुळे 161 प्रवाशांचा जीव धोक्यात होता. अक्षरश: मृत्यूच्या दाढेत होते. सुखरुप लॅण्डिंगसाठी सगळे जण हात जोडून प्रार्थना करत होते.
indigo has announced the launch of direct flights to six cities from navi mumbai international airport from 29 march 2026
indigo has announced the launch of direct flights to six cities from navi mumbai international airport from 29 march 2026
advertisement

शनिवारी सकाळची वेळ दिल्लीचं इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ नेहमीप्रमाणे गजबजलेलं होतं. तितक्यात एअर ट्रॅफिक कंट्रोलला एक धोक्याचा मेसेज मिळाला आणि संपूर्ण यंत्रणा हाय-अलर्टवर गेली. विशाखापट्टणमवरून दिल्लीला येणाऱ्या इंडिगो फ्लाईट 6E-579 च्या एका इंजिनमध्ये अचानक बिघाड झाला. विमानाचं लॅण्डिंग होण्यापूर्वीच इंजिन बिघडल्याने विमानतळ प्रशासनाने तातडीने फुल इमर्जन्सी लागू केली.

रनवेवर अग्निशन दलाच्या गाड्या आणि रुग्णवाहिका

advertisement

विमानाचं इंजिन निकामी झाल्याची बातमी समजताच रनवे 28 तातडीने रिकामी करण्यात आला. विमानाचं लॅण्डिंग होताना कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या, डझनभर रुग्णवाहिका आणि वैद्यकीय पथकं धावपट्टीच्या कडेला तैनात करण्यात आली. विमानातील प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला होता, मात्र वैमानिकाने कमालीचा संयम राखला आणि लॅण्डिंग केलं.

थरारक लँडिंग अन् सुटकेचा निश्वास

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबू इतके महाग का झाले, द्राक्षाची काय स्थिती? मार्केटमधून मोठी अपडेट
सर्व पहा

काही मिनिटांच्या थरारानंतर, वैमानिकाने विमान अत्यंत कौशल्याने धावपट्टीवर उतरवलं. सुदैवाने, विमानाचं लॅण्डिंग सुरक्षित झालं. विमानाने जमिनीला स्पर्श करताच प्रवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला. या घटनेत सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुरक्षित असून कोणालाही दुखापत झालेली नाही. काही दिवसांपूर्वीच कोलकात्यात तुर्की एअरलाईन्सच्या विमानात आग लागल्याची घटना घडली होती, आणि आता इंडिगोच्या इंजिनमधील बिघाडामुळे विमान प्रवासाच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. इंजिनमध्ये बिघाड कशामुळे झाला याचा तपास करण्याचा सूचना दिल्या आहेत.

advertisement

मराठी बातम्या/देश/
161 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या इंडिगो विमानाचं फुल इमर्जन्सी लॅण्डिंग, हवेतच अचानक बंद पडलं इंजिन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल