TRENDING:

Pune : खाकीचं स्वप्न अन् मृत्यूने गाठलं! पुण्यात पोलीस भरती दरम्यान तरुणाचा मृत्यू, शिवाजीनगर पोलीस ग्राउंडवर काय घडलं?

Last Updated:

Pune Police Bharti Death : भरती प्रकिया सुरू असताना तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. पोलीस भरती सुरू असताना धावताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Pune Police Bharti Youth Death (अभिजित पोटे, प्रतिनिधी) : पोलीस अधिकारी व्हावं असं अनेक तरुण तरुणींचं स्वप्न असतं. त्यासाठी अनेकजण कठोर मेहनत देखील घेतात. मात्र, खूप कमी लोकांना लोकसेवा बजावण्याची संधी मिळते. पोलीस भरतीच्या जागा कमी असल्याने अनेक स्पर्धात्मक वातावरण पहायला मिळतं. अशातच आता पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान एक धक्कादायक घटना पुण्यातून समोर आली आहे. पुण्यात पोलीस भरती दरम्यान तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
Pune Police Bharti Youth Purushottam Burkul Death
Pune Police Bharti Youth Purushottam Burkul Death
advertisement

हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ग्राउंड भरती प्रकिया सुरू असताना तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. पोलीस भरती सुरू असताना धावताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पुरुषोत्तम बुरकुल असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव असून तो भरती प्रक्रियेसाठी पुण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात उष्णतेचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे हा मृत्यू झालाय का? असा सवाल देखील विचारला जातोय.

advertisement

प्राथमिक वैद्यकीय तपासण्या करणं गरजेचं

ग्रामीण भागात बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर बहुतांश तरुणांचा कल पोलीस भरतीकडे असतो. पोलीस भरतीच्या तयारीसाठी तालुका पातळीवर जागोजागी अकॅडमी सुरू झालेल्या दिसून येतात. धावण्याच्या स्पर्धेत सहभागी होण्याआधी उमेदवारांनी काही प्राथमिक वैद्यकीय तपासण्या करणं गरजेचं आहे. जसं की हेमोग्लोबिन लेव्हल, ब्लड प्रेशर, हृदयाचे ठोके आणि ईसीजी इत्यादी, असं तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितलं आहे.

advertisement

हायड्रेशन नॉर्मल ठेवणे गरजेचं

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबू इतके महाग का झाले, द्राक्षाची काय स्थिती? मार्केटमधून मोठी अपडेट
सर्व पहा

दरम्यान, ज्या दिवशी धावण्याची स्पर्धा असते, त्या दिवशी शरिरातील पाण्याची पातळी म्हणजेच हायड्रेशन नॉर्मल ठेवणे गरजेचे असते. उन्हामध्ये बराच वेळ उभा राहिल्यामुळे किंवा धावल्यामुळे डिहायड्रेशनचा धोका असतो. त्याचप्रमाणे शरिरातील इलेक्ट्रॉईटची पातळी देखील खालावते. या सर्व गोष्टींचा हृदयावर विपरित परिणाम होऊन बीपी कमी होणे किंवा हृदयविकाराचा झटका येणे, याचा धोका वाढतो, असंही डॉक्टरांनी म्हटलं आहे.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Pune : खाकीचं स्वप्न अन् मृत्यूने गाठलं! पुण्यात पोलीस भरती दरम्यान तरुणाचा मृत्यू, शिवाजीनगर पोलीस ग्राउंडवर काय घडलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल