TRENDING:

Tata Sierra कार 2 लाख रुपयांच्या डाउन पेमेंटवर खरेदी केल्यास किती EMI येईल, पाहा कॅलक्युलेशन

Last Updated:
टाटा सिएरा कार ही लोकांच्या चांगलीच पसंतीस पडतेय. दरम्यान तुम्ही 2 लाखांच्या डाउन पेमेंटवर खरेदी केल्यास ईएमआय किती येईल. याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
advertisement
1/8
Tata Sierra कार 2 लाख रुपयांच्या डाउन पेमेंटवर खरेदी केल्यास किती EMI येईल, पाहा कॅलक्युलेशन
Tata Sierra EMI Calculation: अनेकांना कार घेण्याची इच्छा असते. पण बजेट नसल्याने लोकांना आपलं हे स्वप्न पूर्ण करता येत नाही. पण तुम्ही ईएमआय ऑप्शनचा वापर करुन आवडती कार खरेदी करू शकता. पण यापूर्वी डाउन पेमेंट आणि ईएमआयचं नियोजन करणं गरजेचं असतं. कारण हे तुमच्या कमाईच्या हिशोबाने तुम्हाला परवडणारं असायला हवं. दरम्यान टाटा मोटर्स पॅसेंजर व्हीकल्सने देशभरात आपले नवीन मॉडल सिएराची डिलिव्हरी सुरू केलीये. टाटा मोटर्सने गेल्या वर्षी सिएराला नवीन लूकमध्ये लॉन्च केलंय.
advertisement
2/8
भारतात टाटा सिएरा 11.49 लाख रुपये (एक्स-शोरुन प्राइज) च्या सुरुवाती किंमतीत खरेदी केली जाऊ शकते. तर या एसयूव्हीच्या टॉप मॉडलची एक्स-शोरुम किंमत 17.99 लाख रुपये आहे. आज आपण जाणून घेऊया की, Tata Sierra साठी 2 लाख रुपयांची डाउन पेमेंट केल्यावर दरमहा किती रुपयांचा EMI येईल.
advertisement
3/8
टाटा सिएराची किंमत : टाटा सिएराच्या बेस मॉडल स्मार्ट प्लसची एक्स शोरुम किंमत ही 11,49,000 लाख रुपये आहे. तर दिल्लीमध्ये याची ऑन-रोड प्राइज ही 13.30 लाख रुपये आहे. अशा प्रकारे टॉप मॉडल अडव्हेंचर प्लस पेट्रोल टर्बोची एक्स-शोरुम प्राइज 17.99 लाख रुपये आणि दिल्लीत याची ऑन-रोड प्राइज 20.75 लाख रुपये आहे. वेगवेगळ्या शहरं आणि वेगवेगळ्या अॅक्सेसरीजच्या हिशोबाने तुमच्या कारची ऑन-रोड प्राइजमध्ये थोडा-फार फरक असू शकतो.
advertisement
4/8
बेस मॉडल स्मार्ट प्लस : समजा टाटा सिएराचा बेस मॉडल स्मार्ट प्लस तुम्हाला खरेदी करायची असेल. तर त्याची ऑन-रोड प्राइज 13.30 लाख रुपये आहे. या कारसाठी तुम्हाला 2 लाख रुपयांची डाउन पेमेंट करावी लागेल. इतर 11.30 लाख रुपयांसाठी 5 वर्षांचं लोन घेणं गरजेचं आहे.
advertisement
5/8
तुमचं क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर बँका तुम्हाला 8.5 टक्केपर्यंत व्याजदर लोन देऊ शकतात. या कॅलक्युलेशनच्या आधारे तुम्हाल दरमहा जवळपास 23,193 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल. तुम्ही 3 वर्षांसाठी लोन घेतले तर तुम्हाला दरमहा जवळपास 35,685 रुपयांचा ईएमआय द्यावा लागेल. अशा प्रकारे तुम्ही 7 वर्षांसाठी लोन घेतले तर तुम्हाला दरमहा 17,902 रुपयांचा ईएमआय द्यावा लागेल.
advertisement
6/8
टॉप मॉडल अॅडव्हेंचर प्लस : तुम्हाला टाटा सिएराचा टॉप मॉडल अॅडव्हेंचर प्लस खरेदी करायचा असेल तर त्याची ऑन-रोड प्राइज 20.75 लाख रुपये आहे. या कारसाठी तुम्हाला 2 लाख रुपयांची डाउन पेमेंट करावी लागेल. इतर 18.75 लाख रुपयांसाठी 5 वर्षांचं लोन घ्यावं लागेल.
advertisement
7/8
8.5 टक्क्यांच्या व्याजदराच्या हिशोबाने तुम्हाला दरमहा जवळपास 38,486 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल. तुम्ही 3 वर्षांसाठी लोन घेतले तर तुम्हाला दरमहा जवळपास 59,216 रुपयांचा ईएमआय द्यावा लागेल. अशाप्रकारे तुम्ही 7 वर्षांसाठी लोन घेतल्यास तुम्हाला दरमहा 29,707 रुपये ईएमआय भरावा लागेल. तुम्हाला ईएमआयचं ओझं कमी करायचं असेल तर तुम्ही डाउन पेमेंटची अमाउंट वाढवू शकता.
advertisement
8/8
फायनेंशियल एक्सपर्ट्सचा सल्ला : फायनेंशियल एक्सपर्ट्स मानतात की, तुमच्या कारची किंमत ही तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या 50% हून जास्त नसावी. तसंच कार लोनचा ईएमआय, तुमच्या इन-हँड सॅलरीच्या 20 टक्क्यांहून जास्त नसावा. फायनेंशियल एक्सपर्ट असा सल्ला देतात. कारण तुमची आर्थिक स्थिती चांगली राहावी आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारची आर्थिक समस्या येऊ नये.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Tata Sierra कार 2 लाख रुपयांच्या डाउन पेमेंटवर खरेदी केल्यास किती EMI येईल, पाहा कॅलक्युलेशन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल