TRENDING:

पुण्यात 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार, नराधम घरात घुसला अन्.., धक्कादायक प्रकार उघड

Last Updated:

पुणे शहरातील चंदननगर परिसरात दोन मुलींना धमकावून आणि जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्यावर अत्याचार करण्यात आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Pune Crime News: पुणे शहरातील चंदननगर परिसरात दोन धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहेत. इथं दोन अल्पवयीन मुलींना धमकावून आणि जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्यावर अत्याचार करण्यात आला आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करत दोन नराधमांना अटक केली केली. अशाप्रकारच्या दोन घटना उघडकीस येताच परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
Ai generated News
Ai generated News
advertisement

पहिली घटना: आईच्या फिर्यादीनंतर नराधम गजाआड

पहिल्या घटनेत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने चंदननगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालाजी गुरुनाथ स्वामी (वय २७, राहणार लक्ष्मीनगर, येरवडा) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे.

पीडित मुलगी अल्पवयीन आहे, हे माहीत असूनही आरोपी तिच्यावर वारंवार अत्याचार करत होता. याबाबत जेव्हा पीडितेच्या आईला समजलं. तेव्हा आरोपीनं पीडितेच्या घरात घुसून तिच्या आईला आणि वडिलांना धमकी दिली. तसेच त्याने मुलीला धमकावून तिच्या असहायतेचा फायदा घेतला. पोलिसांनी पोक्सो (POCSO) आणि अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

advertisement

दुसरी घटना: फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार

चंदननगर परिसरातच घडलेल्या दुसऱ्या घटनेनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. एका २७ वर्षीय तरुणानं अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आणि त्यानंतर तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. पीडितेचे काही आक्षेपार्ह फोटो काढून ते सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी तो वारंवार देत होता. या धमकीला घाबरून पीडिता तणावाखाली होती, मात्र हे प्रकरण समोर येताच पोलिसांनी ऋतिक रावसाहेब लोणके (वय २७) याला अटक केली आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबू उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, दरात झाली वाढ, केळीला काय मिळाला भाव?
सर्व पहा

चंदननगर पोलिसांनी या दोन्ही प्रकरणांची गंभीर दखल घेतली आहे. आरोपींनी यापूर्वीही अशा प्रकारचं कृत्य केलं आहे का, किंवा त्यांच्यासोबत इतर कोणाचे लागेबांधे आहेत का, याचा तपास पोलीस करत आहेत. दोन्ही आरोपींची कसून चौकशी सुरू आहे.

मराठी बातम्या/पुणे/
पुण्यात 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार, नराधम घरात घुसला अन्.., धक्कादायक प्रकार उघड
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल