TRENDING:

मुंबई-पुणे प्रवास सुसाट, घाटातील कोंडी सुटणार, ‘मिसिंग लिंक’ची डेडलाईन ठरली, वाहतूक कधी सुरू?

Last Updated:

Missing link: मुंबई पुणे प्रवासासाठी बोगदे, उंच पूल आणि सरळ मार्गिकेच्या माध्यमातून सुरक्षित आणि वेगवान प्रवासाचा पर्याय तयार करण्यात आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील वाढती वाहतूक कोंडी, घाटातील धोकादायक वळणं आणि वारंवार होणारे अपघात यामुळे प्रवाशांचा प्रवास अनेकदा त्रासदायक ठरतो. अनेक वेळा किरकोळ अपघात किंवा तांत्रिक बिघाडामुळेही तासन्‌तास वाहतूक ठप्प होते आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. या सगळ्या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाकडे पाहिले जात आहे. आता लवकरच मिसिंग लिंकवरून वाहतूक सुरू होणार आहे.
घाटातील कोंडी सुटणार, मुंबई-पुणे प्रवास सुसाट, ‘मिसिंग लिंक’ची डेडलाईन ठरली, वाहतूक कधी सुरू?
घाटातील कोंडी सुटणार, मुंबई-पुणे प्रवास सुसाट, ‘मिसिंग लिंक’ची डेडलाईन ठरली, वाहतूक कधी सुरू?
advertisement

खोपोली एक्झिट ते सिंहगड इन्स्टिट्यूट या दरम्यान उभारण्यात येणारा सुमारे 13 किलोमीटर लांबीचा ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. सध्या लोणावळा–खंडाळा घाटातून जाणारा प्रवास नागमोडी वळणांमुळे सुमारे 19 किलोमीटरचा होतो. या नव्या मार्गामुळे हे अंतर सुमारे 6 किलोमीटरने कमी होत असून प्रवास अधिक सुलभ आणि जलद होणार आहे.

advertisement

पुणेकरांनो लक्ष द्या! आज हे महत्त्वाचे रस्ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद; घराबाहेर पडण्याआधीच पाहा पर्यायी मार्ग

या प्रकल्पात उभारण्यात आलेली अभियांत्रिकी कामे विशेष लक्षवेधी ठरत आहेत. सुमारे 650 मीटर लांबीचा केबल-स्टेड पूल पूर्णत्वास गेला असून त्यावर सध्या रंगकाम सुरू आहे. तसेच 23.5 मीटर रुंदीचा जगातील सर्वात रुंद बोगदाही या मार्गाचा भाग आहे. या वैशिष्ट्यांमुळे या प्रकल्पाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.

advertisement

View More

घाटातील कोंडीला कायमचा दिलासा

मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील खालापूर टोल नाका ते खंडाळा एक्झिट हा पट्टा वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील मानला जातो. येथे मोठ्या प्रमाणावर वाहनांची गर्दी होते आणि घाटातील वळणांमुळे कोंडी अधिक वाढते. ‘मिसिंग लिंक’मुळे हा घाट विभाग मोठ्या प्रमाणात टाळला जाणार असल्याने वाहतूक सुरळीत होण्यास मदत होत आहे. यामुळे केवळ वेळेची बचत होत नाही, तर अपघातांची शक्यताही लक्षणीयरीत्या कमी होते.

advertisement

डोंगराळ आणि अवघड भौगोलिक परिस्थितीत हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. बोगदे, उंच पूल आणि सरळ मार्गिकेच्या माध्यमातून सुरक्षित आणि वेगवान प्रवासाचा पर्याय तयार करण्यात आला आहे. त्यामुळे हा प्रकल्प अभियांत्रिकी कौशल्याचा उत्कृष्ट नमुना म्हणूनही ओळखला जात आहे.

1 मेपासून मार्ग खुला

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबू उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, दरात झाली वाढ, केळीला काय मिळाला भाव?
सर्व पहा

‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे सुमारे 97 टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले असून उर्वरित कामे अंतिम टप्प्यात आहेत. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने 1 मेपासून हा मार्ग वाहनचालकांसाठी खुला करण्यात येणार आहे. या मार्गामुळे मुंबई–पुणे प्रवासाचा वेळ सुमारे 30 मिनिटांनी कमी होणार असून प्रवास अधिक सुरक्षित, जलद आणि सुकर होणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
मुंबई-पुणे प्रवास सुसाट, घाटातील कोंडी सुटणार, ‘मिसिंग लिंक’ची डेडलाईन ठरली, वाहतूक कधी सुरू?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल