आता छोटी कार विकून टाका! फॅमिलीसाठी घ्या 27 किमी मायलेज, 5 स्टार सेफ्टी अन् किंमत 6 लाखांपासून! टॉप 5 SUV
- Published by:Sachin S
Last Updated:
. पूर्वी १० लाखांशिवाय एसयूव्ही दारात येत नव्हती पण आता ६ लाखांपासून स्वस्तात मस्त आणि मायलेजदार एसयूव्ही मार्केटमध्ये सहज उपलब्ध आहे. यामध्ये टाटा मोटर्स, हुंदई आणि निसान मोटर्सने स्वस्त एसयूव्ही देण्यामध्ये बाजी मारली आहे.
advertisement
1/9

भारतात सध्या कारपेक्षा एखादी SUV खरेदी करण्याकडे सर्वसामान्यांचा कल वाढला आहे. कारण, जीएसटीच्या दरात कपात झाल्यामुळे आता SUV च्या किंमती कमी झाल्या आहे. पूर्वी १० लाखांशिवाय एसयूव्ही दारात येत नव्हती पण आता ६ लाखांपासून स्वस्तात मस्त आणि मायलेजदार एसयूव्ही मार्केटमध्ये सहज उपलब्ध आहे. यामध्ये टाटा मोटर्स, हुंदई आणि निसान मोटर्सने स्वस्त एसयूव्ही देण्यामध्ये बाजी मारली आहे.
advertisement
2/9
पहिल्या क्रमांकावर येते टाटा मोटर्सची Tata Punch. अलीकडेच टाटा मोटर्सने Tata Punch चं फेसलिफ्ट मॉडेल लाँच केलं आहे. ही एक दणकट आणि दमदार अशी एसयूव्ही आहे. Tata Punch च्या बेस मॉडल Smart ची एक्स-शोरूम किंमत 5.59 लाखांपासून सुरू होते. ही एक बजेट एसयूव्ही असून तुम्हाला Mini Harrier चा फिल देईल.
advertisement
3/9
एवढंच नाहीतर सेफ्टमध्ये ही गाडी अव्वल आहे. टाटा पंचलाा ५ स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. Tata Punch iCNG 2026 फेसलिफ्ट अलीकडे लाँच करण्यात आलं आहे. यामध्ये १ लिटरचं इंजिन दिलं आहे. Tata Punch iCNG चं मायलेज हे २६.९९ किमी इतकं आहे. या Tata Punch iCNG ची किंमत ७.६४ लाखांपासून सुरू होते.
advertisement
4/9
Hyundai Exter: दक्षिण कोरियन कंपनी हुंदईची Exter ने मागील काही वर्षांपासून आपला दबदबा कायम राखला आहे. बॉक्सी लूक आणि दमदार फिचर्समुळे मध्यमवर्गीयांची ही कार फेव्हरेट ठरली आहे. अलीकडे नवीन फेसलिफ्ट व्हेरियंट लाँच करण्यात आलं आहे. या Hyundai Exter ची किंमत ५.७९ लाखांपासून सुरू होते. या एसयूव्हीमध्ये आणखी २५ नवे फिचर्स जोडले आहे.
advertisement
5/9
Hyundai Exter मध्ये 1.2-लिटर Kappa पेट्रोल 4-सिलेंडर इंजिन दिलं आहे, जे 83 PS पॉवर आणि 113.8 Nm टॉर्क जनरेट करतो. ट्रान्समिशन 5-स्पीड MT किंवा AMT आहे. CNG व्हेरिएंटमध्ये सेम इंजिन दिलं असून 69 PS पॉवर आणि 95.2 Nm टॉर्क जनरेट करतो. पण हे इंजिन फक्त मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये उपलब्ध आहे. मायलेजबद्दल बोलायचं झालं तर पेट्रोलमध्ये ही Hyundai Exter ही 19.2 ते 19.4 किमी आणि CNG व्हेरियंटमध्ये 27 किमीपेक्षा जास्त मायलेज देते.
advertisement
6/9
Nissan Magnite: जपानी कार उत्पादक कंपनी निसान मोटर्सने भारतात आपली सगळ्यात स्वस्त आणि मजबूत अशी Nissan Magnite एसयूव्ही आणली आहे. मागील काही वर्षांपासून या एसयूव्हीचा दबदबा अजूनही मार्केटमध्ये कायम आहे. Nissan Magnite चं बेस व्हेरियंट Visia मॉडेलची किंमत एक्स-शोरूम 5.62 लाखांपासून सुरू होते, कमी बजेटमध्ये ही सगळ्यात बेस्ट अशी एसयूव्ही आहे.
advertisement
7/9
Nissan Magnite मध्ये CNG सुद्धा पर्याय उपलब्ध आहे. अलीकडेच Nissan Magnite CNG ची लाँच झाली आहे. ही भारतातील सगळ्यात स्वस्त अशा एसयूव्हीपैकी एक आहे. या Nissan Magnite CNG किंमत ही ७ लाखांपासून सुरू होते. Nissan Magnite CNG मध्ये १ लिटरचं इंजिन दिलं आहे. मायलेजचा विचार केला तर तब्बल २४ किमी इतकं मायलेज देते. विशेष म्हणजे, ही एक टाटा मोटर्सच्या गााड्यासारखी ५ स्टार सेफ्टी रेटिंग असणार एसयूव्ही आहे.
advertisement
8/9
Renault Kiger ही एक स्वस्तात मस्त आणि स्टाईलिश अशी मिड साईज एसयूव्ही आहे. या Renault Kiger ही मस्कुलर अशी एसयूव्ही आहे. या Renault Kiger च्या Authentic बेस व्हेरियंटची किंमत 5.76 लाखांपासून सुरू होते.
advertisement
9/9
Renault Kiger मध्ये १.० लीटरचं इंजिन दिलं आहे. जे 72hp नॅचरली एस्पिरेटेड आणि 100hp टर्बो-पेट्रोल इंजिनचा पर्याय आहे. मायलेजबद्दल बोलायचं झालं तर पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये ही एसयूव्ही २० किमी इतकं मायलेज देते. तर CVT ऑटोमॅटिकमध्ये १८.२४ किमी इतकं मायलेज देते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
आता छोटी कार विकून टाका! फॅमिलीसाठी घ्या 27 किमी मायलेज, 5 स्टार सेफ्टी अन् किंमत 6 लाखांपासून! टॉप 5 SUV