50 प्रवाशांना घेऊन जाणारी बस नदीत कोसळली, घटनास्थळाचे भयावह Photo
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
50 प्रवाशांना घेऊन जाणारी बस अनियंत्रित होऊन पद्मा नदीमध्ये कोसळली आहे. या अपघाताचे भीषण फोटो समोर आले आहेत, ज्यात प्रवासी बसला लटकलेले दिसत आहेत.
advertisement
1/6

बांगलादेशच्या राजबारी येथील दौलतदिया फेरी टर्मिनलजवळ सुमारे 50 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसचा ताबा सुटला आणि बस पद्मा नदीमध्ये कोसळली.
advertisement
2/6
पुलावर अर्धे लटकलेले प्रवासी एकामागून एक नदीत पडू लागले. ढाक्याला जाणारी ही बस फेरी जहाजामध्ये चढण्याचा प्रयत्न करत होती, तेव्हा एका छोट्या फेरीच्या पोंटूनला बस धडकली आणि थेट 30 फूट खोल नदीमध्ये जाऊन पडली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार हे दृश्य इतकं भीषण होतं की बस क्षणार्धात पाण्याखाली अदृश्य झाली.
advertisement
3/6
हा अपघात संध्याकाळी 5.15 च्या सुमारास घडला, जेव्हा ढाक्याला जाणारी बस फेरीमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असताना पोंटूनवरून घसरली. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, बस अंदाजे 30 फूट खोल बुडाल्याने बचावकार्य अत्यंत कठीण झाले आहे.
advertisement
4/6
काही प्रवासी पोहून सुरक्षित बाहेर पडण्यात यशस्वी झाले, पण बस पूर्णपणे पाण्यात बुडाल्याने अनेक जण आत अडकल्याची भीती आहे.
advertisement
5/6
स्थानिक रहिवासी आणि प्रशासन बुडालेल्या बसमधून वाचलेल्यांना बाहेर काढण्यासाठी रुमाल आणि दोऱ्यांच्या साहाय्याने बचावकार्यात गुंतले आहेत. अग्निशमन दल, नागरी संरक्षण दल, पोलीस आणि स्थानिक डायव्हर्सची पथके घटनास्थळी उपस्थित आहेत. ढाका येथून तज्ज्ञांच्या एका पथकालाही बोलावण्यात आले आहे.
advertisement
6/6
बचाव पथकांनी बुडालेली बस शोधून काढली आहे, पण पाण्याचा जोरदार प्रवाह आणि अंधारामुळे अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढणे आव्हानात्मक बनले आहे. नदीकिनारी सर्वत्र आक्रोश पसरला आहे. बेपत्ता प्रवाशांचे कुटुंबीय आपल्या प्रियजनांचा शोध घेण्यासाठी धडपड करत आहेत.