TRENDING:

उन्हाळ्यात गाडीची फ्यूल टँक फूल करताय? थोडं थांबा! आधी हे वाचा

Last Updated:
उन्हाळा सुरू झालाय. या काळात आपल्यासोबतच आपल्या वाहनांचीही काळजी घेणं गरजेचं असतं. कारण उष्णतेचा परिणाम हा वाहनांवरही होतो. आज आपण अशीच एक खास ट्रिक जाणून घेणार आहोत.
advertisement
1/8
उन्हाळ्यात गाडीची फ्यूल टँक फूल करताय? थोडं थांबा! आधी हे वाचा
मुंबई : उन्हाळा सुरू झाला आहे. या काळात शाळांना सुट्टया असतात. ज्यामुळे लोकं हे आपल्या कुटुंबाला घेऊन फिरायला जायचं प्लॅनिंग करतात. अनेकांची तर तयारीही सुरू झाली असेल. तुम्हीही अशीच प्लॅनिंग करत असाल तर आणि गाडीची टँक फूल करण्याचा विचार असेल तर थोडं थांबा. तुम्हाला इंधन टँक फूल करण्यापूर्वी ही बातमी वाचणं महत्त्वाचं आहे. कारण असं न केल्यास या महागाईच्या काळात तुमच्यावरील खर्चाचा बोजा वाढू शकतो.
advertisement
2/8
आपल्यापैकी अनेक लोक हे बाहेरगावी जायचं असेल किंवा व्हॅकेशनवर कार घेऊन जायचं असेल तर आधीच गाडीची फ्यूल टँक फूल करुन घेतो. पण उन्हाळ्यात तुम्ही गाडीची फ्यूल टँक फूल करत असाल तर ही खुप मोठी चूक ठरू शकते. ज्याविषयी आपल्याला माहितीच नसते.
advertisement
3/8
उन्हाळ्यात टँक फूल करू नका : तुम्ही उन्हाळ्यात गाडीची टँक फूल करत असाल तर ही मोठी चूक ठरू शकते. खरंतर पेट्रोल आणि डिझेलचे लवकर बाष्पीभवन होते आणि उन्हाळ्यात तापमान खुप जास्त असतं. आपण गाडीची फ्यूल टँक फूल करतो तेव्हा त्यात पेट्रोल-डिझेलचे बाष्पीभवन झाल्यामुळे तयार होणाऱ्या गॅसला जागाच उरत नाही. यामुळे ऑटो एक्सपर्ट म्हणतात की, गाडीमध्ये फ्यूल भरताना 10 टक्के टँक रिकामी ठेवा. उन्हाळ्यात आणखी कोणती काळजी घ्यावी पाहूया...
advertisement
4/8
कारमध्ये ठेवू नका लायटर आणि परफ्यूम : तुम्ही स्मोकिंग करत असाल तर महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. कारमध्ये लायटर अजिबात ठेवू नका. अनेक लोक परफ्यूमही ठेवतात. तुम्ही उन्हाळ्यात हे दोन्हीही कारमध्ये सोडून कार पार्क करत असाल तर ही मोठी चूक ठरू शकते. कारण कारमध्ये हवा पास होणार नाही. ज्यामुळे लायटर आणि परफ्यूमची बॉटल गरम होऊन फूटू शकते. ज्यामुळे तुमच्या गाडीत आग लागू शकते.
advertisement
5/8
कार सावलीत उभी करा : गाडी पार्क करताना ती सावलीतच पार्क करा. हे शक्य नसेल तर किंमान कारचा 60-70 टक्के भाग सावलीत राहावा. यामुळे तुम्हाला ट्रपल फायदा होईल. पहिला फायदा असा होईल की तीव्र उन्हात गाडीचा रंग खराब होणार नाही. दुसरा फायदा म्हणजे, गाडीत बसाल तेव्हा तुम्हाला जास्त उष्णता जाणवणार नाही. तिसरा आणि अखेरचा फायदा गाडीत एसी चालवली तर कमी लोड येईल.
advertisement
6/8
जर खरोखरच हाय स्पीडवर रिव्हर्स गेअर टाकला, तर नेमकं काय घडतं? यावर जगभरातील अनेक ऑटोमोबाईल तज्ज्ञांनी आणि प्रसिद्ध यूट्यूब चॅनेल्सनी (उदा. MasterMilo, AutoVlog) प्रत्यक्ष प्रयोग करून काही निष्कर्ष काढले आहेत.
advertisement
7/8
टायरमधील हवेकडे द्या लक्ष : उन्हाळ्यात रोडही खुप तापलेला असतो. यावेळी कार तापलेल्या रोडवर चालते तेव्हा फ्रिक्शन आणि हीटमुळे टायरमध्ये हवेचं प्रेश वाढतं. यामुळे कार अनसेफ आणि अनकंफर्टेबल होते. यामुळे उन्हाळ्यात लांबचा प्रवास करताना टायरमध्ये 2 psi प्रेशर कमी ठेवा.
advertisement
8/8
अनेक लोकांना वाटतं की, नायट्रेझन गॅस बेस्ट ऑप्शन आहे. पण हे बेस्ट असण्याचे कोणतेही पुरावे नाहीत. म्हणून सामान्य हवा देखील चांगलीच असते. फक्त ती योग्य प्रमाणात असावी.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
उन्हाळ्यात गाडीची फ्यूल टँक फूल करताय? थोडं थांबा! आधी हे वाचा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल