आम्ही मूर्ख दिसतो का? गेल्या आठवड्यात सुरू झालेली मालिका पाहून प्रेक्षक संतप्त, म्हणाले 'बकवास'
- Published by:Priya Lad
Last Updated:
Marathi Serial : मालिका सुरू होऊन आठवडाच सुरू झाला आणि यात असा सीन दाखवण्यात आला की प्रोमो पाहून प्रेक्षकांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
advertisement
1/7

गेल्या काही दिवसात बऱ्याच नव्या मालिका सुरू झाल्या आहेत. त्यापैकीच एक ही मालिका जी पाहून प्रेक्षक संतप्त झाले आहेत. आम्ही मूर्ख दिसतो का? असा सवाल प्रेक्षकांनी विचारला आहे.
advertisement
2/7
या मालिकेच्या नव्या एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे. जो पाहून प्रेक्षकांच्या त्यावर प्रतिक्रिया आल्या आहेत. मालिकेचाच प्रेक्षकांनी बकवास म्हटलं आहे.
advertisement
3/7
प्रोमोत तुम्ही पाहू शकता लग्नाची गडबड सुरू असते. या लग्नासाठी आलेलं एक कुटुंब. या कुटुंबातील 4 बहिणी. ज्यांचं एकमेकांवर खूप प्रेम असतं. या बहिणींचा द्वेष करत असते ती त्यांची मावसबहीण.
advertisement
4/7
ही मावसबहीण या बहिणींना आईवडिलांनी बोलवल्याचं सांगून एका रूममध्ये नेते आणि तिथं या बहिणींनी कोंडून ठेवते. आपल्याला आपल्या चुलत बहिणीने कोंडलं आहे, याची कल्पना या बहिणींना नाही. त्यांना वाटतं दरवाजा चुकून लॉक झाला. दरवाजा कुणीतरी उघडावा म्हणून त्या दरवाजा ठोकवतात आणि मदत मागतात. तोपर्यंत सगळ्यात छोटी बहीण चक्कर येऊन कोसळते.
advertisement
5/7
ही मालिका सुरू होऊन आठवडाच उलटला आहे. त्यामुळे मालिका सुरू झाली नाही आणि षडयंत्र सुरू झालं अशी कमेंट करत एका युझरने याला बकवास म्हटलं आहे.
advertisement
6/7
तर बहुतेक युझर्सनी या मालिकेला 36 गुणी जोडीसारखीच असल्याचं म्हटलं आहे. आम्ही आता पाहतोय ते आधी पाहिल्यासारखं वाटतंय, आम्ही मूर्ख दिसतो का? असं प्रेक्षकांनी म्हटलं आहे.
advertisement
7/7
आता ही मालिका नेमकी कुठली. तर सनई चौघडे. 16 मार्चपासून झी मराठीवर सुरू झालेली ही मालिका आहे. ज्यातील एका सीनवर याआधीही आक्षेप घेण्यात आला होता. ज्यात या मालिकेतील हिरो जयची आई तेजस्विनी मालिकेतील हिरोईन शर्वरीवर चोरीचा आळ घेत तिच्या थोबाडीत मारते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
आम्ही मूर्ख दिसतो का? गेल्या आठवड्यात सुरू झालेली मालिका पाहून प्रेक्षक संतप्त, म्हणाले 'बकवास'