Bigg Boss Marathi 6 : स्टोअर रूममध्ये जाताच किंचाळला सागर; 'बिग बॉस'च्या घरात हे काय दिसलं?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Bigg Boss Marathi 6 Sagar Karande : माइक चेंज करण्यासाठी म्हणून सागर बिग बॉस मराठीच्या घरातील स्टोअर रूममध्ये केला आणि त्याला धक्काच बसला.
advertisement
1/7

बिग बॉस मराठी 6 च्या घरातील वातावरण सध्या खूप इमोशनल झालं आहे. कारण सदस्यांचं खरं कुटुंब त्यांना भेटायला आलं. त्यामुळे सध्या वाद, भांडणं यापेक्षा प्रेमच प्रेम दिसतं आहे. अशा वातावरणात सागर कारांडेला मात्र मोठा धक्का मिळाला आहे.
advertisement
2/7
घरातील सगळे सदस्य एकत्र बसलेले असताना बिग बॉस सागरला त्याचा माइक चेंज करण्यासाठी म्हणून स्टोअर रूममध्ये पाठवतात.
advertisement
3/7
सागर धावत पळत स्टोअर रूममध्ये जातो. जसा तो दरवाजा उघडतो तसा तो किंचाळतो. स्टोअर रूममध्ये त्याला असं काही दिसतं ज्याची कल्पनाही त्याने केलेली नसते.
advertisement
4/7
बिग बॉसच्या घरातील स्टोअर रूममध्ये सागरला जे दिसलं ते दुसरं तिसरं काही नाही तर त्याचं कुटुंब आहे. त्याची बायको आणि मुलगी.
advertisement
5/7
घरातील इतर सदस्यांचं कुटुंब मुख्य दरवाजातून आत आले पण सागरला त्याच्या कुटुंबाला भेटण्यासाठी हे असं खास सरप्राइझ देण्यात आलं.
advertisement
6/7
सागरचं कुटुंब त्याला आणि सागर आपल्या कुटुंबाला पाहून खूप आनंदी झाला. सगळ्यांना रडू कोसळलं आणि सगळ्यांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली.
advertisement
7/7
यानंतर घरातील इतर सदस्यांनीही सागरच्या कुटुंबाचं भारी स्वागत केलं. अनुश्री, संकेत, विशाल यांनी वहिनीजी घर आई, सागर क्यो शरमायें, असं गाणं म्हटलं. यानंतर सागरच्या पत्नीने त्याला गालावर गोड किसही दिलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6 : स्टोअर रूममध्ये जाताच किंचाळला सागर; 'बिग बॉस'च्या घरात हे काय दिसलं?