TRENDING:

लग्नानंतर दोन महिन्यातच पुण्यातील पत्नीने दाखवले खरे रंग; 'क्रूर' म्हणत न्यायालयाने दिला मोठा निकाल

Last Updated:

अजय आणि तनुजा यांचा विवाह २०२१ मध्ये मोठ्या उत्साहात झाला होता. मात्र, संसाराची गाडी रुळावर येण्यापूर्वीच, म्हणजे केवळ दोन महिन्यांतच त्यांच्यात खटके उडू लागले

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे: विवाहानंतर अवघ्या दोनच महिन्यांत पतीपासून विभक्त राहणाऱ्या आणि विनाकारण जाच देणाऱ्या पत्नीला पुणे कौटुंबिक न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. उपलब्ध पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे, न्यायालयाने पत्नीचे वर्तन 'क्रूर' असल्याचे मान्य करत पतीचा घटस्फोटाचा अर्ज मंजूर केला आहे. लग्नानंतरच्या अल्प कालावधीतच उद्भवलेल्या या वादामुळे कायदेशीर वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.
पतीचा घटस्फोटाचा अर्ज मंजूर (प्रतिकात्मक फोटो)ही जोडी विवाहासाठी चांगली मानली जाते. दोघेही एकमेकांची काळजी घेतात, दयाळू असतात आणि सोबत वेळ घालवण्यात रुची असते. त्यांच्या नात्यात प्रेम आणि सहकार्याची भावना कायम असते.
पतीचा घटस्फोटाचा अर्ज मंजूर (प्रतिकात्मक फोटो)ही जोडी विवाहासाठी चांगली मानली जाते. दोघेही एकमेकांची काळजी घेतात, दयाळू असतात आणि सोबत वेळ घालवण्यात रुची असते. त्यांच्या नात्यात प्रेम आणि सहकार्याची भावना कायम असते.
advertisement

नेमकी 'भानगड' काय?

अजय आणि तनुजा (नावे बदलली आहेत) यांचा विवाह २०२१ मध्ये मोठ्या उत्साहात झाला होता. मात्र, संसाराची गाडी रुळावर येण्यापूर्वीच, म्हणजे केवळ दोन महिन्यांतच त्यांच्यात खटके उडू लागले आणि दोघेही वेगळे राहू लागले. पतीने अॅड. गायत्री कांबळे यांच्यामार्फत न्यायालयात धाव घेत घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. लग्नानंतरचे सहजीवन अत्यंत कमी काळाचे असूनही पत्नीने पतीशी क्रूर वर्तन केल्याचा आरोप अर्जात करण्यात आला होता.

advertisement

सुनावणीदरम्यान, पतीच्या वतीने साखरपुड्यापासून ते विभक्त होईपर्यंतच्या काळातील अनेक मौखिक आणि कागदोपत्री पुरावे सादर करण्यात आले. साक्षीदारांनी दिलेल्या जबाबांनुसार, पत्नीचे वागणे असह्य होते. विशेष म्हणजे, पत्नीने या साक्षीदारांच्या जबाबांना कोणतेही ठोस आव्हान दिले नाही. न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की, पत्नीने पतीवर केलेले गंभीर आरोप सिद्ध करण्यासाठी कोणतेही पुरावे दिले नाहीत, त्यामुळे तिचा दावा आधारहीन ठरला.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबू उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, दरात झाली वाढ, केळीला काय मिळाला भाव?
सर्व पहा

न्यायालयाने म्हटले की, पती आणि साक्षीदारांची साक्ष नैसर्गिक आणि सुसंगत आहे. पत्नीने सुरुवातीपासूनच प्रकरणात विलंब लावण्याची भूमिका घेतल्याचेही न्यायालयाच्या निदर्शनास आले. दीर्घकाळ विभक्त राहणे आणि जोडीदाराला मानसिक त्रास देणे ही एक प्रकारची 'क्रूरता'च असल्याचे स्पष्ट करत, न्यायालयाने पतीच्या बाजूने निकाल दिला आणि घटस्फोट मंजूर केला.

मराठी बातम्या/पुणे/
लग्नानंतर दोन महिन्यातच पुण्यातील पत्नीने दाखवले खरे रंग; 'क्रूर' म्हणत न्यायालयाने दिला मोठा निकाल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल