Skin Care : तुम्ही ब्युटी प्रोडक्टसचे लेबल व्यवस्थित वाचता ना? 'हे' केमिकल्स किडनी करू शकतात डॅमेज
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
आपण बरेच ब्युटी प्रोडक्टस रोजच्या स्किन केअर मध्ये वापरत असतो. बरेच प्रोडक्टस आपल्याला सूट झालेले असतात. तर काही आपण वापरून पाहात असतो. पण कोणतंही प्रोडक्ट वापरण्यापूर्वी त्याच्यात काय काय आहे, हे आपल्याला माहित असावं.
advertisement
1/9

अनेक प्रोडक्टस त्वचेच्या सर्व समस्या कमी वेळेत संपवण्याचा दावा करतात. पण खरंच असं होऊ शकतं का? या प्रोडक्टस्मध्ये नेमकं असं काय असतं हे आपल्याला माहित असावं. जेणेकरून आपल्याला कोणत्याही प्रकारचा धोका राहणार नाही. यासाठी प्रोडक्टसचे लेबल वाचणं खूप गरजेचं असतं.
advertisement
2/9
नवी दिल्लीतील एलांटिस हेल्थकेअर येथील त्वचारोगतज्ञ आणि सौंदर्य चिकित्सक, चांदनी जैन गुप्ता (एमबीबीएस आणि एमडी) यांनी याबद्दल जागरणला माहिती दिली आहे. लेबल तपासणं का महत्त्वाचं आहे याबद्दल सांगितलं आहे.
advertisement
3/9
डॉक्टरांच्यामते, आपण आपल्या त्वचेवर जे प्रोडक्टस लावतो, ते त्वचेमध्ये आतपर्यंत शोषले जाण्यासाठी बनवलेले असतात. तेव्हाच त्याचा परिणाम दिसतो. हल्ली त्वचा उजळ करणारे प्रोडक्टस मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. तेदेखील आपल्या त्वचेमध्ये असेच शोषले जातात.
advertisement
4/9
पण जेव्हा आपण स्वस्त किंवा ब्रँड नसलेल्या त्वचा उजळ करणाऱ्या प्रोडक्टसचा वापर करतो. तेव्हा त्याचा वाईट परिणामदेखील आपल्या शरीरावर होऊ शकतो. कारण या प्रोडक्टस्मध्ये पाऱ्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. या प्रोडक्टने त्वचा उजळ होऊ शकते. मात्र पाऱ्याचे जास्त प्रमाण आपल्या शरीरासाठी विषारी ठरू शकते.
advertisement
5/9
डॉक्टरांनी सांगितलं की, अशी उत्पादनं जर तुम्ही वारंवार आणि दीर्घकाळ वापरत असाल तर त्याच्या वापराने किडनीचं नुकसान होऊ शकतं. त्याचबरोबर डोकेदुखी, चिडचिड आणि स्मरणशक्ती कमी होणं असेही परिणाम दिसतात.
advertisement
6/9
एवढंच नाही तर कालांतराने हेच प्रोडक्टस तुमच्या त्वचेचंही नुकसान करतात. काही प्रकरणांमध्ये त्वचेला अ‍ॅलर्जीही होऊ शकते. हे सर्व दुष्परिणाम टाळण्यासाठी आपण योग्य प्रोडक्ट निवडणं गरजेचं असतं.
advertisement
7/9
तेलकट त्वचेसाठी 0.5% ते 2% प्रमाणात सॅलिसिलिक अ‍ॅसिड असलेली उत्पादनं चांगली असतात. कोरड्या त्वचेसाठी सेरामाइड्स असलेले मॉइश्चरायझर्स चांगले असतात. ज्याचं प्रमाण प्रोडक्टमधे 2% पर्यंत असावं.
advertisement
8/9
ज्या लोकांची त्वचा संवेदनशील किंवा सेन्सिटिव्ह आहे त्यांनी सुगंध नसलेली उत्पादनं वापरावी. जेणेकरून त्यांना अ‍ॅलर्जीचा कोणताही त्रास होणार नाही. तुम्ही एखादं हर्बल उत्पादन जरी वापरत असाल तरी त्यासाठी डॉक्टरांनाच सल्ला घ्या. कारण नैसर्गिक वाटणारे प्रोडक्टशी तुमच्या त्वचेसाठी चांगले असतीलच असं नाही.
advertisement
9/9
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Skin Care : तुम्ही ब्युटी प्रोडक्टसचे लेबल व्यवस्थित वाचता ना? 'हे' केमिकल्स किडनी करू शकतात डॅमेज