फॉर्च्युनर आता विकून टाकावी लागणार! Toyota आणतेय स्वस्तात मस्त बेबी Cruiser; Thar Roxx चं मार्केट करणार जाम!
- Published by:Sachin S
Last Updated:
भारतात Toyota ची इनोव्हा, फॉर्च्युनरने गेल्या कित्येक वर्षांपासून एक हाती राज्य गाजवत आहे. आता Toyota आपली एक दमदार आणि हटके अशी एसयूव्ही घेऊन येण्याच्या तयारीत आहे.
advertisement
1/7

दमदार, दणकट आणि लांबपल्ल्याच्या प्रवासासाठी Toyota कंपनीच्या वाहनांना जास्त पसंती दिली जाते. भारतात Toyota ची इनोव्हा, फॉर्च्युनरने गेल्या कित्येक वर्षांपासून एक हाती राज्य गाजवत आहे. आता Toyota आपली एक दमदार आणि हटके अशी एसयूव्ही घेऊन येण्याच्या तयारीत आहे. Toyota Land Cruiser FJ असं या एसयूव्हीचं नाव आहे. भारताबाहेर ही एसयूव्ही मार्केटमध्ये लाँच झाली आहे, पण भारतातही लवकरच एंट्री करण्याच्या तयारीत आहे.
advertisement
2/7
Toyota ने आधीच Land Cruiser नावाने भारतात एक मॉडेल लाँच केलं आहे. पण ही एक प्रिमियम एसयूव्ही आहे. या एसयूव्हीची रुंदी आणि लांबी जास्त आहे. आता त्या जागी Toyota Land Cruiser FJ ही एक कॉम्पॅक्ट अशी एसयूव्ही घेऊन येणार आहे. विशेष म्हणजे, Toyota Land Cruiser FJ ची किंमत भारतात ४० लाख रुपये असण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही एसयूव्ही फॉर्च्युनरपेक्षाही स्वस्त ठरणार आहे.
advertisement
3/7
Toyota Land Cruiser FJ मध्ये ही साईजच्या बाबतीत फॉर्च्युनरपेक्षाही छोटी असणार आहे. पण किंमतही Fortuner पेक्षा कमी असणार आहे. Land Cruiser FJ ही थेट आता Scorpio N, महिंद्रा थार रॉक्स शी भिडणार आहे.
advertisement
4/7
Toyota Land Cruiser FJ ही एक कॉम्पॅक्ट ऑफ-रोडर एसयूव्ही ठरणार आहे. यामध्ये २.७-लिटरचं ४-सिलेंडर पेट्रोल इंजिन दिलं आहे. जे १६६ पीएस पॉवर आणि २४५ एनएम टॉर्क जनरेट करतो. हे इंजिन ६-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह येणार आहे. एवढंच नाहीतर यामध्ये ४ व्हील ड्राईव्ह सिस्टीम असणार आहे. Toyota Land Cruiser FJ ही पुढील वर्षी लाँच होण्याची शक्यताा आहे.
advertisement
5/7
Toyota Land Cruiser FJ ही फॉर्च्युनरपेक्षा आकाराने थोडी लहान असणार आहे. या एसयूव्हीची लांबी ४,६१० मिमी, रुंदी १,८५५ मिमी आणि उंची १,८९० मिमी इतकी आहे, तर व्हिलबेस २,५८० मिमी इतका आहे. त्यामुळे ऑफ-रोडिंगसाठी Toyota Land Cruiser FJ ही बेस्ट एसयूव्ही ठरणार आहे.
advertisement
6/7
Toyota Land Cruiser FJ च्या किंमतीबद्दल बोलायचं झालं तर ही अंदाजे या एसयूव्हीची किंमत ३४.४० लाख इतकी असण्याची शक्यता आहे.
advertisement
7/7
भारतात अद्याप टोयोटाने लाँच करण्याची तारीख जाहीर केली नाही, पण २०२७ च्या सुरुवातीला ही Toyota Land Cruiser FJ लाँच होण्याची शक्यता आहे. लाँच झाल्यानंतर Toyota Land Cruiser FJ ची किंमत ३० ते ३५ लाख रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
फॉर्च्युनर आता विकून टाकावी लागणार! Toyota आणतेय स्वस्तात मस्त बेबी Cruiser; Thar Roxx चं मार्केट करणार जाम!