TRENDING:

Sai Tamhankar : सई ताम्हणकरला बिबट्याची भुरळ! लेपर्ड प्रिंटेड साडीत हलवून टाकलं सोशल मिडिया, नेटिझन्सकडून कमेंट्स ओव्हरलोड

Last Updated:
SaiTtamhankarसई ताम्हणकरचा नवा लूक आणि ग्लॅमरस फोटोशूट सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.सईचं फोटोशूट व्हायरल होतंय.
advertisement
1/8
सई ताम्हणकरला बिबट्याची भुरळ! लेपर्ड प्रिंटेड साडीत हलवून टाकलं सोशल मिडिया, PHOTO
मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री सई ताम्हणकर तिच्या दमदार अभिनयासोबतच स्टाइल आयकॉन म्हणूनही ओळखली जाते. सईने आतापर्यंत विविध लुक्समध्ये चाहत्यांना भुरळ घातली आहे.
advertisement
2/8
यावेळी ती एका वेगळ्याच आणि हटके अंदाजात समोर आली असून तिचा हा नवा अवतार सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
advertisement
3/8
सई ताम्हणकरने नुकतंच तिच्या  सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सईने लेपर्ड प्रिंट असलेली साडी नेसली आहे.या साडीत तिचा बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळतोय.  तिच्या या लूकने चाहते अक्षरशः थक्क झाले आहे.
advertisement
4/8
"जर बिबट्या माणूस असता," असं भन्नाट कॅप्शन देत सईने हे फोटो शेअर केले आहेत. तिच्या या कॅप्शनमुळे आणि हटके लूकमुळे हे फोटो अधिकच चर्चेत आले आहेत. सईच्या एक्सप्रेशन्स, कॉन्फिडन्स आणि स्टाईल यामुळे तिचा हा फोटोशूट चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
advertisement
5/8
या फोटोवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी तिच्या सौंदर्याचं आणि कॉन्फिडन्सचं कौतुक केलं आहे. काहींनी मजेशीर कमेंट्सही केल्या आहेत.
advertisement
6/8
एका फॅनने लिहिलंय, "हास्यजत्रामध्ये नक्कीच बिबट्यावरून जोक होणार," दुसऱ्यानं लिहिलंय, "सांगलीचा बिबट्या" आणखी एकानं लिहिलंय, "बिबट्या इतका प्रेमळ असतो का?"
advertisement
7/8
विशेष म्हणजे सईने हा लेपर्ड प्रिंट लूक तिच्या आगामी 'मटका किंग' या वेब सीरिजच्या प्रमोशनसाठी कॅरी केला आहे. ही सीरिज येत्या 17 एप्रिल रोजी प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे सई सध्या या प्रोजेक्टच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे.
advertisement
8/8
सई ताम्हणकरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिने मराठी मालिका, चित्रपट आणि हिंदी सिनेमांमध्येही आपली छाप पाडली आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवरही तिची दमदार कामगिरी पाहायला मिळाली आहे. 'डब्बा कार्टेल', 'भक्षक', 'इंडिया लॉकडाऊन' आणि 'नवरस' यांसारख्या प्रोजेक्ट्समधून तिने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Sai Tamhankar : सई ताम्हणकरला बिबट्याची भुरळ! लेपर्ड प्रिंटेड साडीत हलवून टाकलं सोशल मिडिया, नेटिझन्सकडून कमेंट्स ओव्हरलोड
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल