TRENDING:

खरातची संगत महागात, रुपाली चाकणकरांनी आता महिला प्रदेशाध्यपदाचा दिला राजीनामा, सुनेत्रा पवारांचा दुसरा मोठा निर्णय

Last Updated:

मागील काही दिवसांपासून रुपाली चाकणकर यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवण्याची मागणी होत होती. अखेरीस रुपाली चाकणकर याांनी आता राष्ट्रवादीला रामराम ठोकला आहे. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : बलात्कार प्रकरणी अटकेत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी रोज नव नवीन खुलासे होत आहे. खरातसोबतचे व्हिडीओ फोटो व्हायरल झाल्यानंतर रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.   आता रुपाली चाकणकर यांनी  राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे.
News18
News18
advertisement

मागील काही दिवसांपासून रुपाली चाकणकर यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवण्याची मागणी होत होती. अखेरीस रुपाली चाकणकर याांनी आता राष्ट्रवादीला रामराम ठोकला आहे.

"खरात प्रकरणाबाबत पहिल्या दिवशीच मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. त्याच्या आर्थिक व्यवहारात, त्याच्या गैरकृत्यात दुरान्वये संबंध नाही, आजही तीच स्पष्ट आणि ठाम भूमिका आहे. तपासादरम्यान या सर्व बाबी निष्पन्न होतीलच. खोटे,असत्य आणि कुठलाही पुरावा नसताना जे आरोप माध्यमांमधून होत आहेत. ते वेदनादायक आहे. सत्य प्रखरतेने सिद्ध होईलच.

advertisement

advertisement

हा तपास पारदर्शकपणे आणि निष्पक्षपणे व्हावा, ही माझी मागणी मी यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मा.पोलीस महासंचालक यांच्याकडे केली आहे. आज सकाळी फोनद्वारे आदरणीय सुनेत्रा वहिनी पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार मी माझ्या राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे" अशी माहिती रुपाली चाकणकर यांनी ट्वीट करून दिली आहे.

advertisement

चाकणकरांच्या राजीनाम्यासाठी मागणी

दरम्यान, रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे, नाशिकचे पदाधिकारी आणि ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी रुपाली चाकणकर यांच्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी लावून धरली होती. रुपाली ठोंबरे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेटही घेतली होती. त्यानंतर राष्ट्रवादीची बैठक पार पडली होती. या बैठकीमध्ये आमदारांनी रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यानंतर आता अखेरीस रुपाली चाकणकर यांनी ट्वीट करून राजीनामा दिला आहे.

advertisement

रुपाली चाकणकरांवर गंभीर आरोप

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबू इतके महाग का झाले, द्राक्षाची काय स्थिती? मार्केटमधून मोठी अपडेट
सर्व पहा

दरम्यान, राष्ट्रवादीच्या नेत्या  रूपाली ठोंबरे यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. "ज्या पीडित महिला कौटुंबिक हिंसाचार किंवा घरगुती वादाच्या तक्रारी घेऊन महिला आयोगाकडे न्याय मागण्यासाठी येत होत्या, त्यांचे योग्य समुपदेशन करणे आयोगाचे कर्तव्य होते. मात्र, रूपाली चाकणकर या महिलांना दिलासा देण्याऐवजी तुम्ही अशोक खरात बाबाकडे जा, तुमचे प्रश्न सुटतील, असा अजब सल्ला देत होत्या. न्यायाच्या आशेने आलेल्या महिलांना जाणीवपूर्वक भोंदू बाबाच्या जाळ्यात ढकलण्याचे पाप आयोगाच्या खुर्चीवर बसून झाले आहे, असा गंभीर आरोप ठोंबरे यांनी केला होता. तसंच, खरात प्रकरणामध्ये रूपाली चाकणकर या खरातच्या काळ्या कृत्यांमध्ये सामील आहेत का? याची सखोल चौकशी व्हावी आणि त्यांना या प्रकरणात सहआरोपी करण्यात यावं, अशी मागणीही ठोंबरे यांनी केली.

मराठी बातम्या/पुणे/
खरातची संगत महागात, रुपाली चाकणकरांनी आता महिला प्रदेशाध्यपदाचा दिला राजीनामा, सुनेत्रा पवारांचा दुसरा मोठा निर्णय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल