Washbasin : बेसिनमधील का असतो हा छोटा छिद्र? फक्त शोभेसाठी नाही! त्यामागचं कारण 99 टक्के लोकांना माहितच नाही
- Published by:Devika Shinde
Last Updated:
अनेकांना वाटतं की हे छिद्र कदाचित बेसिन बनवताना राहून गेलं असेल किंवा तो केवळ डिझाइनचा एक भाग असेल. पण प्लंबिंग आणि इंजिनिअरिंगच्या भाषेत या छोट्याशा छिद्राला प्रचंड महत्त्व आहे.
advertisement
1/8

सकाळपासून रात्रीपर्यंत आपण घरातल्या अनेक वस्तू वापरतो, पण कधीकधी अगदी साध्या दिसणाऱ्या गोष्टींमागेही किती मोठं डोकं लावलेलं असतं, याचा आपण विचारच करत नाही. आपल्या बाथरूममधील किंवा किचनमधील हँडवॉश सिंक (Wash Basin) हे त्यातलंच एक उदाहरण. बेसिनच्या मध्यभागी जिथून पाणी वाहून जातं, तो मोठा छेद तर सर्वांनाच माहिती असतो. पण तुम्ही कधी बारकाईने पाहिलंय का? त्या मोठ्या छिद्राच्या थोडं वरच्या बाजूला किंवा कडेला एक लहानसं गोलाकार छिद्र असतं.
advertisement
2/8
अनेकांना वाटतं की हे छिद्र कदाचित बेसिन बनवताना राहून गेलं असेल किंवा तो केवळ डिझाइनचा एक भाग असेल. पण प्लंबिंग आणि इंजिनिअरिंगच्या भाषेत या छोट्याशा छिद्राला प्रचंड महत्त्व आहे. याला तांत्रिक भाषेत 'ओव्हरफ्लो होल' (Overflow Hole) असं म्हणतात. हे छिद्र तुमच्या घराला मोठ्या संकटातून कसं वाचवतं, हे जाणून घेतलं तर तुम्हीही थक्क व्हाल.
advertisement
3/8
पूर टाळणारा 'छोटा रक्षक'या छिद्राचं सर्वात मुख्य काम म्हणजे पाणी बेसिनच्या बाहेर सांडण्यापासून रोखणं. विचार करा, घरात लहान मुलांनी खेळता खेळता बेसिनचा मुख्य पाईप कापडाने किंवा खेळण्याने बंद केला आणि नळ चालूच ठेवला तर काय होईल? काही मिनिटांतच बेसिन भरून पाणी संपूर्ण बाथरूममध्ये आणि तिथून तुमच्या हॉलमध्ये पसरेल. यामुळे लाकडी फर्निचर किंवा जमिनीचं नुकसान होऊ शकतं.
advertisement
4/8
अशा वेळी हे 'ओव्हरफ्लो होल' कामी येतं. जेव्हा पाणी एका ठराविक पातळीच्या वर जातं, तेव्हा ते बाहेर न सांडता या छोट्या छिद्रातून थेट पाईपमध्ये जातं. म्हणजेच, हे छिद्र तुमच्या घरासाठी एका 'सेफ्टी व्हॉल्व्ह'सारखं काम करतं.
advertisement
5/8
पाणी वेगाने जाण्यासाठी एअर व्हेंटतुम्ही कधी बाटलीतून पाणी ओतताना गुळगुळ असा आवाज ऐकलाय का? असं होतं कारण बाटलीतली हवा बाहेर पडायला जागा नसते. बेसिनमध्येही असंच काहीसं घडतं. जेव्हा मुख्य छिद्रातून पाणी वेगाने खाली जात असतं, तेव्हा पाईपमध्ये हवा जाण्यासाठी जागा हवी असते.
advertisement
6/8
हे वरचं छोटं छिद्र हवेच्या आवागमनासाठी मदत करतं. यामुळे हवेचा दाब संतुलित राहतो आणि बेसिनमधलं पाणी कोणत्याही आवाजाशिवाय आणि अत्यंत वेगाने खाली जातं. जर हे छिद्र नसतं, तर बेसिनमधलं पाणी खूप संथ गतीने बाहेर पडलं असतं.
advertisement
7/8
हे छिद्र लहान असल्यामुळे अनेकदा त्यात साचलेला साबन, केस किंवा घाण आपल्या लक्षात येत नाही. जर हे छिद्र बंद झालं, तर बेसिनमधून पाणी हळू जाऊ लागतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बेसिनमधून कुबट वास येऊ लागतो. त्यामुळे वेळोवेळी गरम पाणी किंवा क्लिनिंग लिक्विड टाकून हे छिद्र स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे.
advertisement
8/8
बेसिनमध्ये असलेलं ते छोटं छिद्र केवळ एक डिझाइन नसून ती एक अत्यंत हुशार इंजिनिअरिंग रणनीती आहे. ते तुमच्या घराला पाण्यापासून होणाऱ्या नुकसानीपासून वाचवतं आणि पाण्याचा निचरा सुरळीत करतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Washbasin : बेसिनमधील का असतो हा छोटा छिद्र? फक्त शोभेसाठी नाही! त्यामागचं कारण 99 टक्के लोकांना माहितच नाही