Soft Chapati : सकाळी केलेली चपाती दुपारपर्यंत मऊ कशी राहील? गृहिणींच्या सर्वात मोठ्या समस्येवर उपाय अखेर मिळाला
- Published by:Devika Shinde
Last Updated:
जर तुमच्याही बाबतीत असे घडत असेल, तर काळजी करू नका. आज आम्ही तुम्हाला काही अशा सोप्या ट्रिक्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुमची सकाळी केलेली चपाती रात्रीपर्यंत कापसासारखी मऊ राहील.
advertisement
1/9

भारतीय जेवणाच्या ताटात कितीही पदार्थ असले, तरी जोपर्यंत समोर गरमागरम आणि मऊ चपाती येत नाही, तोपर्यंत जेवणाची खरी मजा येत नाही. पण आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येक वेळी जेवायला बसताना ताज्या चपात्या लाटणे हे कसरतीचे काम ठरते. शिवाय डब्याला चपाती द्यायची असेल तर ती सकाळीच करावी लागते. अनेक घरात दुपारच्या जेवणासाठीही सकाळीच चपाती करुन ठेवतात.
advertisement
2/9
परंतु, खरी समस्या तेव्हा येते जेव्हा डबा उघडल्यावर किंवा दुपारी जेवायला बसल्यावर ती मऊ चपाती चामट किंवा कडक झालेली असते. कधी कधी तर ती इतकी कडक होते की चघळणेही कठीण जाते. जर तुमच्याही बाबतीत असे घडत असेल, तर काळजी करू नका. आज आम्ही तुम्हाला काही अशा सोप्या ट्रिक्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुमची सकाळी केलेली चपाती रात्रीपर्यंत कापसासारखी मऊ राहील.
advertisement
3/9
1. पीठ मळताना 'या' गोष्टींचा वापर कराचपाती मऊ होण्याचे सर्वात पहिले रहस्य हे पीठ मळण्यात दडलेले असते. पीठ मळताना साध्या पाण्याऐवजी कोमट पाण्याचा वापर करा. शक्य असल्यास त्यात थोडे दूधही मिसळू शकता. यामुळे पिठातील ओलावा दीर्घकाळ टिकून राहतो आणि पिठातील 'ग्लूटेन' (Gluten) हळूहळू ॲक्टिव्ह झाल्यामुळे चपाती ताजी वाटते.
advertisement
4/9
2. पिठाला थोडी 'विश्रांती' द्याअनेकांना सवय असते की पीठ मळले की लगेच चपाती लाटायला घेतात. यामुळे चपाती लवकर कडक होतात. पीठ मळल्यानंतर ते किमान 20 ते 30 मिनिटे झाकून ठेवा. पिठावरचा ओलावा उडू नये म्हणून त्यावर ओला सुती कपडा किंवा घट्ट झाकण ठेवा. यामुळे पीठ छान मुरते आणि चपाती मऊ होते.
advertisement
5/9
3. तेल किंवा तुपाचा वापरपीठ मळताना त्यात एक चमचा तूप किंवा तेल घातल्याने चपात्यांना एक प्रकारचा मुलायमपणा येतो. तेल पिठातील ओलावा आत पकडून ठेवते, ज्यामुळे चपाती तासन् तास मऊ राहते. जर तुम्ही पीठ मळताना तेल घालायला विसरलात, तर पीठ मळून झाल्यावर वरून थोडे तेल लावून पुन्हा एकदा मळून घ्या.
advertisement
6/9
4. लाटण्याची योग्य पद्धतमऊ चपातीसाठी ती योग्य पद्धतीने लाटणेही तितकेच महत्त्वाचे आहे. चपाती खूप जाड लाटली तर ती कडक होण्याची शक्यता असते. म्हणून चपाती नेहमी हलक्या हाताने आणि कडेने एकसारखी लाटावी. चपाती सर्व बाजूंनी समान लाटली गेली असेल तर ती छान फुलते आणि नंतरही मऊ राहते.
advertisement
7/9
5. गॅसची फ्लेम आणि तापमानचपाती भाजताना तव्याचे तापमान योग्य असणे गरजेचे आहे. जर तवा खूप जास्त गरम असेल तर चपाती जळेल आणि कडक होईल. याउलट जर गॅस खूप मंद असेल तर चपाती कोरडी पडेल. त्यामुळे नेहमी मध्यम आचेवर चपाती भाजा, जेणेकरून ती छान फुलेल आणि मऊ राहील.
advertisement
8/9
6. साठवण्याची योग्य पद्धतचपाती भाजल्यानंतर त्या कशा ठेवता, यावरही त्यांचे मऊ राहणे अवलंबून असते. चपाती डब्यात भरण्यापूर्वी एका स्वच्छ सुती किंवा मलमलच्या कपड्यात गुंडाळून ठेवा. यामुळे चपातीची वाफ बाहेर जात नाही आणि ती ओलावा धरून ठेवते. त्यानंतर तो कपडा एअरटाईट डब्यात ठेवा.
advertisement
9/9
स्वयंपाकघरातील हे छोटे छोटे बदल तुमची मोठी समस्या सोडवू शकतात. वरील ट्रिक्स वापरल्या तर सकाळी घाईत केलेल्या पोळ्या देखील रात्रीपर्यंत ताज्या आणि मऊ राहतील. मग आजच ही पद्धत वापरून बघा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/रेसिपी/
Soft Chapati : सकाळी केलेली चपाती दुपारपर्यंत मऊ कशी राहील? गृहिणींच्या सर्वात मोठ्या समस्येवर उपाय अखेर मिळाला