या स्कूटरच्या किंमती 1 जानेवारी 2026 पासून लागू होतील आणि किमती कमाल 3,000 रुपयांपर्यंत वाढ होणार आहे. कंपनीने किमती वाढीसाठी अनेक कारणं सांगितलीये. ज्यामध्ये कच्च्या मालाच्या किमतीत वाढ, परकीय चलनातील चढउतार आणि जागतिक पुरवठा साखळीतील व्यत्यय यांचा समावेश आहे.
Ritz आणि 450 सिरीज इलेक्ट्रिक स्कूटर
एथर एनर्जी भारतात रिट्झ आणि 450 सिरीज इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री करते. ही नवीन किंमत वाढ सर्व मॉडेल्सना लागू होईल. याचा अर्थ असा की जर तुम्ही स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर जानेवारीपूर्वी खरेदी करणे फायदेशीर ठरेल. कंपनी म्हणते की, या हालचालीमुळे त्यांना प्रोडक्ट खर्च आणि क्वालिटी राखण्यास मदत होईल. एथर स्कूटर त्यांच्या कामगिरी, बॅटरी टेक्नॉलॉजी आणि विश्वासार्ह सेवेसाठी ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत.
advertisement
'अरे अशीच तर पाहिजे होती...' पाहताच क्षणी प्रेमात पडाल, New Bajaj Pulsar 150 किंमत आणि फीचर्स
Ather Rizta किंमत
ब्रँडचे सर्वात लोकप्रिय मॉडेल एथर रिझ्टा दोन व्हेरिएंटमध्ये येते: एस आणि झेड. एथर रिझ्टा एस ची किंमत ₹ 114,546 (एक्स-शोरूम) पासून सुरू होते, तर रिझ्टा झेड ची किंमत ₹ 134,047 (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. या प्रकारांसाठी अंदाजे ₹3,000 किंमतीत वाढ झाल्यानंतर, रिझ्टा एस आणि रिझ्टा झेडची किंमत अंदाजे ₹117,546 (एक्स-शोरूम) आणि ₹137,047 (एक्स-शोरूम) पासून सुरू होईल. ब्रँडच्या 450 सीरीजच्या इलेक्ट्रिक स्कूटरमधील सर्वात परवडणारे मॉडेल एथर 450एस, ₹122,889 (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. किंमत वाढल्यानंतर, त्याची किंमत ₹125,889 (एक्स-शोरूम) पासून सुरू होईल.
Ather 450X
Ather 450X ची सध्या किंमत ₹150,046 (एक्स-शोरूम) आहे आणि किंमत वाढल्यानंतर, या मॉडेलची सुरुवातीची किंमत ₹153,046 (एक्स-शोरूम) पर्यंत वाढेल.
Car: डिसेंबर महिन्यात का कार खरेदी करू नये? लोक का टाळतात? 5 सिक्रेट कारणं
Ather 450 Apex
ब्रँडचे प्रमुख मॉडेल, Ather 450 Apex, सध्या ₹182,946 (एक्स-शोरूम) च्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे. पुढील वर्षी किंमत वाढल्यानंतर, त्याची किंमत ₹185,946 (एक्स-शोरूम) पासून सुरू होऊ शकते.
