TRENDING:

बाहेर काळकुट्ट धूर अन् 40 मिनिटांचा जीवघेणा थरार! अखेर पुष्कर जोगने सांगितलं आग लागण्याचं धक्कादायक कारण

Last Updated:

Pushkar Jog House Fire: नुकतंच पुष्करने एका मुलाखतीत इमारतीला आग लागण्याच्या घटनेबद्दल सविस्तर माहिती सांगितली आहे, जी ऐकून कोणाच्याही अंगावर शहारे येतील.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: गुलाबी थंडी, नाताळ सण आणि नव्या वर्षाचं आगमन यामुळे सध्या सगळीकडे आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय. मात्र, हाच सण मराठमोळ्या अभिनेत्यासाठी दुःखद ठरला आहे. ख्रिसमस सणाच्या दिवशीच बिग बॉस मराठी फेम अभिनेता पुष्कर जोग याच्या मुंबईतील अंधेरी येथील आलिशान घराला आग लागल्याची घटना घडली. पुष्करच्या इमारतीला आग लागली आणि बघता बघता धुराच्या लोटांनी अख्ख्या इमारतीला कवेत घेतलं. अशा भयानक परिस्थितीत पुष्कर आणि त्याची चिमुकली मुलगी फेलिशा ४० मिनिटं मृत्यूच्या दारात उभे होते.
News18
News18
advertisement

मुंबई पोलिस आणि अग्निशमनदलाच्या मदतीमुळे पुष्कर आणि त्याच्या मुलीचे प्राण वाचल्याचे पुष्करने त्याच्या सोशल मिडिया पोस्टमध्ये सांगितलं होतं. नुकतंच पुष्करने एका मुलाखतीत इमारतीला आग लागण्याच्या घटनेबद्दल सविस्तर माहिती सांगितली आहे, जी ऐकून कोणाच्याही अंगावर शहारे येतील.

शॉर्ट सर्किट अन् १२ व्या मजल्यावर आगीचा भडका

पुष्करने सांगितलं की, अंधेरी पश्चिमेकडील इमारतीत त्याची दोन घरं आहेत. आग लागली ती १२ व्या मजल्यावरील कॉमन एरियामध्ये. पुष्कर म्हणाला, "१२ व्या मजल्यावर शॉर्ट सर्किट झालं आणि आग वेगाने पसरू लागली. माझं तिथलं घर बाहेरच्या बाजूने पूर्णपणे खाक झालं आहे. ती आग इतकी भीषण होती की तिचा धूर वरच्या मजल्यांपर्यंत, म्हणजेच मी जिथे राहतो त्या १९ व्या मजल्यापर्यंत पोहोचला."

advertisement

Dnyanada Ramtirthkar: 'खरं सांगायचं तर तो तुझ्या...' साखरपुड्याच्या दुसऱ्याच दिवशी ज्ञानदा रामतीर्थकर झाली ट्रोल!

"समोर काहीच दिसत नव्हतं, श्वास घेणं कठीण झालं..."

जेव्हा पुष्करला आग लागल्याचं समजलं, तेव्हा त्याने सावधगिरी म्हणून आपल्या लेकीला घेऊन बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. पण जसं त्याने घराचं दार उघडलं, तसं समोर फक्त आणि फक्त काळाकुट्ट धूर होता. "दार उघडल्यावर समोर काहीच दिसत नव्हतं. इतका धूर होता की श्वास घेणं अशक्य झालं होतं. पुन्हा बाहेर जाणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणं होतं, म्हणून आम्ही परत घरात आलो," असं पुष्करने सांगितलं.

advertisement

बाथरुममध्ये काढली ४० मिनिटं

घरातही धूर शिरू लागला होता. अशावेळी काय करावं हे सुचेनासं झालं असताना पुष्करने एक निर्णय घेतला. तो आपल्या मुलीला घेऊन थेट बाथरुममध्ये गेला. तिथे धूर कमी होता. पुढची ४० मिनिटं ते दोघंही तिथेच होते. बाहेर आगीच्या ज्वाळा आणि धूर होता, तर आत हे बाप-लेक आपल्या जीवाची प्रार्थना करत होते.

advertisement

मुंबईच्या रिअल हिरोंनी वाचवले प्राण

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
डाळिंब आणखी महागले, शेवगा आणि गुळाची आज काय स्थिती? Video
सर्व पहा

पुष्करने अत्यंत कृतज्ञतेने मुंबई पोलीस, बीएमसी आणि विशेषतः अग्निशमन दलाच्या जवानांचे आभार मानले आहेत. "त्यांनी योग्य वेळी येऊन आम्हाला त्या धुराच्या कोंडीतून बाहेर काढलं. माझ्या मुलीला सुरक्षित बाहेर काढल्याबद्दल मी त्यांचा आयुष्यभर ऋणी राहीन," अशा भावना त्याने व्यक्त केल्या. दरम्यान, पुष्करच्या घराचं मोठं नुकसान झालं असलं, तरीही त्यांचे प्राण वाचल्याबद्दल त्याने देवाचे आभार मानले आहेत. सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी पुष्करची विचारपूस केल्याचं त्याने सांगितलं आहे.

मराठी बातम्या/मनोरंजन/
बाहेर काळकुट्ट धूर अन् 40 मिनिटांचा जीवघेणा थरार! अखेर पुष्कर जोगने सांगितलं आग लागण्याचं धक्कादायक कारण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल