TRENDING:

Weather Update: अफगाणिस्तानमध्ये असं काय घडतंय? ज्यामुळे महाराष्ट्रात पाऊस पडतोय

Last Updated:
मार्च महिन्यात अचानक पावसाचे आगमन, वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे महाराष्ट्रात १८-२० मार्च दरम्यान विदर्भ, मराठवाडा, मुंबईत पाऊस. तापमानात घट, एप्रिलच्या मध्यापर्यंत उष्णतेपासून दिलासा.
advertisement
1/7
Weather Update: अफगाणिस्तानमध्ये असं काय घडतंय? ज्यामुळे महाराष्ट्रात पाऊस पडतोय
मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात उन्हाचे चटके तीव्र बसत होते. अंग होरपळल्यासारखं भासत होतं घामाच्या धारा निघत होत्या आणि अचानक पहाटे आणि रात्री थंड वारे आणि दुपारी 10 ते 4 उन्हाच्या तीव्र झळा असं वातावरण बदललं. त्यानंतर आता मुसळधार पावसाचं संकट आलं आहे. - फोटो सौजन्य AI
advertisement
2/7
मार्च महिन्यात अचानक पाऊस कुठून आणि कसा आला? इतक्या उष्णतेनंतर पाऊस का पडतोय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सोप्या भाषेत समजून घेऊया. विशेष म्हणजे, १८ मार्चपासून राज्यात पुन्हा एकदा पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता असून, यामुळे उष्णतेची लाट एप्रिलच्या मध्यापर्यंत लांबणीवर जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.- फोटो सौजन्य - AI
advertisement
3/7
वेस्टर्न डिस्टर्बन्स अफगाणिस्तानकडून भारताच्या दिशेनं पुढे सरकला आहे. त्याचा परिणाम म्हणून हवामानात अचानक बदल झाले आहेत. त्यामुळे उत्तर भारतापासून ते पश्चिम बंगालपर्यंत अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस राहणार आहे. पश्चिम बंगालपासून खाली दक्षिणेपर्यंत पुन्हा पावसाचा अंदाज आहे. 18 तारखेपासून पुन्हा एकदा नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स तयार होत आहे. विदर्भ मराठवाडा इथे पाऊस होणार आहे.
advertisement
4/7
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १७ मार्चच्या रात्रीपासून उत्तर-पश्चिम भारतात एक नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय होत आहे. यामुळे १८ ते २० मार्च दरम्यान महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पूर्वमोसमी पाऊस वादळी वाऱ्यासह होण्याची शक्यता आहे.
advertisement
5/7
हवामान अभ्यासक नवदीप दहिया यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, वाऱ्यांच्या विसंगतीमुळे दक्षिण आणि पूर्व भारतात एप्रिलच्या सुरुवातीपर्यंत पावसाळी वातावरण राहील. यामुळे यंदा १५ ते २० एप्रिलपर्यंत तरी देशाला भीषण उष्णतेच्या लाटेपासून दिलासा मिळू शकतो.
advertisement
6/7
हरियाणाच्या बाजूला सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झाला असून तो दक्षिणेकडे सरकत आहे. त्यामुळे वादळी वाऱ्यासह पाऊस राहणार आहे. 18 ते 20 मार्च रोजी महाराष्ट्रात कोकण पट्टा वगळता सगळीकडे कमी अधिक प्रमाणात पाऊस राहणार आहे. उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी राहील, मात्र बाकी ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
advertisement
7/7
मुंबईत देखील 19-20 तारखेला पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे तापमानात घट होण्याची शक्यता आहे. प्री मान्सूनमुळे तापमानात घट होणार आहे. आता उर्वरित मार्च महिन्यात उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Weather Update: अफगाणिस्तानमध्ये असं काय घडतंय? ज्यामुळे महाराष्ट्रात पाऊस पडतोय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल