Food Truck : 4 वर्षांपूर्वी सुरूवात, महिन्याला 1 लाखांच्यावर उलाढाल, फूड ट्रक चालवणाऱ्या तीन भावांची कहाणी
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
हे तिघी भावंड सोबत मिळून नाशिकमध्ये गेल्या चार वर्षांपासून श्री साई चाट आणि पाणीपुरी सेंटर या नावाने फूड ट्रक चालवत आहे. यामधून ते महिन्याला 1 लाखांच्यावर कमाई करत आहेत.
advertisement
1/7

भाऊ हा सोबत असला तर कुठलीही अशक्य गोष्ट ही सहज सोपी होत असते. नाशिक येथील गणेश, अक्षय आणि ऋषिकेश हे तिघे भावंडे याचे उत्तम उदाहरण आहे. हे तिघी भावंड सोबत मिळून नाशिकमध्ये गेल्या चार वर्षांपासून श्री साई चाट आणि पाणीपुरी सेंटर या नावाने फूड ट्रक चालवत आहे. यामधून ते महिन्याला 1 लाखांच्यावर कमाई करत आहेत.
advertisement
2/7
धाकटा भाऊ ऋषिकेश हा शिक्षण कमी असल्याने एका कापड दुकानात कामाला असताना कोरोनाकाळात त्याच्या हाताची नोकरी गेली. त्या वेळी मोठ्या दोन्ही भावंडांनी त्याला काहीतरी स्वतःचा व्यवसाय सुरू करून देऊ या हेतूने पाणीपुरीची गाडी सुरू करून दिली, असे ऋषिकेश यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.
advertisement
3/7
अक्षय आणि गणेश हे दोघेही नाशिकमध्ये एका कंपनीत कामाला आहेत आणि सुरुवातीपासून लहान भाऊ ऋषिकेश हा एका कापड दुकानात 7 हजार रुपये महिन्याने कामाला जात असे. कोरोनाकाळात दुकान मालकाने पगार देण्यास नकार दिल्याने ऋषिकेश याने मोठ्या भावाला सांगितले. त्यावर तू काळजी नको करू आपण काहीतरी यावर पर्याय काढू असे सांगून ऋषिकेश याच्या दोन नंबरच्या भावाने त्याला फूड रिलेटेड काहीतरी सुरू कर असे सांगितल्यानंतर मोठ्या भावाने त्याला छोटी फूड व्हॅन सुरू करून दिली असल्याचे ऋषिकेश सांगत असतो.
advertisement
4/7
त्यानंतर ऋषिकेश याला त्याचा दोघी भावांच्या या व्यवसायात खूप मोठा पाठिंबा देखील आहे. दोघे भाऊ कामावरून घरी आले की ऋषिकेश याला त्याच्या या फूड ट्रकवर जाऊन कामात मदत करत असतात. इतकेच नाही तर सर्व एकत्र मिळून हा गाडा चालवत असतात.
advertisement
5/7
ऋषिकेश याने सुरुवातीला महानगरपालिकेने त्यांची छोटी गाडी घेऊन गेले असताना मी हा व्यवसाय बंद करण्याचे ठरविले असल्याचे सांगितले. परंतु मोठ्या भावानी ही आपली लक्ष्मी आणि तुझा पहिला व्यवसाय असल्याने 30 हजार रुपये भरून त्याला त्याची गाडी पुन्हा आणून दिली असल्याचे तो सांगत असतो.
advertisement
6/7
आजकालच्या जगात अनेक ठिकाणी भाऊ भावाची मदत करत नसल्याचे दिसते परंतु या तीन भावंडांचे एकमेकांना असलेल्या साथीमुळे या ठिकाणी येणारे खव्व्यावे त्यांचे कौतुक करत असतात.
advertisement
7/7
तसेच ऋषिकेश आता अभिमानाने सांगत असतो मी दुसरीकडे नोकर म्हणून 7 हजार रुपये महिन्याने कामाला जात होतो. परंतु आज रोजचे 3 ते 4 हजार रुपये मी या व्यवसायातून कमाई करतो असं त्याने सांगितलं. याच्याकडे पाणीपुरी पासून ते 40 वेगवेगळ्या प्रकारचे स्वादिष्ट असे स्ट्रीट फूड हे मिळत असते. तुम्हाला देखील यांच्या स्पेशल पाणीपुरीची चव घेण्याची असल्यास अशोका मार्गावरील श्री साई पाणीपुरी सेंटरला नक्की भेट द्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Food Truck : 4 वर्षांपूर्वी सुरूवात, महिन्याला 1 लाखांच्यावर उलाढाल, फूड ट्रक चालवणाऱ्या तीन भावांची कहाणी