शेतकऱ्याने देशी नव्हे एकदाच लावला विदेशी पेरू, आता घरी चालत येतात 3 लाख रुपये!
- Published by:News18 Marathi
Last Updated:
छत्रपती संभाजीनगरमधील शेतकरी राजेंद्र आणि श्रीकांत हाके यांनी पारंपरिक मोसंबी शेतीला फाटा दिला. आता तैवान पेरूच्या शेतीतून ते लाखोंचा नफा मिळवत आहेत.
advertisement
1/6

भारत हा कृषीप्रधान देश आहे. देशाची निम्मी लोकसंख्या ही शेती करते. शेतकरी आपल्या शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत असतात. सध्याला शेतकरी हे पारंपारिक शेतीपेक्षा आधुनिक शेतीकडे जास्त वळलेले आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील शेतकरी राजेंद्र आणि श्रीकांत हाके यांनी पारंपरिक मोसंबी शेतीला फाटा दिला. आता तैवान पेरूच्या शेतीतून ते लाखोंचा नफा मिळवत आहेत.
advertisement
2/6
छत्रपती संभाजी नगर शहरापासून अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावर आडगाव बुद्रुक हे छोटसं गाव आहे. या गावातील 90 टक्के लोक शेतीच करतात. मात्र, पारंपरिक शेतीला फाटा देत काही शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीची कास धरलीय. काही शेतकरी आपल्या शेतात विविध प्रयोग करतात.
advertisement
3/6
राजेंद्र हाके आणि श्रीकांत हाके यांनी आपल्या दीड एकर शेतामध्ये पेरूची लागवड केली. पेरूची शेती करण्यासाठी जास्त पाण्याची गरज पडत नाही. त्याचबरोबर जास्त मशागतीची देखील गरज पडत नाही. त्यामुळे ही शेती करणं अत्यंत सोपा आहे, असं हे शेतकरी सांगतात.
advertisement
4/6
राजेंद्र हाके यांनी दीड एकरावरती तैवान जातीच्या पेरूची लागवड केली. सुरुवातीला एक वर्ष यांनी या पेरूमध्ये आंतरपीक घेतल. दुसऱ्या वर्षी झाडांना फळे यायला लागली. त्यांना यातून चांगला नफा मिळाला. यावर्षी राजेंद्र हाके यांना तीन लाखांपर्यंत उत्पन्न मिळालं आहे. त्यांच्या पेरूच्या बागेतून आतापर्यंत 400 कॅरेट पेरू निघालेले आहेत. अजूनही तोडणी सुरूच असून चांगले उत्पन्न मिळेल, असे हाके सांगतात.
advertisement
5/6
आधी आमच्याकडे मोसंबीच्या बागा होत्या. पण मोसंबीसाठी पाऊस लागतो. म्हणून आम्ही या बागा काढून टाकल्यावर पेरूची लागवड केली. पेरूला पाणी देखील कमी लागतं. मेहनत देखील कमी घ्यावी लागते. त्यामुळे आम्ही या पेरूची लागवड केली यावर्षी आम्हाला याच्यातून भरपूर उत्पन्न भेटले आहे. अजून उत्पन्न भेटेल अशी मला अपेक्षा आहे तर मी सर्व शेतकऱ्यांना हे सांगतो की पारंपारिक शेतीपेक्षा सर्व शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीकडे वळावं, असं राजेंद्र हाके सांगतात.
advertisement
6/6
मला पारंपरिक शेतीपेक्षा आधुनिक शेती करायला आवडते. म्हणून मी या तैवान जातीच्या पेरूची लागवड केली. पहिल्या वर्षी झाडं छोटी असल्यामुळे याच्यामध्ये आम्ही आंतरपीक घेतलं व त्यातून आम्हाला चांगला नफा भेटला. आत्तापर्यंत 300 कॅरेट पेरूचे उत्पन्न निघाले आहे. हे झाड दुसऱ्या वर्षीचं आहे व दुसऱ्या वर्षी आम्हाला यातून भरपूर असे उत्पन्न भेटलं. अजून उत्पन्न भेटेल अशी मला आशा आहे, असं श्रीकांत हाके यांनी सांगितलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/कृषी/
शेतकऱ्याने देशी नव्हे एकदाच लावला विदेशी पेरू, आता घरी चालत येतात 3 लाख रुपये!