TRENDING:

Agriculture News : मराठवाड्यातील खरबुजाला परदेशातून मागणी; किती मिळाला दर? पाहा PHOTOS

Last Updated:
धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्याचा खरबूज शेतीचा प्रयोग यशस्वी झाला असून जिल्हाभरातून लोक खरबूज पाहण्यासाठी येत आहेत. तर या खरबुजाला परदेशातून मागणी आली आहे.
advertisement
1/6
मराठवाड्यातील खरबुजाला परदेशातून मागणी; किती मिळाला दर? पाहा PHOTOS
मराठवाड्यातील शेतकरी आपल्या शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे विविध प्रयोग करत आहेत. धाराशिवमधील काजळाचे प्रगतशील शेतकरी किरण आहेर यांनी आपल्या दीड एकर शेतात खरबूज लागवड केली. त्यांचा खरबूज शेतीचा प्रयोग यशस्वी झाला असून जिल्हाभरातून लोक खरबूज पाहण्यासाठी येत आहेत. तर या खरबुजाला परदेशातून मागणी आली आहे.
advertisement
2/6
धाराशिव शहरापासून अगदी 13 किलोमीटर अंतरावर काजळा हे गाव आहे. या गावात बहुतांश शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती करतात.
advertisement
3/6
पारंपरिक शेतीला बगल देत आहेर यांनी दीड एकरावर बीएएसएफ कंपनीचे लायलपूर जातीच्या 12 हजार रोपांची लागवड केली. सध्या खरबुजाचे पीक चांगले आलेय. याच खरबुजाच्या प्लॉटला केनियातील व्यापाऱ्याने भेट दिली असल्याचे आहेर यांनी सांगितले.
advertisement
4/6
आम्ही लायलपूर जातीच्या खरबूज रोपांची लागवड केली होती. सद्यस्थितीमध्ये खरबुजाचे पीक बहरले असून मोठ्या प्रमाणात खरबूज लगडले आहेत. त्यामुळे ठीकठिकाणचे व्यापारी आमच्याशी संपर्क साधत आहेत.
advertisement
5/6
दीड एकर खरबूज लागवडीतून 20 ते 25 टन माल निघण्याची अपेक्षा आहे. यातून जवळपास पाच लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न होईल असा विश्वास शेतकरी आहेर यांनी व्यक्त केला.
advertisement
6/6
आहेर यांच्या खरबूज शेतीला केनिया, बेंगलोर, मुंबई येथील व्यापाऱ्यांनी भेट दिली आहे. केनीयातील व्यापाऱ्याने 23 रुपये प्रति किलोचा उच्चांकी दर ठरवला आहे. त्यामुळे आहेर यांना चांगले आर्थिक उत्पन्न होणार आहे. शेतकऱ्यांनी पारंपारिक शेतीच्या नादी न लागता व्यापारी शेती करणे काळाची गरज बनली आहे, असे मत यावेळी आहेर यांनी व्यक्त केले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/कृषी/
Agriculture News : मराठवाड्यातील खरबुजाला परदेशातून मागणी; किती मिळाला दर? पाहा PHOTOS
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल