TRENDING:

सोयाबीनला भाव मिळत नाही म्हणून सुरु केला प्रक्रिया उद्योग; शेतकऱ्याला 40 हजार निव्वळ नफा PHOTOS

Last Updated:
धाराशिवमधील शेतकऱ्यानं सोयाबीनवर प्रक्रिया उद्योग सुरु केला आहे. यातून महिन्याला 40 हजार निव्वळ नफा मिळत आहे.
advertisement
1/5
सोयाबीनला भाव मिळत नाही म्हणून सुरु केला प्रक्रिया उद्योग; 40 हजार निव्वळ नफा
मराठवाड्यात शेती मोठ्या प्रमाणात कोरडवाहू आहे. शेती कोरडवाहू असल्याने बहुतांश शेतकरी पारंपरिक सोयाबीन, ज्वारी, बाजरी, कापूस आणि तुरीचे पीक घेतात. धाराशिव जिल्ह्यात काही वर्षांपासून सोयाबीनचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते.
advertisement
2/5
मात्र, बऱ्याचवेळा सोयाबीनला भाव मिळत नाही म्हणून धाराशिवमधील शेतकरी संभाजी सलगर यांनी सोयाबीनवर प्रक्रिया उद्योग सुरु केला आहे. सोयाबीनपासून ते दूध आणि पनीर निर्मिती करत असून शेतकऱ्यांना नवीन मार्ग दाखवण्याचं काम त्यांनी केलं आहे.
advertisement
3/5
शेतकरी संभाजी सलगर यांनी चक्क सोयबीनपासून दूध आणि पनीर तयार करून विकण्यास सुरुवात केली आहे. त्यांचे जेमतेम शिक्षण 10 वी पर्यंतचे झाले आहे. वडिलोपार्जित 9 एकर शेती आहे. ही शेती पावसाच्या भरोश्यावर असल्याने उत्पन्न कमी अधिक प्रमाणात होते.
advertisement
4/5
सुशिक्षित बेरोजगार शिबिरातून या व्यवसायाची माहिती त्यांना मिळाली होती. त्या शिबिरातून माहिती घेत सोयबीनपासून दूध आणि पनीर तयार करण्याचा शेतीला जोड म्हणून व्यवसाय सुरु केला.
advertisement
5/5
यासाठी त्यांना 12 लाखापर्यंत खर्च आला आहे. एक किलो सोयबीनपासून सहा ते सात लीटर दूध निघते आणि त्या दुधापासून दिड किलो पनीर काढता येते. सोयाबीनपासून बनवलेले दूध 30 रुपये लिटर दराने तर पनीर 160 रूपये किलोने विकतात. सर्व खर्च वजा करून महिना काठी त्यांना 40 हजार रुपये रुपये नफा राहतो. हा जिल्ह्यातील एकमेव प्रयोग आहे, असं संभाजी सलगर यांनी सांगितलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/कृषी/
सोयाबीनला भाव मिळत नाही म्हणून सुरु केला प्रक्रिया उद्योग; शेतकऱ्याला 40 हजार निव्वळ नफा PHOTOS
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल