ही खरी आधुनिक शेती! धाराशिवचे शेतकरी थेट ड्रोनद्वारे करतात फवारणी
- Published by:Isha Jagtap
- local18
- Reported by:Abasaheb Dharmraj Sabale
Last Updated:
Crop spraying: पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देऊन आता शेतकरी बांधव उत्तम नफा मिळवू लागले आहेत. काही शेतकऱ्यांनी तर आपल्या बांधावर एवढं आधुनिकीकरण केलंय की, पिकांवर फवारणी चक्क ड्रोनद्वारे केली जाते. होय! (उदय साबळे, प्रतिनिधी / धाराशिव)
advertisement
1/5

यंदा मान्सून वेळेत हजर झाल्यानं खरीप हंगामातील पिकांची वाढ जोमानं झाली. धाराशिव जिल्ह्यात यंदा सोयाबीन पिकाची पेरणी मोठ्या प्रमाणावर झाली. इथल्या शेतकऱ्यांची फवारणीही उरकली. सोयाबीन, मका, तूर, इत्यादी खरीप पिकांवर फवारणी करण्यात आली.
advertisement
2/5
<a href="https://news18marathi.com/money/agriculture/farmer-sells-products-in-9-states-and-earns-30-lakh-rupees-annually-msbs-mhij-local18-1236116.html">पिकांची वाढ जोमानं</a> झाली असली, तरी सततच्या ढगाळ वातावरणामुळे सोयाबीनवर विविध कीड, रोगांचा प्रादुर्भाव झालाय. त्यामुळे पावसानं उघडीप घेताच शेतकऱ्यांनी फवारणी करण्यास सुरूवात केली.
advertisement
3/5
बहुतांश शेतकरी बॅटरी संचलित पंप किंवा पेट्रोल संचलित पंपानं फवारणी करतात. त्यामुळे पाठीवर स्प्रे पंप घेऊन पिकांमधून चालावं लागतं. म्हणूनच आता ड्रोनद्वारे फवारणी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढतोय.
advertisement
4/5
धाराशिव जिल्ह्यातील भूम परिसरात ड्रोनद्वारे फवारणी करण्यात येतेय. ड्रोन खरेदीसाठी सरकारकडून अनुदानही देण्यात येतंय.
advertisement
5/5
यामुळे आता खऱ्या अर्थानं <a href="https://news18marathi.com/money/agriculture/">शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड</a> मिळाली असं म्हणावं लागेल. कमीत कमी खर्चात, कमीत कमी वेळेत शेतकरी ड्रोनद्वारे फवारणी करत असल्याचं चित्र यंदा धाराशिवमध्ये पाहायला मिळालं.