बँकेतून कार लोन घेताय? अप्लाय करण्यापूर्वी जाणून घ्या नियम, कधीच रिजेक्ट होणार नाही फाइल
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
नवी कार खरेदी करण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. मात्र छोटीशी चूक तुमची लोन फाइल पूर्णपणे रिजेक्ट करु शकते. आज आपण याविषयीच सविस्तर जाणून घेणार आहोत.
advertisement
1/11

नवी कोरी कार खरेदी करावी असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. आता हे स्वप्न पूर्ण करणं कार लोनमुळे सोपंही झालंय. पण अनेकदा बँक आपली लोन फाइल रिजेक्ट करते. ज्यामुळे आपल्या स्वप्नानंना धक्का पोहोचतो. एवढंच नाही तर यामुळे क्रेडिट स्कोअरलाही धक्का पोहोचतो.
advertisement
2/11
तुम्ही नव्या किंवा जुन्या कारसाठी बँकेतून लोन घेण्याचा प्लॅन करताय? करत असाल तर आजची बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आज आम्ही तुम्हाला अशा काही नियमांविषयी सांगणार आहोत. जे फॉलो करुन तुम्ही तुमची फाइल 'रिजेक्शन-प्रूफ' बनवू शकता. चला, या टिप्स समजून घेऊया.
advertisement
3/11
CIBIL स्कोअर पाहा : बँक सर्वात आधी तुमची क्रेडिट वर्थिनेस पाहते. कार लोनसाठी तुमचा CIBIL स्कोअर किमान 750 किंवा त्यापेक्षा जास्त असायला हवा. स्कोअर कमी असेल तर बँक कर्ज नाकारेल किंवा तुमच्याकडून जास्त व्याज आकारेल. कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी 3-6 महिने आधी तुमचा स्कोअर चेक करुन घ्या. तो कमी असेल तर मागील थकबाकी भरून तो सुधारा.
advertisement
4/11
पात्रता चेक करा : बँक तुमचे उत्पन्न आणि कामाच्या स्वरुपाच्या आधारे लोन देते. लोन घेण्यासाठी तुमचे वय 21 ते 65 वर्षांदरम्यान असायला हवे. कंपन्या सॅलरीड व्यक्तीला किमान 1 वर्षांची निरंतर सेवा आणि निश्चित किमान मासिक उत्पन्न (सामान्यतः 25 हजार रुपयांहून अधिक) पाहूनच लोन देते. तसंच सेल्फी एम्पलॉयला किमान 2-3 वर्षांचा स्टेबल बिझनेस रेकॉर्ड आणि इन्कम टॅक्स रिटर्न दाखवून लोन मिळू शकते.
advertisement
5/11
उत्पन्न-कर्ज गुणोत्तर : कर्ज नाकारण्याचे हे सर्वात मोठे कारण आहे. बँका तुमच्या एकूण मासिक उत्पन्नापैकी किती रक्कम विद्यमान ईएमआयमध्ये जाते हे पाहतात. नियमांनुसार तुमचे एकूण ईएमआय (नवीन कार कर्जासह) तुमच्या निव्वळ मासिक उत्पन्नाच्या 50% पेक्षा जास्त नसावेत. तुमच्याकडे आधीच अनेक लहान कर्जे असतील, तर कार लोनसाठी अर्ज करण्यापूर्वी ती बंद करा.
advertisement
6/11
योग्य डाउन पेमेंट निवडा : अनेक बँका या 100% ऑन-रोड फंडिंग देण्याचा दावा करतात. मात्र तुम्ही 15% ते 20% डाउन पेमेंट स्वतः करण्याचा प्लॅन करा. यामुळे बँकेचं जोखिम कमी होते आणि तुमची फाइल लवकर क्लियर होते. सोबतच तुम्हाला कमी व्याज द्यावं लागतं आणि लोन लवकर फेडता येतं.
advertisement
7/11
कार लोन घेण्यासाठी तुम्हाला फोटोमध्ये दाखवलेले डॉक्यूमेंट जमा करणे आवश्यक असते.
advertisement
8/11
व्याज दर,फिक्स्ड vs फ्लोटिंग : लोन घेताना व्याजदराचे प्रकार समजून घेणे गरजेचे आहे. हे दोन्ही प्रकारचे असते - फिक्स्ड आणि फ्लोटिंग. फिक्सड रेटमध्ये पूर्ण कार्यकाळादरम्यान व्याजदर स्थिर राहतात. फ्लोटिंग रेटमध्ये बाजाराच्या आधारावर व्याज कमी-जास्त होत राहते. सध्याच्या काळात फ्लोटिंग रेट्स अनेकदा फायदेशीर ठरतात. मात्र बाजाराची अनिश्चितता लक्षात ठेवणेही गरजेचे आहे.
advertisement
9/11
प्रोसेसिंग फीस आणि हिडेन चार्ज : कार लोन घेत असताना फक्त व्याजदर पाहू नका. फाइल चार्ज, प्रोसेसिंग फीस आणि प्री-पेमेंट पेनल्टीविषयी अवश्य विचारा. प्रोसेसिंग फीस अनेकदा बँक सणाच्या काळात माफ करते. तुम्हाला वेळेपूर्वी लोन फेडायचे असेल तर बँक तुमच्याकडून फोरक्लोजर चार्ज घेईल? हे आधीच स्पष्ट करुन घ्या.
advertisement
10/11
या चुका टाळा : ज्यावेळी तुम्ही एकाच वेळी 4-5 बँकांमध्ये लोनसाठी अप्लाय करता. तेव्हा तुमचं क्रेडिट स्कोअर खाली येतं. उत्पन्न किंवा पत्त्याविषयी चुकीची माहिती दिल्यावर बँक तुम्हाला ब्लॅकलिस्टमध्ये टाकते. म्हणून या चुका करु नका. तुमचा सिबिल कमी असेल, तर एक चांगल्या सिबिलच्या को-अॅप्लीकेंटला जोडून लोन घेऊ शकता.
advertisement
11/11
तुम्ही वरील नियमांचे पालन केले आणि तुमचे कागदपत्रे पारदर्शक ठेवली तर तुमची फाइल रिजेक्ट केली जाणार नाही. कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी नेहमीच वेगवेगळ्या बँकांची तुलना करा, परंतु सर्व बँकांमध्ये कार कर्जासाठी अर्ज करू नका.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
बँकेतून कार लोन घेताय? अप्लाय करण्यापूर्वी जाणून घ्या नियम, कधीच रिजेक्ट होणार नाही फाइल