Farmer Success : शेतीसोबत केला व्यवसाय, महिन्याला शेतकरी करतोय दीड लाख रुपयांची उलाढाल, असं काय केलं?
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
Farmer Success: सध्याच्या काळात शेतकरी शेतीसोबतच पुरक व्यवसायातून देखील चांगली कमाई करत आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील शेतकरी लाखोंची कमाई करत आहे.
advertisement
1/5

सध्याच्या काळात काही शेतीसोबतच शेतीपुरक व्यवसायातूनही चांगली कमाई करत आहेत. शेंद्रा येथील शेतकरी भरत मोरे यांनी आठ वर्षांपूर्वी नर्सरी सुरू केली. फळबाग, शो प्लांट, इंडोर प्लांट यासह विविध प्रकारच्या फुलांची झाडे विक्री करतात. या माध्यमातून त्यांची महिन्याला एक ते दीड लाख रुपयांची उलाढाल होत आहे.
advertisement
2/5
जालना रोडवर शेंद्रा येथे मोरे हे झाडांची देखभाल आणि कटिंग केले जाते. या नर्सरीतून झाडांची होलसेल विक्री केली जाते. या दोन्ही कामातून खर्च वजा करून 70 ते 80 हजार रुपयांपर्यंत कमाई होते, असे मोरे यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.
advertisement
3/5
झाडांच्या वाणाच्या बिया टाकून मोरे हे स्वतः रोप तयार करतात. सर्व झाडांची रोपे घरी तयार करत असल्यामुळे त्यांना चांगला फायदा होत आहे. फुलांमध्ये मोगरा, जास्वंद, एक्झोरा यासह विविध विदेशी झाडे त्यांच्याकडे उपलब्ध आहेत.
advertisement
4/5
नर्सरीच्या माध्यमातून सर्व उलाढाल दीड लाखांची होते. तसेच कामगाराचे पैसे खर्च वजा करून 60 हजार रुपये राहतात तसेच घरगुती झाडांची देखभाल करून असे एकूण 70 ते 80 हजार रुपये महिन्याला कमाई होते. सीझनमध्ये 4 ते 5 लाख रुपये मिळत असल्याचे देखील मोरे यांनी सांगितले.
advertisement
5/5
नर्सरीच्या ठिकाणी परिसरातील शेतकरी येत असून त्यांच्याकडून नर्सरी बाबत मार्गदर्शन घेत आहेत. नर्सरी व्यवसाय सुरू करण्यापूर्वी सर्वांनीच एक महिना नर्सरी पूर्व प्रशिक्षण घ्यावं, त्यामध्ये रोप कशी तयार करायची, झाडांची कटिंग अशा बारीक गोष्टींचा अभ्यास करावा जेणेकरून भविष्यात अडचण निर्माण होणार नाही, असे नर्सरी व्यवसायिक भरत मोरे सांगतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Farmer Success : शेतीसोबत केला व्यवसाय, महिन्याला शेतकरी करतोय दीड लाख रुपयांची उलाढाल, असं काय केलं?