Bank Loan: लोनच्या चक्रातून सुटण्याचा मार्ग सापडला, फक्त एक ट्रिक वाचवेल तुमचे पैसे
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
Bank Loan: Flat lendingआणि Reducing Interest Rate मध्ये नक्की काय फरक, आपल्या फायद्याचं काय, कुठे होते पैशांची जास्त बचत?
advertisement
1/11

मुंबई: आजकाल पगार इतका कमी की त्यात भागेना आणि त्यामुळे आपली स्वप्न, आर्थिक नड, अडीनडीच्या काळात लोन ही गरज असते. याचाच फायदा एजन्ट आणि बँक काहीवेळा घेते. बँक आपल्याला लोनमधील बऱ्याच सीक्रेट गोष्टी सांगत नाही.
advertisement
2/11
त्याचा फायदा बँकेला होत असतो आणि पर्यायाने सर्वसामान्य व्यक्तीच्या खिशातून जास्त पैसे लोनवरील व्याज म्हणून जात राहतात. हीच परिस्थिती तुमच्यावर येऊ नये म्हणून लोन घेण्याआधी थोडी माहिती घेणं गरजेचं असतं.
advertisement
3/11
आज आम्ही तुम्हाला लोनच्या चक्रातून सुटण्याचा एक सीक्रेट फंडा सांगणार आहोत. जेव्हा लोन घेतो त्यावरील व्याज हे दोन प्रकारचं असतं, फ्लॅट लॅडिंग आणि रिड्युसिंग इंट्रेस्ट रेटनुसार बँका आपल्याला लोन देत असतात. त्यामुळे तुम्हाला या दोन्ही गोष्टीतला फरक समजून घ्यावा लागेल.
advertisement
4/11
बऱ्याच वेळा आर्थिक गरजांसाठी आपण बँकेकडे लोनसाठी अर्ज करतो. बँका आकर्षक ऑफर्स आणि व्याजदर दाखवून ग्राहकांना आकर्षित करतात. मात्र, आपण याबाबत सखोल माहिती घेतली नाही तर आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते.
advertisement
5/11
जर तुम्हाला 20 लाखाचे लोन हवे असेल, तर कोणती बँक किती व्याजदर देते याचा आधी अभ्यास करा. सरसकट कोणत्याही बँकेत अर्ज केल्यास, तुम्हाला त्या बँकेचे ठराविक व्याजदर लागू होतील.
advertisement
6/11
मीनलने 20 लाख पर्सनल लोनसाठी एका बँकेशी संपर्क केला. सुरुवातीला त्याला 14% व्याजदराने लोन देण्याचा प्रस्ताव मिळाला. मात्र, तिने इतर बँकांचे व्याजदर तपासले आणि तुलनात्मक माहिती बँकेला दिली. परिणामी, त्याला 10% व्याजदराने लोन मिळाले.
advertisement
7/11
फ्लॅट रेट vs रिड्युसिंग इंटरेस्ट रेट : मीनलने लोन प्रक्रिया सुरू करताना, व्याजदर "फ्लॅट रेट" आहे की "रिड्युसिंग बॅलन्स" याची चौकशी केली. त्यानुसार आपण कोणता निर्णय घ्यायचा हे दोघांमधील फरक पाहून ठरवले. फ्लॅट रेटमध्ये EMI मध्ये व्याजाची रक्कम कायम समान राहते. व्याज मूळ रकमेवर (Principal Amount) लागू होते. यामुळे जास्त पैसे द्यावे लागतात.
advertisement
8/11
रिड्युसिंग इंटरेस्ट रेट : EMI भरल्यावर शिल्लक रकमेवर व्याज आकारले जाते. जसजशी मूळ रक्कम कमी होते, तशी व्याजाची रक्कम कमी होते. आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरते. त्यामुळे मीनलने रिड्युसिंग इंटरेस्ट रेट निवडण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळे तिला जास्त व्याजदर भरावं लागणार नाही.
advertisement
9/11
इफेक्टिव्ह रेटचा परिणाम: जेव्हा बँक 10% किंवा 14% व्याजदर सांगते, तेव्हा फ्लॅट रेटमुळे हा दर 17% पर्यंत जाऊ शकतो. म्हणजेच तुम्हाला 3% अतिरिक्त रक्कम भरावी लागू शकते, जी मोठ्या रकमेच्या लोनसाठी फार महागडी ठरते.
advertisement
10/11
लोन घेताना या गोष्टींची काळजी घ्या: बँकांमधील व्याजदरांची तुलना करा. फ्लॅट रेट आणि रिड्युसिंग बॅलन्स यातील फरक समजून घ्या. इफेक्टिव्ह व्याजदर आणि अतिरिक्त शुल्कांची माहिती घ्या. लोन प्रक्रियेतील अटी व नियम वाचा.
advertisement
11/11
लोन घेताना पुरेसा अभ्यास न केल्यास तुम्हाला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. योग्य माहिती आणि काळजीपूर्वक निर्णय घेतल्यास तुम्ही अनावश्यक खर्च टाळून आर्थिक बचत करू शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Bank Loan: लोनच्या चक्रातून सुटण्याचा मार्ग सापडला, फक्त एक ट्रिक वाचवेल तुमचे पैसे