Gold Price: पुढच्या 5 वर्षांत 1 तोळे सोन्याची किंमत काय असेल? कोड्यात टाकणारी अजब भविष्यवाणी
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
तुम्ही आधीसारखंच ट्रेडिशन पद्धतीनं सोन्यात पैसे गुंतवत असाल तर थांबा, पुढच्या पाच वर्षात सोन्याची स्थिती काय असेल? तुम्ही चूक तर करत नाही? जाणून घ्या
advertisement
1/7

आई-मावशी यांना पूर्वीपासून थोडं थोडं सोनं घेताना पाहिलं असेल, मात्र आताची पिढी स्मार्ट होऊन ऑनलाईन सोन्यात गुंतवणूक करतेय दोन्ही पद्धती जरी वेगवेगळ्या असल्या तरी त्यामागचा उद्देश एकच की सोन्यात गुंतवणूक करणं. आजवर सोन्याने कायमच ग्राहकांना चांगला परतावा दिला, मात्र पुढच्या पाच वर्षात फासे पलटतील असं होणार नाही असं म्हटलं तर? तर आपल्याला धक्काच बसेल.
advertisement
2/7
सोन्याचा भाव पाहून सामान्यांच्या काळजाचा ठोका चुकतोय. १० ग्रॅम सोन्याने दीड लाखाचा टप्पा कधीच ओलांडला आहे. पण, जर तुम्हाला कोणी सांगितलं की, सोन्याची ही 'रॉकेट' भरारी आता थांबणार आहे आणि पुढच्या ५ वर्षांत सोनं तुम्हाला हवा तसा परतावा देणार नाही, तर? 'फंड्स इंडिया ग्रुप'चे सीईओ अक्षय सप्रू यांनी नुकताच याबाबत एक महत्त्वपूर्ण भाकीत केलं, ज्याने पारंपरिक गुंतवणूकदारांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.
advertisement
3/7
सध्या अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण असं युद्ध रंगात आलं आहे. जगावर तिसऱ्या महायुद्धाचं सावट असताना गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे धाव घेतात. यामुळेच गेल्या काही दिवसांत सोन्याने १० ग्रॅमसाठी १,६०,००० रुपयांचा टप्पा पार केला. पण अक्षय सप्रू यांच्या मते, सोन्याच्या तेजीचा हा सुवर्णकाळ आता संपण्याच्या मार्गावर आहे. "पुढील ५ वर्षांत सोन्यातून पूर्वीसारखा भरघोस परतावा मिळण्याची शक्यता खूपच कमी असेल," असं भाकीत त्यांनी वर्तवलं आहे.
advertisement
4/7
आता तुम्हाला प्रश्न पडेल की, जर २०३० पर्यंत सोन्याचे भाव १.७० लाख ते २.२५ लाख रुपयांपर्यंत जाणार असतील, तर मग गुंतवणूक का नको? याचं उत्तर दडलंय महागाई आणि पर्यायी गुंतवणुकीत. तज्ज्ञांच्या मते, सोन्याचे भाव वाढतील हे खरं, पण त्यातील अस्थिरता इतकी जास्त असेल की सामान्य गुंतवणूकदार तिथे अडकून पडू शकतो. "तुमच्या एकूण गुंतवणुकीपैकी फक्त ५ ते १० टक्केच सोनं असावं. त्यापेक्षा जास्त सोनं साठवणं आता फायद्याचं ठरणार नाही," असा सल्ला सप्रू यांनी दिला आहे.
advertisement
5/7
सोन्यापेक्षाही जास्त धोकादायक चांदी असल्याचं सप्रू यांनी सांगितलं. चांदीच्या किमतीत होणारे चढ-उतार इतके वेगवान असतात की, सामान्य मध्यमवर्गीय गुंतवणूकदाराला ते झेपणार नाहीत. त्यामुळे चांदीत मोठी रक्कम गुंतवण्यापूर्वी १० वेळा विचार करा, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
advertisement
6/7
गुंतवणूक म्हणजे केवळ सोनं खरेदी करणं नव्हे हे आधी समजून घ्यायला हवं. अक्षय सप्रू यांनी तरुणांसाठी एक खास कानमंत्र दिला. जर तुमचं वय ३० वर्षे असेल, एकाच क्षेत्रात पैसा न लावता डिव्हेरसिफिकेशन म्हणजेच विविध ठिकाणी गुंतवणूक करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.
advertisement
7/7
एकेकाळी बाजार कोसळला की लोक घाबरून पैसे काढून घ्यायचे. पण आता चित्र बदललं आहे. लहान शहरांतूनही मोठ्या प्रमाणात SIP नोंदणी होत आहे. "बाजार पडणं ही चांगली कंपनी स्वस्तात विकत घेण्याची संधी आहे, हे आता भारतीयांना पटलंय," असं सप्रू अभिमानाने सांगतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Gold Price: पुढच्या 5 वर्षांत 1 तोळे सोन्याची किंमत काय असेल? कोड्यात टाकणारी अजब भविष्यवाणी