युद्धाचा इफेक्ट! सोन्याचे पकडली रॉकेटची स्पीड, चांदीनेही मोडले विक्रम; किंमत पाहून चक्रावाल
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील सुरू असलेल्या युद्धामुळे सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी वाढ पाहायला मिळत आहे. आज एकाच दिवसात चांदीच 23000 प्रति किलोग्राम महाग झाली आहे. सोन्याच्या रेटमध्येही आठ हजार रुपये प्रति 10 ग्रामने वाढ झाली आहे. गोल्ड-सिल्व्हरचे रेट पुढेही वाढतील. जाणून घेऊया काय म्हणतात एक्सपर्ट...
advertisement
1/7

नवी दिल्ली : अमेरिका-इस्रायल इराण युद्धाचा इफेक्ट भयंकर दिसत आहे. यामुळे सर्वसामान्यांना सोनं खरेदी करणं कठीण होऊ शकतकं. इंडिया बुलियन ज्वेलर्स असोसिएशन (IBJA)नुसार, 24 कॅरेट सोन्याची किंमत आज एकाच दिवसात तब्बल 8,374 रुपयांनी वाढून 1,67,471 रुपये प्रति 10 ग्राम झाली आहे.
advertisement
2/7
शुक्रवारी हाच सोना 1.59 लाख रुपयांच्या आसबास होते. फक्त शुद्ध सोने नाही, तर 22 कॅरेट आणि 18 कॅरेटच्या किंमतींमध्येही मोठी वाढ झाली आहे. ज्यामुळे लग्नाच्या सीझनच्या तयारीत असणाऱ्या कुटुंबाचे गणित पूर्णपणे बिघडले आहे.
advertisement
3/7
फक्त सोनेच महाग झाले नाही. चांदीच्या किमतीही तुम्हाला आश्चर्यचकित करतील. सोमवारी चांदीच्या किमतीत 23,148 रुपयांची अविश्वसनीय वाढ झाली. आता एक किलो चांदीची किंमत 2,89,848 रुपये झाली आहे.
advertisement
4/7
फ्युचर्स मार्केटमध्ये (MCX) चांदीचा मे महिन्याचा कॉन्टॅक्ट 2.95 लाख रुपयांच्या पातळीवर पोहोचला आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर, गुंतवणूकदार चांदीला ‘सेफ हेवन’ मानून वाढत्या प्रमाणात खरेदी करत आहेत, ज्यामुळे ही वाढ झाली आहे.
advertisement
5/7
चारही बाजूने तेजी: आंतरराष्ट्रीय बाजारातही सोने आणि चांदीच्या किंमतीत तेजी आहे. सहा वाजेपर्यंत कॉमेक्सवर सोनं 2.78 टक्के तेजीसह 5,397 डॉलर प्रति औंस आणि चांदी 1.90 टक्के वाढीसह 95.09 डॉलर प्रति औंसवर होती. सोने आणि चांदीमध्ये तेजीचं कारण इस्रायल आणि इराणसह पूर्ण मध्यपूर्वचं युद्ध मानलं जात आहे. यामुळे सोन्यात सुरक्षित खरेदीला प्रोत्साहन मिळालं आहे.
advertisement
6/7
घाबरलेले गुंतवणूकदार करताय सोन्याची खरेदी : एलकेपी सिक्योरिटीजचे जतिन त्रिवेदी म्हणाले की, अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये युद्धामुळे सोन्यात तेजी पाहायला मिळत आहे.
advertisement
7/7
येत्या काळात सोन्याची हालचाल जागतिक आर्थिक डेटाद्वारे निश्चित केली जाईल. ते पुढे म्हणाले की सोने त्याच्या 1,64,000रुपयांच्या प्रमुख आधाराच्या वर राहिले तर तेजीचा कल कायम राहण्याची शक्यता आहे. यासाठी प्रतिरोध पातळी 1,72,000 रुपये आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
युद्धाचा इफेक्ट! सोन्याचे पकडली रॉकेटची स्पीड, चांदीनेही मोडले विक्रम; किंमत पाहून चक्रावाल