TRENDING:

Ladki bahin Yojana: .... तर लाडक्या बहि‍णींना येणार नाहीत 1500 रुपये, तुमच्याकडे उरलेत फक्त काही तास

Last Updated:
लाडकी बहीण योजनेत १५०० रुपये मिळवण्यासाठी १८ नोव्हेंबरपूर्वी EKYC आणि आधार मोबाईल लिंक करणे आवश्यक आहे. वेळ चुकवली तर यादीतून नाव वगळले जाईल.
advertisement
1/6
... तर लाडक्या बहि‍णींना येणार नाहीत 1500 रुपये, तुमच्याकडे उरलेत फक्त काही तास
लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. या योजनेद्वारे दरमहा मिळणारे १५०० रुपये जर तुम्हाला यापुढेही मिळावे असं वाटत असेल तर EKYC करणं बंधनकारक आहे. ज्या महिला ते करणार नाहीत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. सरकारकडून यासाठी कोणतीही मुदतवाढ देण्यात आली नाही.
advertisement
2/6
E KYC करण्यासाठी अंतिम मुदत १८ नोव्हेंबर अंतिम तारीख देण्यात आली आहे. यामध्ये तूर्तास तरी सरकारने कोणतीही मुदतवाढ दिली नाही. ज्या महिलांनी EKYC केलं नाही त्यांना पैसे येणार नाहीत त्यांचं यादीतून नावं वगळलं जाईल. याशिवाय तुमचं आधार आणि मोबाईल नंबर लिंक असणं देखील आवश्यक आहे.
advertisement
3/6
शासनाने वारंवार सूचना देऊनही ज्या महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांचे नाव आगामी हप्त्याच्या यादीतून वगळले जाण्याची शक्यता आहे. तुम्ही जर या गोष्टींकडे लक्ष दिलं नाहीत तर तुमचै पेसे कायमचे तुम्ही गमावून बसला त्याआधीच EKYC पूर्ण करुन घ्या.
advertisement
4/6
ज्या महिलांनी त्यांचे बँक खाते आधारशी लिंक केले आहे, त्यांनीसुद्धा बँक खातं आधारशी लिंक झालं की नाही पाहाणं आवश्यक आहे. यासोबतच, e-KYC ची प्रक्रिया पूर्ण झाली आहे की नाही, हे तपासा. जर तुम्हाला तुमचे बँक खाते डीबीटीसाठी योग्य आहे की नाही, याबद्दल शंका असेल, तर तुम्ही तात्काळ तुमच्या जवळच्या बँक शाखेत, योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन ही स्थिती तपासू शकता.
advertisement
5/6
अक्षरशः मोजकेच तास उरले आहेत. जर तुम्ही ही अंतिम मुदत चुकवली, तर तुम्हाला या महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता मिळणार नाही. ज्या महिलांनी अजूनही ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांनी कोणत्याही परिस्थितीत आजच्या आज ती पूर्ण करून घ्यावी. या योजनेचा उद्देश महिलांना थेट आर्थिक पाठबळ देण्याचा आहे.
advertisement
6/6
https://lbyadmin.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही लाडकी बहीणसाठी EKYC पूर्ण करू शकता. त्यामुळे ही वेळ चुकवू नका. मोबाईलनंबर आणि कॅप्चर कोड टाकून लॉगइन करा आणि त्यानंतर व्हेरिफिकेशन पूर्ण करा. नाहीतर तुम्हाला लाडक्या बहिणीचा पुढचा हप्ता मिळणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Ladki bahin Yojana: .... तर लाडक्या बहि‍णींना येणार नाहीत 1500 रुपये, तुमच्याकडे उरलेत फक्त काही तास
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल