तुमच्या खात्यावर पैसे आले की नाही? लाडकी बहीणचे पैसे जमा व्हायला सुरुवात, आदिती तटकरेंनी दिली अपडेट
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
आले रे आले लाडकी बहीणचे पैसे आले! तुमच्या खात्यावर नाही आले मग लगेच चेक करा का? आदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची अपडेट
advertisement
1/6

आले रे आले लाडक्या बहि‍णींचे पैसे आले. तुमच्या खात्यावर जमा झाले की नाही? फेब्रुवारी महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता लाडक्या बहि‍णींचा खात्यावर जमा व्हायला सुरुवात झाली आहे. तुमच्या फोनवर जर आले नसतील तर थांबा घाबरून जाऊ नका. तुम्हाला उद्यापर्यंत पैसे येतील.
advertisement
2/6
आदिती तटकरे यांनी ट्विट करून महत्त्वाची माहिती दिली. फेब्रुवारी महिन्याचा निधी वितरित करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. तांत्रिक सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर पुढील २ ते ३ दिवसांत सर्व पात्र बहिणींच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात ही रक्कम जमा होईल
advertisement
3/6
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना दमदार वाटचाल करत असल्याचेही त्यांनी नमूद केले. ज्या महिलांनी ई-केवायसी करताना काही चुका केल्या आहेत किंवा ज्यांचे उत्पन्न निकषापेक्षा जास्त असल्याचे चुकीने नमूद झाले आहे, त्यांना दुरुस्तीसाठी ३१ मार्च २०२६ पर्यंतची शेवटची संधी देण्यात आली आहे.
advertisement
4/6
ज्यांनी अद्याप ई-केवायसी दुरुस्त केलेले नाही, त्यांनी तातडीने मोबाईल किंवा सेतू केंद्रावरून ही प्रक्रिया पूर्ण करावी. जर ३१ मार्चपर्यंत ही दुरुस्ती झाली नाही, तर तुमचा पुढचा लाभ कायमचा बंद होऊ शकतो. त्यामुळे आता फक्त काहीच दिवस शिल्लक असल्याने ही कामे तातडीने उरकून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
advertisement
5/6
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी असावे. बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे अनिवार्य आहे. अर्जदाराने अर्जातील सर्व माहिती अचूक भरलेली असावी. अर्जदाराकडे गाडी असेल तर त्याचा अर्ज बाद केला जाणार आहे. अर्जदाराची माहिती खोटी असेल तर अर्ज बाद होऊ शकतो.
advertisement
6/6
फेब्रुवारी महिन्याचा हप्ता खात्यावर जमा व्हायला सुरुवात झाल्यामुळे महिलांच्या चेहऱ्यावर आनंद आला आहे. ज्या महिलांना अजून रक्कम आलेली नाही त्यांच्याकडे फक्त तीन दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यांनी तातडीनं KYC करून घेणं आवश्यक आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
तुमच्या खात्यावर पैसे आले की नाही? लाडकी बहीणचे पैसे जमा व्हायला सुरुवात, आदिती तटकरेंनी दिली अपडेट