TRENDING:

लाडक्या बहि‍णींची दिवाळी गोड होणार? ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरे यांनी सगळंच सांगितलं

Last Updated:
लाडकी बहीण योजनेत KYC बंधनकारक, निधी तूर्तास थांबवला. पूरग्रस्तांना प्राधान्य, लाभार्थींनी लवकर KYC पूर्ण करावं, अपात्र महिलांची नावं वगळली जाणार.
advertisement
1/7
लाडक्या बहि‍णींची दिवाळी गोड होणार? ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कधी येणार?
महायुती सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेत अनेक निकष आणि अटींमुळे अनेक लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत. आता लाडक्या बहि‍णींना KYC बंधनकारक केलं असून महिन्याभरात जे केवायसी करणार नाहीत त्यांना लाडक्या बहि‍णींचा लाभ मिळणार नाही.
advertisement
2/7
ऑक्टोबर महिन्यातील लाडक्या बहि‍णींचा हप्ता अजूनही आला नाही. दिवाळीपर्यंत हा हप्ता येणार की नाही याची धाकधूक लागली आहे. त्यात नुकतंच 4 योजनांचा निधी तूर्तास थांबवण्यात आल्याचं मुख्यमंत्र्‍यांकडून सांगण्यात आलं होतं. त्यामुळे लाडक्या बहिणीचं काय अशी चर्चा सुरू झाली आहे.
advertisement
3/7
लाडक्या बहि‍णींचा हप्ता कधी मिळणार याबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे. सणासुदीच्या काळात लाडक्या बहि‍णींना लाभ मिळावा असा सरकारचा प्रयत्न असतो. निधी मिळाल्यानंतर लाभार्थींना तातडीनं वितरीत केला जाणार आहे.
advertisement
4/7
सध्या पूरपरिस्थितीमुळे नुकसानग्रस्त भागात अधिकाधिक मदत उपलब्ध करून दिली जात आहे. त्यामुळे लाडक्या बहि‍णींसाठी तूर्तास निधी मिळालेला नाही. पुरग्रस्तांना मदत करणे सध्या सरकारने प्राधान्य आहे. त्यामुळे लाडक्या बहि‍णींना थोडी वाट पाहावी लागू शकते असंही आदिती तटकरे म्हणाल्या आहेत.
advertisement
5/7
दररोज सुमारे 4 ते 5 लाख महिला E KYC करत आहेत. राज्यात 19 दिवसांत 1 कोटी लाडक्या बहि‍णींची केवायसी पूर्ण झाली आहे. २ कोटींहून अधिक लाभार्थी आहेत. अजूनही केवायसी ज्यांचं बाकी राहिलं आहे त्यांनी लवकरात लवकर ते पूर्ण करुन घ्यावं असं आवाहन सरकारकडून केलं जात आहे.
advertisement
6/7
ज्या कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाख रुपयांहून अधिक आहे. ज्या महिलांकडे चारचाकी गाडी आहे. एकाच घरातील दोनपेक्षा जास्त महिला लाडकी बहीणचा लाभ घेत आहेत अशा सगळ्यांची नावं या यादीतून वगळण्यात येणार आहेत.
advertisement
7/7
इतकंच नाही तर आता लाभार्थींसोबत त्यांच्या वडिलांचं आणि नवऱ्याचं उत्पन्न, आधार कार्ड नंबर देखील तुम्हाला केवायसी करताना द्यावा लागणार आहे. त्यामुळे जे लोक सरकारला फसवून या योजनेचा लाभ घेत आहेत त्यांचं नाव या यादीमधून वगळण्यात येणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
लाडक्या बहि‍णींची दिवाळी गोड होणार? ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरे यांनी सगळंच सांगितलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल